दुसर्या महायुध्दात ज्या माणसाने हिटलर सारख्या प्रशाशकाच्या एका मोठ्या जनरल रोमेलला युध्दात हारविले त्या फिल्ड मार्शल माँटगॅमेरीने एक पुस्तक लिहीले आहे A Consise history of Warfare. ह्या पुस्तकात त्याने जगातील महत्वाच्या लढायांचा आढावा घेतला आहे. या लढाईतील एक लढाई म्हणजे निझाम व पहिला बाजीराव यातील पालखेडची लढाई.
हा छोट्याश्यालेखातुन आपल्या बाजीराव पेशव्याची एक नविन ओळख तुम्हाला होईल. मुळ लेखन इंग्रजीत असल्यामुळे ( मी भांषातर करु शकलो असतो पण फिल्ड मार्शल माँटगॅमेरी जे बाजीरावाबद्दल लिहीतात तेच लिहावे वाटले म्हणुन ईंग्रजीत लिहीले आहे.
या पुस्तकात प्राचीनकाळापासुन लढाया कशा होतात ( का होतात हा विषय वेगळा) व जगातील काही महत्वाची युध्दे घेतली आहेत. अशी युध्दे निवडताना नेत्याचे युध्द कोशल्य, त्या काळातील राजकारण, महत्वाचे व्यक्ती व त्या युध्दानंतर होनारे समाजव्यवस्थेतील बदल हे मांडले आहे. हयात आपल्या बाजीराव व निझाम यांचे पालखेडला झालेले युध्द आहे ज्याने तत्कालिन राजकारणावर दुरगामी प्रभाव पडला व सत्ता खर्या अर्थाने शाहु कडुन पेशव्याकडे आली.
पार्श्वभुमी निझाम्-उल्-मुल्क त्याआधी दिल्लीहुन सेना घेऊन दक्षीन सुभा सोडवायला बाहेर पडला होता. निझाम हा ओरंगजेबाच्याकाळातील लढवय्या. त्याने अनेक देश पाहीले होते व अनेक लढाया त्याने स्वबळावर जिंकल्या होत्या. शाहु महाराज सुटून आल्यावर त्यांनी " जुने मोडु नये नविन करु नये" ही " स्ट्र्टजी घेतली होती. त्यांना मोगलांशी लढाया नको होत्या कारण त्यामुळे नविन गोष्टी प्रस्थापीत झाल्या असत्या पण त्याच वेळेस त्यांना बादशाहे तत्वतः मान्य केलेली दक्षिनेतील चोथाईची सनद हवी होती. निझामाला स्वतः सुभेदार व्हायचे होते व झालेच तर पुढे मागे स्वतंत्र राजाही व्हायचे होते. त्यामुळे त्याला दक्षिनेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासुन पाय रोवनार्या मराठ्यांना हारविने भाग होते हे ओघाने आलेच. ह्या लढाया १७२७ च्या शेवटास ते १७२८ च्या सुरुवाती पर्यंत चालल्या. १७२७ मध्ये शाहुचा सरलश्कर सुलतानजी निंबाळकर हा निझामाला मिळाला. तर कोल्हापुरकर छत्रपती संभाजी (दुसरा) याने निझामास युध्दात मदत केली.
नमनाला घडाभर तेल न ओतता आता मी तो प्यारेग्राफ देतो.
The palkhed campaign of 1727-28 in which Baji Rao I outgeneralled Nizam-ul-Mulk, isa master piece of strategic mobility. Baji Rao's army was a purely mounted froce, armed only with sabre,lance, a bow in some units, and a round shield, there was a spare horse for every two men. The Marathas moved un-encumbered by artillery, baggage, or even handguns and defensive armour. They supplied themselves by footing. Bajo Rao resented the Nizam's rule over the Deccan and feared his deplomacy. And it was he who struck the first blow. In Oct 1727 as soon as the rainy season ended, Baji Rao burst into the territory of the Nizam. The ligehtly equipped Marathas moved with great rapidity, avoiding the main towns and fortresses living off the country, burning and plundering. They met one reserve as the hands of the Nizam's able lieutenant, Iwas Khan , at the beginning of November, but within a month they had fully recouped and were off again, dashing east, north, west, with sudden changes of direction. The Nizam had mobilized his forces and for a time pursued them, but he was bewildered by the swift and impredictable movemennts of the enemy and his men became exhausted. At the end of January the Nizam changed his strategy; he gave up the pursuit of the elusive Maratha forces and instead made direct for his heartland around Poona, which he captured and ravaged. Baji Rao received urgent calls to come back. but with good strategic sense he resisted the call and instead countered the Nizam's move by in turn threatening his capital Aurangabad. Nizam predictabaly evacuated the Poona district and returned to rescue Aurangabad. Baji Rao had not actually captured the capital, but he had pillaged the neighbouring area. As the Nizam had once again endeavoured to catch Baji Rao, the Marathas harried & circled round his forces. The Nizam preserved his army intact, but in March 1728 he gave. The Marathas returned home laden with plunder and by the peace terms some of their territorial claims conceded.
फिल्ड मार्शल माँटगॅमेरी - A CONCISE HISTORY OF WARFARE
बाजीरावा युध्दातुन माघार घेऊन जळगावाकडे सरकल्यावर निझामाने पुण्यावर चढाई केली व आजुबाजुचा परिसर ताब्यात घेऊन विध्वंस सुरु केला. त्याला बाजीराव अवघड अजिंठा मार्गाने ओरंगाबादवर येईल हे वाटले नाही पण आपल्या पायी चालनार्या मावळ्यांनी मुक्काम न घेता अजिंठा पार पाडुन ओरगांबादला धडक दिली व दिल्ली दरवाजा ताब्यात घेतला. शहरावर हल्ला झालाच नाही व हुल ऊठवल्या गेली. निझाम वापस येताना पेशवा ओरंगाबादेतुन ऊठुन नाशकाकडे निघाला. निझामाने परत पाठलाग सुरु केला. बाजीरावाला कुठे थांबायचे हे आधीच माहीत असल्यामुळे त्याले पालखेड हे नदी काठचे गाव गाठले. नदिला पल्याड ठेवुन भली मोठी छावनी उभी केली. निझाम पाठलग करत पालखेडला आला व छोट्या मोठ्या लढायांना तोंड फुटले. निझामी सैन्याला नदि पल्याड असल्यामुळे पाणि भेटेनासे झाले. पाण्याल्या काबुत ठेवुन निझामाला बाजीरावाने जेरीस आणले. निझामी सैन्यात महागाई सुरु झाली. पाणि, अन्नावरुन आपापसात भांडने सुरु झाले व सैन्याचा घिर खचला. अशातच बाजीरावाने दुसरी आघाडी उघडली. पाणि नाही दोन्हीकडुन बाजीराव अशा स्तिथीत निझामाला शरन येन्याशिवाय पर्याय राहीला नाही. (अशीच परिस्तिथी सदाशिव भाऊ ने अब्दालीवर आणली होती पण .....)
फलप्राप्ती व नंतरचे राजकारण ( माझे विवचन. हे त्या पुस्तकात नाही)
निझामाने शरनागत येऊन पुढील पाच वर्षासाठी निझाम मराठा युध्द होनार नाही, मराठ्यांना चोथाईचा हक्क व नुकसान भरपाई भरने असा तह बादशहाकडुन मान्य करुन घेतला. व लढाई संपली. निझामाने मराठ्यांच्या भयाने त्याची राजधानी ओरंगाबादहुन हलवुन भागानागर (हैद्राबाद) ला पुढे केली. पुढील काही वर्षे दक्षिनेकडे निझामाकडुन शांतता होती. नंतर थोरल्या नानासाहेब पेशव्याने निझामाला परत एकदा मात देऊन बाजीरावाचा तह कायम करुन घेतला. शाहु लढाया न करता प्यादे हलवत होता तर हा तरुन पेशवा खर्या अर्थाने मुख्य प्रधान झाला व सुत्रे पुण्याकडे आली. जर या लढाईस भोसलेपणाला जागुन शाहु जाता तर कदाचित पेशवाई निर्मान झाली नसती व स्वतः छत्रपतीच युध्दाला जातो म्हणुन सर्व सरदार एकदिलाने पुढे लढु शकले असते. मराठा मंडळ जे राजाराम मुळे अस्तित्वात आले ( यावर एक मोठा लेख होऊ शकतो) ते नष्ट करता येऊन एकछत्री अमंत प्रस्थापित करता आला असता. पण शाहु तेवढा धैर्यशाली न्हवता. निट विचार करता हे युध्द ज्या गोष्टीसाठी झाले (दक्षिन सुभा चोथाई हक्क) त्यामुळे मराठे हे खर्या अर्थाने दिल्लीकर बादशाहाचे मांडलीक बनले. दिल्लीवर संकट आले तर मराठे धावुन जानार व मराठ्यांची फोज दिल्ली रक्षनासाठी दिल्लीत राहानार असा करार नंतर परत झाला. म्हणजे ज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व नंतर छत्रपती राजाराम महाराज व ताराबाई ने अहोरात्र मेहनत घेतली ती शाहुने अशी वाया घालवीले व मराठेशाहीला मांडलीकाचे रुप आनले. यातुनच पुढे दिल्ली रक्षनासाठी पाणिपत घडल्याचे वाचकांचा लक्षात येईल. जर शाहुने चोथाई नाकारुन प्रदेश कब्जाकेला असता तर नविन स्वराज्य वाढन्यास मदत झाली असती.
No comments:
Post a Comment