Saturday, January 28, 2012

Book "Cold Steel" by Byron Ousey Tim Bouquet

Cold Steel

by

Byron Ousey Tim Bouquet

लक्ष्मीनिवास मित्तल यांच्याशी संबंधित प्रत्येकच गोष्ट सुरस असल्याचा प्रत्यय जगभरातले लोक गेली काही वर्षं घेत आहेत. अलीकडेच मित्तल यांनी केलेल्या आर्सेलर या कंपनीच्या अत्यंत साहसी टेकओव्हरची सुरस कथा टिम बुके व बायरन आवसी या लेखकद्वयांनी 'कोल्ड स्टील' नावाने शब्दबद्ध केली आहे. या अतिशय लक्षवेधी पुस्तकाविषयी -
एकामागून एक पोलादी कंपन्या ताब्यात घेऊन विश्वविक्रम करणाऱ्या लक्ष्मीनिवास मित्तल यांचा अश्वमेध अडविण्याचा प्रयत्न आसेर्लर या बहुराष्ट्रीय कंपनीने केला खरा; परंतु, या कंपनीचाच घास मित्तल यांनी घेतला, त्यामुळे जगभर एकच खळबळ माजली. एका भारतीयाने इतकी हिंमत करावी, यावर उद्योगजगताचा विश्वासच बसत नव्हता. अशा या अत्यंत साहसी टेकओव्हरची सुरस कथा टिम बुके व बायरन आवसी या लेखकद्वयांनी 'कोल्ड स्टील' नावाने शब्दबद्ध केली आहे. थरच्या वाळवंटात जन्मून इंडानेशिया-जावाला नशीब आजमावण्यासाठी गेलेले मित्तल यांनी आसेर्लर कंपनी ताब्यात घेण्यापूवीर् अनेक आजारी पोलादी कंपन्या सहजरीत्या खरेदी केल्या होत्या. त्यांची टेकओव्हरची पद्धत साधी होती. सरकारला न पेलवणाऱ्या कंपन्या परदेशांतून हुडकून काढायच्या, त्या खरेदी केल्यावर अधिकारी आणि कामगार काढून तेथे भारतीयांची नेमणूक करायची. अशापद्धतीने जगभरच्या आजारी पोलाद कंपन्या खरेदी करून मित्तल यांनी स्वतंत्र पोलादी विश्व निर्माण केले. इतकेच नव्हे तर अमेरिकेतील मोटार उद्योगांना पोलाद पुरविण्याची मक्तेदारी संपादन केली होती. देशातील सर्वांत मोठा पोलाद समूह उभा करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती, त्यामुळे इतर बड्या उद्योगसमूहांचे धाबे दणाणले होते. मित्तल यांना शह देण्याची पहिली व्यूहरचना आसेर्लर कंपनीने रचली. त्यासाठी कॅनडातील डॉफेक्सो कंपनी ताब्यात घेण्याची योजना आखण्यात आली. हेतू हा की, ही कंपनी ताब्यात आली की तिच्यामार्फत उत्तर अमेरिकेतील मित्तल यांची पोलाद बाजारपेठ काबीज करायची. थिसेनकृप या जर्मन कंपनीने डॉफेक्सोसाठी आधीच बोली लावलेली होती तरीही तिच्यासाठी आसेर्लर कंपनीचे फ्रेंच चीफ एक्झिक्युटीव्ह गाय डोल यांनी अधिक कॅनेडियन डॉलर मोजण्याची तयारी सुरू केली. मित्तल यांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी डोल यांच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलाद उद्योग आणि आपल्या कंपन्यांच्या भल्यासाठी आपण एकत्र येणे कसे आवश्यक आहे, हे डोल यांना पटवून देण्यासाठी मित्तल -यांनी १३ जानेवारी २००६ रोजी स्वत:च्या घरी बैठक आयोजित केली होती. परंतु, घमेंडखोर डोल यांना हे मान्य नव्हते. मित्तल यांची आपल्याशी बरोबरी करण्याची लायकी नाही, असे ते समजत. त्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही कंपन्यांची संस्कृती वेगळी आहे, कार्यक्षेत्रे वेगळी आहेत, असे सांगून मित्तल यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देण्याचे टाळले. बैठक अयशस्वी झाली. परंतु मित्तल नाराज झाले नाहीत, त्यांच्या डोक्यात वेगळाच विचार आला, त्यांच्या डोळ्यातील चमक त्यांचा मुलगा आदित्याच्या लक्षात आली.

डोल आणि त्यांचा सहकारी निघून गेल्यावर मित्तल यांनी आदित्यास सांगितले, डोल यांच्याशी गोडीगुलाबी करण्याचे प्रयत्न सोडून द्यायचे आणि त्यांची आसेर्लर कंपनीच आपण ताब्यात घ्यायची. आदित्यालाही आपल्या डॅडींची ही धाडसी मोहीम वाटली.
मित्तल यांनी डावपेच आखण्यास लगेच सुरूवात केली. या टेकओव्हरच्या कामात नेहमीच्या क्रेडिट स्युइसचे सहकार्य न घेता गोल्डमन सॅच या अर्थ व सल्लागार समूहाची साथ घेण्याचे ठरविले. या समूहाचे अध्यक्ष व सीईओ लॉइड ब्लँकफेन यांनाही कानावर विश्वास बसला नाही. परंतु त्यांनीही अवघड वाटणाऱ्या मोहिमेत सामील होण्याचे आश्वासन दिले. गोल्डमन सॅचचे 'डीलमेकरपटू' यूल झौईची यांच्यासाह्याने डावपेचाची आखणी पूर्ण करण्यात आली.
टेकओव्हर मोहिमेचे सांकेतिक नाव 'प्रोजेक्ट ऑलिम्पस' ठेवण्यात आले आणि मित्तल स्टील कंपनीस 'मार्स' व आसेर्लरला 'अॅटलास' असे कोडनेम देण्यात आले. टेकओव्हरसाठी लागणाऱ्या अर्थसाह्यासाठी क्रेडिट स्युइस, सिटी ग्रुप व एचएसबीसी यांना तयार करण्यात आले. सर्व तयारी पूर्ण होईपर्यंत टेकओव्हरची बातमी लीक होऊ न देण्याची सावधानता राखण्यात आली. त्यानुसार २७ जानेवारी किंवा ३ फेब्रुवारीचा मुहूर्त काढण्यात आला.
' डोफॅस्को' ताब्यात घेतल्याच्या आनंदात डोल असताना मित्तल यांनी २६ जानेवारी रोजी लंडन येथून त्यांना 'कर्टसी कॉल' करून आसेर्लर कंपनीचे सर्व शेअर खुल्या बाजारातून खरीदण्यात येत असल्याची घोषणा केली. डोल त्यावेळी टॉरेंटो विमानतळावर होते. त्यांचा कानावर विश्वासच बसला नाही. विमानतळाची इमारतच जणू हादरत आहे, असे त्यांना जाणवू लागले, त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे टाळून फोनच बंद केला.
दुसऱ्या दिवशी मित्तल यांनी आसेर्लर कंपनीच्या शेअरखरेदीची जाहीर घोषणा करताच कंपनीच्या बेल्जियम, फ्रान्स, लक्झेमबर्ग आणि स्पेन शेअर बाजारांतील सौदे थांबविण्यात आले. - भागधारकांना आकषिर्त करण्यासाठी त्यांच्यापुढे तीन पर्याय मांडण्यात आले. पहिल्या पर्यायामध्ये आसेर्लरच्या पाच शेअरच्या मोबदल्यात मित्तल स्टीलचे चार नवीन शेअर आणि ३५.२५ युरो रोख मिळतील. दुसऱ्या पर्यायामध्ये प्रत्येक शेअरला २८.२१ युरो रोख देण्यात येतील आणि तिसऱ्यामध्ये आसेर्लरच्या १५ शेअरच्या मोबदल्यात मित्तल स्टीलचे १६ शेअर देण्यात येतील. या पर्यायांना भागधारकांनी भरघोस प्रतिसाद दिला. अशाप्रकारे मित्तल यांनी सौदा पूर्ण केला आणि आसेर्लर कंपनी बनली 'आसेर्लर मित्तल'!

मित्तल आपली एक दिवस शिकार करतील, याची जाणीव डोल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यापूवीर्च युक्रेनमधील कंपनी ताब्यात घेण्याच्यावेळी आली होती. मित्तल यांचा टेकओव्हरचा आवाका पाहून आसेर्लरच्या रक्षणासाठी 'प्रोजेक्ट टायगर' ही सांकेतिक योजना आखण्यात आली होती. त्यात मित्तल यांचा उल्लेख 'मि. मून' आणि त्यांचा मुलगा आदित्य यांचा 'अॅडम' म्हणून करण्यात आला होता. या 'प्रोजेक्ट टायगरला'च मित्तल यांनी भक्ष्य बनविले आणि जगातील सर्वाधिक मोठा पोलाद उत्पादक समूह बनला. आजही मित्तल यांचा टेकओव्हरचा अश्वमेध डौलाने दौडतच आहे.

या टेकओव्हरसाठी मित्तल यांनी फ्रान्स सरकार, राजकारणी यांच्यासमवेत कशी फिल्डिंग लावली होती, यापूवीर् इतर देशांतील कंपन्यांचे टेकओव्हर करताना आलेल्या अडचणींना कसे तोंड दिले, यासंबंधीचा तपशील 'कोल्ड स्टील'मधून वाचताना या आगळ्यावेगळ्या पोलादी विश्वाची सफर केल्या सारखे जाणवते.
...............

कोल्ड स्टील

लेखक : टिम बुके व बायरन आवसी

प्रकाशक : लिटल ब्राऊन, लंडन

पाने : ३४०

किंमत : ६५० रुपये

Click here to Purchase

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive