पुस्तक नशिबात असावं लागतं!
Book must have to written in your destiny!!
माझ्या सोबतीला असणा-या एका मित्राने एक पुस्तक समोर धरलं आणि म्हणाला, 'हे टाकू या का?' मी पाहिलं तर पुस्तक अगदीच जीर्ण स्थितीत होतं. मी 'हो' म्हणालो, पण लगेचच त्याच्या हातातून ते घेऊन ओल्या फडक्याने पुस्तकावरचा चिखल साफ केला... अचानक आधी नजरेस पडली ती T. E. D. KLEIN ही इंग्रजी अक्षरं आणि नंतर DARK GODS .
' भयकथाच वाचायच्या असतील तर, डार्क गॉड्स वाचा. टेड क्लेनचं!' मराठीतील एका मोठ्या लेखकानं मला हे सांगितलं. ते १९९९ साल होतं. लेखक माझ्या आवडीचे आणि त्यातनं मितभाषी असूनही ते त्या विशिष्ट पुस्तकावर तेव्हा खूपच खुलून बोलले. त्यांचं ते बोलणं ऐकून मी प्रचंड उत्तेजित झालो. कोणत्याही परिस्थितीत हे पुस्तक मिळवून वाचायचंच, हे मनाशी ठरवूनच टाकलं. त्यांच्या घरातून बाहेर पडताच मी एसपी कॉलेजच्या समोरच असणाऱ्या एका दुकानात गेलो. फक्त भारतात लोकप्रिय असणाऱ्या लडलम, शिल्डनसारख्या लेखकांची बहुधा पायरेटेड पुस्तके विकणाऱ्या त्या दुकानात अर्थात या लेखकाचं नावही माहीत नव्हतं. तेथून थेट डेक्कनवर इंटरनॅशनल बुक सव्हिर्सेसमध्ये गेलो. तिथेही नकार मिळताच पॉप्युलर झालं. कुणीही इंग्रजीतील त्या लेखकाचं नावसुद्धा ऐकलं नव्हतं. मी तात्काळ ज्यांनी मला त्याविषयी सांगितलं होतं त्या लेखकांना फोन केला. ते पुस्तक कुठेही मिळत नाही हे सांगितलं. तर ते हसून म्हणाले, 'पुस्तकं अशी सहज मिळत नाहीत. ती नशिबात असावी लागतात.' पुढे त्यांचं हे वाक्य मला एका नाही तर अनेक पुस्तकांच्या बाबतीत अगदी शब्दश: पटलं. पुस्तकं नशिबात असावी लागतात! ती नशिबात असतील तर, स्वत:हून तुमच्याकडे चालत येतात, अन्यथा जग उलथलं तरी ती हाती लागत नाहीत.
गूढकथेची लोकप्रियता जगभर अफाट असली तरी तिची मौलिकता जोखण्यात जागतिक पातळीवरच निरुत्साह असतो. त्यातून माझ्या लक्षात आलेली दुसरी गोष्ट अशी की, भारतात बहुधा फक्त अशाच पुस्तकांचा शोध घेतला जातो, जी परदेशात लोकप्रिय आहेत. अखेर २००५ साली अमेरिकेत राहणाऱ्या एका नातलगाला मी 'डार्क गॉड्स' अमेरिकेतून आणण्यास सांगितलं. रिकाम्या हाती भारतात परतल्यावर त्याने उत्तर दिलं- 'हे पुस्तक अॅमेझॉनवरही नाही.' अॅमेझॉनवर नाही म्हणजे अस्तित्वातच नाही. पुस्तक आणता आलं नाही म्हणून तो कदाचित खोटं बोलत असावा, असं वाटून मी तेच पुस्तक अमेरिकेतील एका मित्राला आणायला सांगितलं. त्यानेही थोड्याफार फरकाने हेच उत्तर दिलं.
दरम्यान मुंबई-पुण्यात इंग्रजी भयकथा लेखकांची पुस्तकं फारच थोड्या प्रमाणात उपलब्ध होती. अॅन राईस, जॉन सॉल, डीन कुन्ट्झ वगळता फार काही पर्याय उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीत 'डार्क गॉड्स' नावाचं पुस्तक अस्तित्वात असेल आणि आपल्या हाती लागेल यावरचा माझा विश्वास हळूहळू कमी होऊ लागला होता.
अगदी इंटरनेटवर शोधूनही या पुस्तकाचा उल्लेखही मला कुठे सापडला नव्हता. त्यामुळे कदाचित त्या लेखकांनी मला काहीतरी वेगळं नाव सांगितलं असावं आणि मी काहीतरी वेगळं ऐकलं असावं असा समज झाला. पण एके दिवशी ब्रॅम स्टोकर या ड्रॅक्युलाच्या जन्मदात्याच्या नावाने भयकथांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचा इंटरनेटवर शोध घेताना मला अचानक या पुस्तकाचं नाव विजेत्यांच्या यादीत दिसलं!
पुस्तकाचं नाव DARK GODS असंच होतं. पण लेखकाच्या नावात थोडा गोंधळ होता. टेड क्लेनचं स्पेलिंग तेथे T. E. D. KLEIN असं दिलं होतं. पुन्हा अमेरिकेतील काही परिचितांना मेल केल्या. पण पुस्तक काही हाती लागलं नाही. दरम्यान बराच काळ गेला. २००९ साल उजाडलं. पुण्याच्या बाजीराव रस्त्यावर मराठीतील नुकत्याच दिवंगत झालेल्या एका ज्येष्ठ लेखकाचा वैयक्तिक पुस्तकसंग्रह विकायला आलेला आहे, अशी बातमी मिळाली. मी तात्काळ तेथे धाव घेतली. त्या विक्रेत्याने ती पुस्तकं तेथे विकायला ठेवून दोन-चार दिवस झाले होते. बरीच पुस्तकं संपली होती. उरलेली सर्व पुस्तकं विकत घेतो असं सांगून मी सौदा ठरवला. संध्याकाळी त्याच्या घरी जाऊन पुस्तकं पोत्यांत भरली. पुस्तकं अक्षरश: मरणासन्न अवस्थेतील होती. काहींच्या चिंधड्या उडालेल्या तर काहींची लक्तरं झालेली! पण एकेका पुस्तकाचं नाव मला अधिकाधिक उत्तेजित करत होतं. माझ्या हातात इंग्रजीतील काही दुमीर्ळ, महत्त्वाच्या आणि वैविध्यपूर्ण पुस्तकांचा खजिनाच लागला होता. एकूण सहा मोठी पोती भरली. जागेअभावी मी पुस्तकं एस.टी.तून माझ्या गावी नागोठण्याला नेली. गावी बसस्थानकावर काही मित्रांना बोलावलं होतं. ती पोती उतरवताना परिचित हे काय भंगार आणलं आहे, अशा नजरेनं पाहत होते.
घरी गेल्यावर लागलीच पुस्तकांचं सॉर्टिंग करायला सुरवात केली. चांगल्या स्थितीतील, बऱ्या स्थितीतील, वाईट स्थितीतील अशी वेगळी करत घेतली. दोन दिवसांत चार पोती झाली. उरलेली नंतर पाहू असं मनाशी ठरवून पुण्यात परतलो. मिळालेल्या पुस्तकांच्या आनंदात आणि ती वाचण्यातच वर्ष दोन वर्ष गेली. उरलेली दोन पोती मी विसरूनच गेलो होतो. चार महिन्यांपूवीर्, दिवाळीच्या थोडं आधी पुन्हा एकदा ती उरलेली पोती उपसत बसलो. त्या पोत्यांतील सर्व पुस्तकांवर धुळीचे, त्या धुळीवर आर्दता अथवा पाण्याच्या संपर्काने चिखलाचे अक्षरश: थर जमले होते. ओल्या फडक्याने मी पुस्तकांची कव्हर्स पुसत होतो आणि पुस्तकाचं नाव वाचत होतो. माझ्या सोबतीला असणाऱ्या एका मित्राने एक पुस्तक समोर धरलं आणि म्हणाला, 'हे टाकू या का?' मी पाहिलं तर पुस्तक अगदीच जीर्ण स्थितीत होतं. मी 'हो' म्हणालो, पण लगेचच त्याच्या हातातून ते घेऊन ओल्या फडक्याने पुस्तकावरचा चिखल साफ केला... अचानक आधी नजरेस पडली ती T. E. D. KLEIN ही इंग्रजी अक्षरं आणि नंतर DARK GODS .
ज्या लेखकाने मला 'डार्क गॉड्स'विषयी सर्वप्रथम सांगितलं होतं ती आणि ज्यांच्या संग्रहात मला ते पुस्तक सापडलं होतं ती एकच व्यक्ती होती. ती व्यक्ती म्हणजे मराठीतील प्रसिध्द भयकथालेखक दिवंगत नारायण धारप! ... आणि त्यांनीच मला सर्वप्रथम म्हटलं होतं की, पुस्तक नशिबात असावं लागतं!

No comments:
Post a Comment