Sunday, January 15, 2012

मुक्ती

मुक्ती म्हणजे काय

जन्म मृत्यू देहाला आहेत. मृतुसामयी शिल्लक राहिलेल्या इच्छा पुन्हा जन्म घेण्यास भाग पाडतात. !!!!!!सर्वसामान्य माणूस!!!!!! इच्छा विरहित कधीच नसतो. स्वाभाविक पणे त्याला जन्ममृत्युचा फेरा अटल आहे. त्यातून सुटावेसे वाटणे म्हणजे मुक्तीची इच्छा होणे होय. जन्म हे बंधन आहे यच्चयावत विश्व कोणत्या ना कोणत्या तरी बंन्धानात बद्ध आहेआहे कोणी दुसऱ्याच्या नियमात तर कोणी स्वतःच्या नियमात बद्ध आहे. म्हणजे मी ज्या ज्या वेळी करता आहे असे म्हणतो त्या त्या कोणत्याच वेळी मी करता नसतोच हि जाणीव होणे म्हणजे मुक्तीची जाणीव होणे. देहाच्या गुलामगिरीची कल्पना सर्वांनाच असते पण मनाची गुलामगिरी ती तर अव्याहत आहे त्याची मुक्ती हि मुक्तीची पाहिली इच्छा आणि हि जाणीव माणसाला फार क्वचित होते कारण माणूस भौतिक सुखाचा दास आहे आणि ते त्याला प्रिय आहे. हे सर्व स्वाभाविक आहे. पण क्षणिक मुक्ती व दीर्घकाळ बंधन हे मानवी जीवांचे कायम स्वरूप आहे ह्याचा जेव्हा वीट येतो तेव्हा मुक्तीची संकल्पना माणसाच्या मनात मूळ धरते. मुक्ती चार प्रकारच्या आहेत. तो विषय पुढे खूप मोट्ठे आहे पण आत्ता वर्णन केल्या वरुण आपल्याला प्रश्न असतील तर ते जरूर विचारा.

मुक्तीचे ४ प्रकार पाहण्यापूर्वी मुक्तीच्या देही कल्पना ज्या आपल्याला एक सर्व्सामान्न्या माणूस म्हणून सहज जाणवतात, समजतात, अनुभवायला येतात त्याचा विचार करू. मुक्तीचे चार प्रकार असे म्हणतात पण वास्तविक ह्या मुक्तीच्या चार पायऱ्या आहेत. कारण कोणत्याही माणसाला एखाद्या ठिकाणी जायचे असल्यास वाटेत खुणेचे दगड आणि चढण असल्यास पायरया असणारच. इथे हि तसेच आहे.
देही म्हणजे देहाच्या गरजा, अपेक्षा, श्वास-प्रश्वास , तहान, भूक, मैथुन, ह्यातून कोणताही सजीव सुटलेला नाही. आणि सामान्ण्यातः त्या गरजा ज्या नैसर्गिक आहेत त्या सर्व पुऱ्या होतात त्या प्रत्येक क्षणी माणसाला त्या क्षणापुरता तरी मुक्तीचा आनंद मिळतोच मिळतो. आणि इतर कोणत्याही आनंद पेक्षा मुक्तीचा आनंद हा अंतिमच असतो. पण देह त्याची गरज आणि देहबुद्धीमुळे माणसाला तो आनंद लक्षात राहतो. तो आनंद सतत मिळवण्यासाठीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा मिळावी असे सातत्याने वाटत राहते. आणि त्याच्या साठी माणूस सतत प्रयत्न करत राहतो हाच सर्वसामांन्य संसारी माणूस. आणि वास्तविक हि प्रक्रिया प्रत्येक माणसाच्या बाबतीत घडत असतेच असते. ----------------------मुळात एकदा त्या पुनरपि जन्मणाऱ्या इचेतूनच मुक्त व्हावे असे मात्र सर्वसामान्य माणसाला कधीच वाटत नाही त्यालाच देह बुद्धी म्हणतात. ह्या वारंवार होणाऱ्या इचेतूनच कायमचे एकदाचे मोकळे व्हावे मुक्त व्हावे हे वाटणे तो क्षण म्हणजे मुक्त होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात होय. आणि तसे इच्छामुक्त व्हावे हि एकमेव इच्छा निर्माण होणे हि अध्यात्माची म्हणा किंवा परमार्थाची सुरुवात आहे ------------तोपर्यंत जे जे कर्मकांड माणूस करतो ते ते त्याचे बहुऔशी नाटकच असते. पण ते नाटक आहे हे हि त्या बिचाऱ्याला त्याचे त्यालाच माहित नसते. त्या नाटकालाच तो धार्मिकता समजतो हे त्याचे दुर्दैव आहे. हे आजचे सामाजिक वास्तव आहे.

मुक्ती १ सलोकता -------इच्छा पूर्ण होऊन इच्छा मुक्त होणे, हाच मुक्तीचा पहिला प्रकार.----इच्छेतूनच मुक्त व्हावे हि खरोखरच अंतिम स्थिती आहे. हे वाटणे म्हणजे परमार्थाची खरी सुरुवात. हे जरी खरे असेले तरी ते वाटणे इतके सोपे हि नाही. माणूस हा एकटा राहू शकत नाही. एकटेपण माणसाला खायला उठते. तो द्वैताचा भुकेलेला आहे. त्यामुळे एकदम अद्वैताचे तत्वाञान सहजी त्याच्या पचनी पडत नाही. तो नेहमी कोणाना कोणाच्या सहवासाची अपेक्षा करतो. किंबहुना माणसाला एकटेपणाची भीती वाटते, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्या भावनेतून तो समाजात मिसळून राहतो. समाजाचा आधार त्याला वाटतो. तरीही तो त्याच्या विचाराच्या समाज गटातच राहतो. त्याच्या बाहेर तो जात नाही. त्याला ते सुरक्षित वाटत नाही. एखाद्याला दुसरया एखाद्या समाज गटात सहभागी होण्याची इच्छा होतच नाही असे नाही पण तो त्याच्या पेक्ष्या आर्थिक, सामाजिक, मानसिक, वरच्या समाज गटात सहभागी होण्यास उत्सुक असतोच असतो. म्हणजे त्या उच्च स्तरावरील लोक्सामुहाच्या सहवासाचे त्याला अप्रूप वाटत असते त्या लोकांमाद्ध्ये सहभागी व्हावे हि त्याची इच्छा असते. हा त्याच्यातील समाज मानाच्या इछेचा भाग असतो ती त्याची इच्छा पूर्ण होणे त्या समाजात राहण्याची इच्छा त्या समाजाने त्याला स्वीकारण्याची इच्छा पूर्ण होणे. इच्छा पूर्ण होऊन इच्छा मुक्त होणे, हाच मुक्तीचा पहिला प्रकार. हीच सलोकता मुक्ती होय. ह्यालाच पूर्वी स्वर्गलोक, चंद्रलोक. पृथ्वीलोक, पातळलोक वगैरे म्हटले जायचे आज हे सर्व प्रकारचे भोग आणि उपभोग आपल्या ह्याच पृथ्वीतलावर एकमेकात मिसळून नांदताना दिसतात म्हणून मी समज गट असा शब्द वापरला आहे.

मुक्ती २ समीपता ------------ देह सहवास. ----- हि स्वाभाविक सालोकतेनंतरची पुढची इच्छा. त्या समाजातील व्यक्तींपैकी कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या सहवासाची अपेक्षा अभिलाषा. सहवास म्हणजे मैत्री. हि पूर्वीच्या इच्छेतून निर्माण झालेली सहज इच्छा. आपल्याला आदर्श वाटणाऱ्या व्यक्तीचा सहवास लाभावा असे वाटणे. देहबुद्धी विरहित असलेली माणसाची प्रत्येक इच्छा नेहमी पुरी होतच असते. आपल्या बऱ्याच इच्छा देहबुद्धीच्या देह सुखाच्या असतात. त्यात अनेकांच्या अपेक्ष्यांचा पुंजका असतो. आणि त्या अर्थात एकमेकांशी विसंगत असतात. मग त्या जशाच्या तशा पूर्ण कश्या होणार? निरपेक्ष प्रेम असेल तर हि इच्छाहि पुरी होते. ह्या इच्छा पुर्तीलाच आपण (क्शनैइक) मुक्ती म्हणतो हि समीपता मुक्ती. निर्व्याज निर्व्याज निर्व्याज प्रेमाने माणूस आपलासा होतो.

मुक्ती ३ सरूपता --------- त्याच्या सारखे होणे. म्हणजे जी व्यक्ती आपल्याला आदर्श वाटते त्याच्या सारखे आपण व्हावे हि आपली स्वाभाविक इच्छा असते. आपल्या प्रत्येकाचा एक अनुभव आपल्या लहानपणाचा असेल तो म्हणजे प्रत्येकाला लहानपणी आपल्या शिक्षक किंवा शिक्शिकेसारखे व्हायचे असते. आणि मग आपण त्यांच्या सारखे कपडे करणे बोलणे एकूण सर्वच गोष्टींचे अनुकरण करणे सुरु करतो. आणि त्याच्या सारखे होण्याचा प्रयत्न करतो. हा माणसाचा सहज भाव आहे त्यातूनच आदरणीय व्यक्तींच्या सारखे होण्याचा माणूस प्रयत्न करतो. बाह्यात्कारे बौद्धिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा. अविरत प्रयत्नांनी तो त्यांच्या सारखा बनतो समाजात त्याला अपेक्षा असलेले मोठेपण मिळवतो. आपल्या आदर्श्या सारखा प्रयत्नपूर्वक बनतो. ती त्याची इच्छा पूर्ण होते हि झाली सरूपता मुक्ती. हे सर्व लिखाण करतांना मी एक समान्न्या माणूस म्हणून विचार व्यक्त करतो हीच गोष्ट मी जेव्हा पारमार्थिक दृष्ट्या करतो तेव्हा तिथे माझा आदर्श कोणीतरी सत्पुरुष असतो आणि मी त्याच्या सारखा होण्याचा प्रयत्न करतो. मन बुद्धी आणि अहंकार्रूपे त्याच्या सारखा होतो. देव हे नेमके काय आहे ते मला माहित नाही पण एखाद्या व्यक्तीवर जरी आपण निरपेक्ष निरपेक्ष निरपेक्ष प्रेम करत असू तरी ते ईश्वरावर प्रेम करण्यासारखेच आहे त्यात तसूभर हि फरक नाही. व्यक्तीवर प्रेम करणे हा प्रेमयोग आहे. हेच प्रेम ईश्वरावर करतो त्याला भक्ती योग म्हणतात.

मुक्ती ४ सायुज्यता -- अ ------------- पहिल्या तीन मुक्ती तृप्तीतून आहेत. पण इथे मुळात मनात निर्माण होणाऱ्या इछाच पूर्ण पणे थांबवायच्या आहेत. आपण स्वतः आपला जो आदर्श असतो तोच होणे. अंतर्बाह्य मी पण नष्ट होणे. ज्या सत्पुरुषाला आपण आदरणीय मानत असतो तोच होणे--- मनाने.---. हि सायुज्यता मुक्ती. सत्गुरू आपल्याला त्याच्या सारखा बनवतो हीच. आपले असे स्वतंत्र अस्तित्व मनाने राहातच नाही शरीर दोन असली तरी मन एकच असत. अद्वैताचा प्रत्यक्षानुभव. हा झाला एक अर्थ- दृष्टीकोन-विचार. दुसरा म्हणजे आपण जे पाहिले ३ प्रकार/पायऱ्या पाहिले/पहिल्या त्या भोग भोगून तृप्ती होते आणि त्या काळापुरता तरी माणूस इच्छा मुक्त होतो. पण त्यात एक गोष्ट लक्षात येईल कि प्रत्येक इच्छा पूर्ती नंतर दुसरी कोणतीतरी इच्छा निर्माण होते आणि सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण झाल्या तरी पुढे काय इच्छा संपतच नाहीत नवनवीन स्वरुपात पुन्हा पुढे दत्त म्हणून उभ्या राहतात. आणि एक क्षण असा येतो ह्या इच्छांना अंत नाही त्या इछाच थांबल्या शिवाय मुक्तता नाही. हि जाणीव माणसाला होते. त्यासाठी तो प्रतन करतो. हि मुळात इच्छान्तुनच मुक्त होणे म्हणजे सायुज्यता मुक्ती. ह्याला उपाय काय? एक म्हणजे हि इच्छा अंतिम मुक्तीची इच्छा पूर्वानुभवातून निर्माण होते. आज पर्यंतचा अनुभव माणसाला तेच तेच पुनः पुन्हा करायला भाग पडतो तोच अनुभव माणसाला त्या संसारच वीट निर्माण करतो. त्यातून विरक्ती येते. आणि मुळात इच्छा निर्माण होण्याच्या प्रवृत्तीतून मुक्त व्हावे अशी इच्छा निर्माण होते. पण हे घडायला फार मोठ्ठा काल लागतो. तो वर्षात मोजता येत नाही तर अनेक जन्मात मोजावा लागतो कारण दृष्याचे प्रेम माणसाला देहाभोगात बुडवून ठेवते. हि झाली सर्व सामान्न्यांची कथा.

मुक्ती ४-- क - सायुज्यता -------------ह्यासाठी माणूस सत्गुरू म्हणजे --- त्यातला जाणता माणूस --- त्याला शरण जावून त्याच्या कडून शिकून घेऊन कठोर अभ्यास करतो --------- राजयोग. कधी परमेश्वरावर श्रद्धा ठेऊन निष्ठेने हीच गोष्ट साध्य करतो ------ भक्तियोग. कधी सर्व विश्वावर प्रेम करून साद्ध्य करून घेतो---प्रेम योग. कधी फलाशा सोडून कर्म करून मुक्त होतो---कर्मयोग. कोणी विचार आणि विवेक म्हणजेच न्यानाच्या आधारे मनाला उच्च स्थरावर नेतो ----------- न्यानायोगी ह्या पैकी कोणत्याही एका किंवा सर्व मार्गांचा अवलंब करून माणूस मुक्ती साधू शकतो. मुक्तीची साधना हा एकच प्रकार असा आहे कि तो एकापेक्षा जास्त म्हणजेच चारही मार्गांचा अवलंब करता येतो हा एक आश्चर्याचा भाग आहे. खरे तर ठिकाण एकच आहे. पण ठिकाण हे केंद्र मानले तर त्याच्या कडे वेगवेगळ्या दिशांकडून येणारे मार्ग भिन्नच असणार मी जर त्या ठिकाणच्या उत्तरेला असेन तर मी दक्षिणेला गेल्यावर मला ते ठिकाण लाभणार आहे त्या उलट मीच जर दक्षिणेला असेन तर मला त्याचा एकाच ठिकाणी जायचे असेल तर मला उत्तरेकडे चालत जावे लागेल म्हणजे दोन विरुद्ध दिश्यांना असणाऱ्या माणसांचा एकाच ठिकाणी जाण्याचा मार्ग कधीच एक असणार नाही. त्यामुळे सर्व सामान्नातः आपण जर एक मार्ग निवडला तर त्याच मार्गाने मार्गक्रमण करणे हेच योग्य आहे इतकेच काय तर दुसरा मार्ग असणारही आहे पण तो आपल्यासाठी नाही व त्या मार्गाने जाणाऱ्याला आपल्याच मार्गाने जाण्याचा आग्रह करणे ही योग्य नाही.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive