रिसेशन येती घरा !
" बर्याच दिवसात घरी आला नाहीस ? इकडे आलो होतो , म्हटलं जरा चक्कर टाकावी . कसा आहेस ? "
" बरं काय घेणार चहा , की कॉफी ? "
" स्नेहा , दोन कप चहा टाक गं , सागर आलाय ".
" सागर , एक्चुअली थोडा प्रॉब्लेम झालाय. " गजाचा आवाज खोल गेला .
" आपण उद्या दुपारी भेटु . मी बॅंकेत येतो " . गजा म्हणाला .
" ओके . टेक केअर . " मी गजाच्या खांद्यावर थोपटत म्हणालो.
दुसर्या दिवशी कामात लक्षच लागेना . दुपारची वाट बघत बसुन राहिलो . एक वाजता गजा आला .
" सागर आपण बाहेरच लंचलाच जाउ या . आर यु फ्री ? "
" या शुअर . जरा पाच मिनिट थांबतोस ? मी चाव्या साहेबांकडे देउन येतो. "
साहेबांना चाव्या दिल्या आणि बॅंकेसमोरच्याच एका चांगल्यापैकी हॉटेलात गेलो . ऑर्डर दिली .
" आता बोल गजा . काय प्रॉब्लेम ? "
" अरे एक्चुअली - काय झालय ? स्नेहाला त्यांच्या कंपनीने पिंक स्लिप दिलीये . "
" मग काय ? त्याचा अर्थ आपण रिझाइन करायच किंवा एक महिन्याने कंपनी आपल्याला काढुन टाकणार ."
मला ही गोष्ट माहित असल्याचे मी बोललो नाही . गजा अत्यंत भावनाविवश झाला होता .
" त्याच्यावर काय चिडतोयंस गजा ? ही सवय तुम्हीच लावली ना त्याला ? "
"गजा चिडु नकोस . हे बघ ,या सगळ्या सवयी तूच लावल्यांस ना त्याला . मग बदल . त्यात अवघड ते काय आहे ? "
संध्याकाळी घरी आलो. फ्रेश झालो . पेपर हातात घेउन बसलो.गौरी म्हणाली
मी चरकलो .डोळ्यासमोर गजा उभा राहीला.
ताडताड पाय आपटत गौरी मधे निघुन गेली. मला गजाचे शब्द आठवले
' एकवेळ माणसेच बदलणे शक्य आहे पण त्यांना लागलेल्या सवयी ,अशक्य ! '
या बदलत्या जगाने माझेच घर कधी विळख्यात घेतले होते , माझे मलाच कळाले नव्हते !
No comments:
Post a Comment