Thursday, October 4, 2012

आपण यांना ओळखलंत का?

प्रेक्षकांच्या मनात आजही बालकलाकार(child artist) म्हणून त्यांची प्रतिमा ताजी आहे. पण , तेच चेहरे आता हिरो-हिरोइन म्हणून ग्लॅमर इंडस्ट्रीत एंट्री घेतायत. ज्या मुख्य कलाकारांबरोबर त्यांनी तेव्हा काम केलं त्यांनाच टक्कर द्यायला आता नव्या दमाची ही फळी तयार झालीय.

बालकलाकार म्हणून प्रसिद्ध झालेले अभिनेते-अभिनेत्री बऱ्याचदा मोठेपणी ग्लॅमर जगतातच करिअर करतात. हाच कित्ता गिरवत , दहा-बारा वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या बालकलाकारांची फौज ग्लॅमर जगतात एंट्री करतेय. गंमत म्हणजे प्रेक्षक अजूनही या कलाकारांना बालकलाकार म्हणूनच ओळखतात. पण तेव्हा त्यांच्याबरोबर काम केलेल्या प्रमुख कलाकारांना टक्कर द्यायला टीनएजमधल्या या कलाकारांची फळी सिद्ध झाली आहे.

काही वर्षांपूर्वी आलेला ' कभी खुशी कभी गम ' प्रेक्षकांना आजही आठवत असेल. त्यात करीना कपूरच्या लहानपणीची भूमिका साकारणारी मालविका राज(Malvika Raj) त्या सिनेमानंतर काही वर्ष गायबच झाली होती. पण तिने कॉमर्समध्ये नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्याबरोबरच बॉलिवुडमध्ये हिरोइन म्हणून एंट्री करायची तयारीही तिने सुरू केली. सध्या मालविका काही आंतरराष्ट्रीय जाहिराती करतेय. तर फेमिना मिस इंडियासाठी स्पर्धक म्हणून ती होती.
' कुछ कुछ होता है ' मध्ला तारे मोजणारा छोटा शीख परझान दस्तूर(parzan dastur) प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. बालकलाकार म्हणून त्याने अनेक सिनेमे आणि जाहिरातींत काम केलं. त्याने ' सिकंदर ' या सिनेमातून क्यूट बालकलाकार ही स्वतःची इमेज ब्रेक केली. आता टीनएजमधला अभिनेता म्हणून त्याच्याकडे ऑफर्स यायला सुरू झाल्या आहेत. ' ब्लॅक ' या सिनेमात राणी मुखर्जीच्या लहानपणीची भूमिका साकारलेल्या आएशा कपूरनेुसद्धा(Aisha Kapoor) परझान दस्तूर सोबत ' सिकंदर ' मध्ये आपण मोठं झाल्याचं दाखवून दिलं. सध्या आएशाकडेुसद्धा मुख्य भूमिकांसाठी स्क्रीप्टस येत आहेत. त्याशिवाय अभिनयाबरोबरच बॉलिवुडची स्टाईल डिझायनयर म्हणून ती स्वतःचं स्थान निर्माण करतेय.

' कुछ कुछ होता है ' मधली शाहरुखची मुलगी झालेली अंजली म्हणजेच साना सईद(sana Said) करण जोहरच्याच ' स्टुडंट ऑफ द इयर ' ची हिरोइन बनून येतेय. तिच्या सोबत ' संघर्ष ' मध्ये लहानपणीची प्रिती झिंटा साकारलेली आलिया भट्टसुद्धा(aliya bhatt) या सिनेमाची मुख्य हिरोइन म्हणून येतेय. ' तेरा मेरा साथ रहे ' या सिनेमात अजय देवगणच्या लहान भावाची भूमिका साकारणारा आणि त्या भूमिकेतून भरपूर कौतुक झालेला दुष्यंत वाघ(dushyant wagh) हा मराठमोळा बालकलाकार ' थ्री इडियट्स ' मध्ये मिलिमिटरच्या भूमिकेत दिसला होता. त्याशिवाय ' ना बोले तुम ना मैने कुछ कहा ' मध्ये महत्वाची भूमिका करतोय.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive