Tuesday, May 25, 2010

“माझ्या चुकीची तू पुनरावृत्ति करू नयेस.”

"माझ्या चुकीची तू पुनरावृत्ति करू नयेस."

"जीवनात, तुझ्या स्वपनाला तू कधीही तिलांजली देऊ नकोस, स्वतःचं अस्तित्व विसरू नकोस नाहीपेक्षा सगळं आयुष्य तू पश्चातापात घालवशील."

"माझ्या आईनेच भर देऊन समझोत्याचं महत्व काय याची मला कल्पना दिली होती. पण नकळत तिच्याच कृतीला शरणागतीचा दर्प येत होता.तिचं संगोपन जुन्या वळणाच्या परंपरेच्या घरात झालं असल्याने,घरातला सर्व कर्तव्याचा भार तिच्याच डोक्यावर पडला होता.मुख्य कारण म्हणजे ती सर्वात मोठी होती आणि सगळ्यांना तिच्याकडून सहनशीलतेची अपेक्षा होती."
रंजना आपल्या आईची आठवण काढून आम्हाला सांगत होती.

त्याचं असं झालं,मी रंजनाला माझ्या मुलीची मैत्रीण म्हणून लहानपणापासून ओळखत होतो.रंजनाच्या ऐन पंचविशीत रंजनाची आई तिला सोडून गेली होती.माझी मुलगी आणि मी तिला भेटायला तिच्या घरी गेलो होतो.रंजनाचं नुकतंच लग्न झालं होतं.

रंजना आम्हाला आपल्या आईबद्दल पुढे सांगू लागली,
"
वयाने मोठी झाल्यानंतर ती तशीच होती.आत्म-त्यागी होती आणि कसल्याही कौतूकाला अपात्र होत होती.मी मोठी होईतोपर्यंत तिने हीच भुमिका घेतली होती.आणि हळू हळू ही, तिच्या हौतात्म्याची विशिष्ठता, माझ्या व्यक्तिमत्वात झिरपत गेली.बहूमताचा विजय मानणं माझी आई पसंत करायची.मी पाहिलं की,ह्या वृत्तिने इतरांबरोबर चालवून घ्यायला सोपं व्हायचं.आणि मोठी अडचण आल्यावर तक्रार असो वा समस्या असो त्यांना
फालतू समजलं जायचं "

मी रंजनाला म्हणालो,
"
प्रत्येक कुटूंबात एकतरी "कानफाटा" असतोच.ज्याच्यामुळे घरात  वैताग निर्माण होण्याचे आणि अश्रू ढाळण्याचे प्रसंग येतात.आणि तसंच कुणीतरी त्याच कुटूंबात दुसरा एखादा नेहमीच राजी करण्यात आणि अतिप्रसंग होण्यापासून टाळण्याच्या प्रयत्नात असतो."

रंजना म्हणाली,
"
आमच्या कुटूंबात मी दुसर्या प्रकारची व्यक्ति होते.काहीही गैर होऊं द्यायचं नाही ह्या वृत्तिने रहाण्याच्या मी सतत प्रयत्नात असायची.
मग माझ्या शाळेत माझ्या शिक्षांबरोबर,खेळाच्या मैदानात माझ्या मैत्रिणी बरोबर,माझ्या नात्या-गोत्यात आणि नक्कीच माझ्या कुटूंबातल्या व्यक्तिबरोबर मी त्या वृत्तिने वागायची.
जेव्हा कधी कसलाही बेबनाव व्हायचा प्रसंग आला,की मला वाटायचं की मीच पुढाकार घेऊन सर्व सुरळीत करायला हवं.आणि जर का काहीच जमलं नाही तर मी समजायचे की मीच अपयशी झाले.
माझी आई तिच्या साठाव्या वयावर आणि त्याचवेळी मी माझ्या पंचवीशीत असताना आम्ही दोघं सारख्याच समस्येशी दोन हात करीत होतो.शेवटी मला जाणीव झाली की तिला मलाच काहीतरी सांगायचं होतं."

रंजनाचं बोलणं ऐकून चटकन माझ्या मनात एक गोष्ट लक्षात आली आणि ते मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला.
"
एक गोष्ट तुझ्या अजिबात लक्षात आली नसावी आणि ती म्हणजे कदाचीत तुझ्यात ती स्वतःला पहात असावी, आणि आपण सापडलेल्या सापळ्यातून तुझी सुटका करण्याच्या ती प्रयत्न करीत असावी.माझं म्हणणं कदाचीत तुला चुकीचं वाटत असेल."
माझं म्हणणं ऐकून रंजना थोडी विचारात पडली.

"तुमचं म्हणणं मला एकदम पटलं."
असं म्हणत रंजना सांगू लागली,
"माझ्या आईच्या स्वभावातला दोष मी चांगली तरूण होईपर्यंत माझ्या लक्षात आला नाही.माझ्या बाबांनी घालून-पाडून केलेल्या आलोचनेचा ती कसा विस्फोट करायची आणि वैतागून तिच्या कपाळावर आठ्या कशा यायच्या हे माझ्या लक्षात यायचं.
मी तिच्याबरोबर एकटी असताना पाहिलंय की बर्याच कटकटीपायी तिचं मन खट्टू व्हायचं.ती माझ्या डोळ्यात डोळे घालून मला सांगायची
"जीवनात तुझ्या स्वपनाला तू कधीही तिलांजली देऊ नकोस, स्वतःचं अस्तित्व विसरू नकोस नाहीपेक्षा सगळं आयुष्य तू पश्चातापात

"मग पुढे काय झालं?"
माझ्या मुलीने रंजनाला कुतूहल म्हणून

"अनेक घटनां झाल्या असताना मी माझ्या आईला सामना करताना पाहिल्याचं आठवतं. तिच्या जीवनात तिने स्वतःकडे दुर्लक्ष करून दुसर्यासाठी किती मेहनत घेतली आहे हे मी पाहिलं आहे. पण त्यावेळी मला त्याची जाणीवही झाली नाही.मला कळत नव्हतं की ती मला असं का सांगायची  कदाचीत मला मी दोषी समजावं म्हणून असेल.मी मला दोषी समजायची.आणि मी माझी त्याबद्दलची नाराजी तिलाबोलूनही दाखवायची."
रंजना सांगत होती.
पुढे म्हणाली,
"अलीकडे झालेल्या एकामागून एक घटनेचा दुवा आणि त्यात मी पूरी डुबून गेल्याचं पाहून माझा अगदी कडेलोट झाल्याचं मला वाटू लागलं. माझा वापर केला जातोय आणि माझ्याकडून फायदा उपटला जातोय जणू मी स्वतः काही घेता दुसर्यासाठीच करावं हे धरून चाललं जात होतं.कधी कधी मी कोलमोडून जाऊन मला रडकुंडीला आल्याचं पाहिलं आहे.ह्या परिस्थितितून गाढ निद्राच माझी सुटका करायची.इतर कशाहीपेक्षा मी माझ्यावरच रागवायची."

मी रंजनाचं सान्तवन करीत म्हणालो,
"
आता बोलून काय उपयोग.व्हायचं ते होऊन गेलं.तुझ्या आईचा इरादा चांगला होता.तिच्याकडून  झालं ते तुझ्याकडून होऊ नये यासाठी ती तुला अनेक मार्गाने सुचवायचा प्रयत्न करीत होती.कधी ती तुला स्पष्ट सांगायची तर कधी खट्टू मनाने पण तुला बोलता तुझ्या लक्षात आणून द्यायची.
सांगण्याच्या पद्धति जरी निरनीराळ्या असल्या तरी संदेश एकच होता.
"
माझ्या चुकीची तू पुनरावृत्ति करू नयेस."

आम्ही जायला निघालो तेव्हा रंजना शेवटी म्हणाली,
"
मी तिच्यावर प्रेम करायची आणि मला तिच्याबद्दल आदर वाटायचा तरीसुद्धा मला तिचं जीवन जगायचं नव्हतं.शरणागती पत्करण्यापेक्षा,खंबिर कसं रहायचं ते तिने माझ्या मनात भरवलं होतं.आणि माझी पण खात्री झाली आहे की ज्याने त्याने स्वतःसाठीच जगायचं. दुसर्यासाठी नव्हे."

मी रंजनाला जवळ घेत म्हणालो,
"
ह्या तुझ्या विचाराने तुझ्या आईच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळेल."

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive