Tuesday, May 25, 2010

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ||

श्लोक ऐकता ऐकता विचारांचे वादळ सुरू झाले......देवी भगवती, आदिमाया, शिवस्वरूपा,चंडीका, काली, पार्वती अशा अनेक नावांनी जाणली जाणारी ही देवी आहे तरी काय? हिचे स्वरूप काय ?? अवतरण कशासाठी ??
आणि मग डोळ्यासमोर आली ती तिचीच विविधरूपे
असे मानले जाते की प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी या देवी भगवतीचा अंश आहे. तिच्या अंतरंगात या देवीचा निवास
असतो म्हणूनच तिचा न्मान केला जातो ती पूजनीय वंदनीय असते. पुढील श्लोक देवीच्या एके का रूपाची मह्ती सांगतात
या देवी सर्वभुतेषु शक्तिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

चितिरूपेण या कृत्स्नमेतद्व्याप्य स्थिता जगत्
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
आदिमाया कोंण हे देवीचे स्वरूप कसे निर्माण झाले??? या एकाच देवीला इतक्या विविध रूपात का पुजले गेले??
या श्लोकांमुळे निर्माण झालेला थोडा विचार :

आदिमाया ही परब्रह्मापासूनच जन्म घेते त्यामुळे ती त्याची आत्मजा आहे असा अर्थ विचारात घेतल्यास "परब्रह्मास्तव जन्मणारी आदिमाया ही मी" याचा अर्थ स्पष्ट होतो, ती त्या परब्रह्माच्या भार्यारूपातच प्रकट होईल असे नाही.

आदिमाया प्रकटते किंवा रूप धारण करते पण प्रकटण्यासाठी किंवा अवतार धारण करण्यासाठी तिला काही साध्य किंवा साधन लागतेच ना? त्याशिवाय या रूपाचे प्रकटीकरण कसे होईल?

माझ्यामते याचा अर्थ असा की परब्रह्म हे आदिम स्वरूप त्यात जेव्हा स्पंदने निर्माण झाली किंवा असे म्हणूया की जेव्हा या जगाची उत्पत्ती करण्याची इच्छा निर्माण झाली त्यावेळी उत्पत्ती, पालन विनाश हा खेळ चालवण्यासाठी आदिमाया किंवा विकार दंद्व याचा अविष्कार झाला, तो परब्रह्माद्वारेच.....म्हणजे परब्रह्म स्व-इच्छेनेच आदिमाया स्वरूपात प्रकट झाले सृष्टीचे जनन, पालन विनाश करू लागले.

ब्रह्मा, विष्णू महेश हे त्रिदेव परब्रह्माच्या इच्छेने आदिमायेच्या आज्ञेने प्रकट झाले किंवा म्हणता य़ेईल की जन्माला आले जेणे करून सृष्टीचे जनन पालन हारण सिध्द होईल...........सृष्टीच्या लयानंतर हे सर्व आदिमाया परब्रह्मात लीन होतात, अर्थात सामान्यत: जेव्हा एखादा जीव नष्ट होतो तेव्हा आदिमाया हे त्रिदेव लौकीकार्थाने पतन पावतात परलौकिक दृष्टीने अजूनही सृष्टी जिवित असल्या कारणाने ते जिवित आहेत परंतू सृष्टीच्या लयानंतर फक्त अनादी अनंत परब्रह्म अस्तित्वात रहाते पण ते दुसरे कोणीही जाणू शकत नाही कारण अर्थात परब्रह्माच्या या खेळाला आदिमायाच चालवते कारण ती सर्वशक्तीमान आहे, तीच त्रिदेवांना निर्माण करते परब्रह्माच्या सृष्टीचे लालन पोषण आणि संहार करण्यासाठी.

राम-कृष्ण हे सर्व आपल्यासारखेच मानव होते परंतू त्यांना काळ आत्मज्ञानाने महामानव (देवस्वरूप) बनवले म्हणूनच लौकीकर्थाने त्यांचा जन्म योनिज झाला तो योग्य वेळ, परिस्थिती जननस्थळ शोधूनच जेणेकरून त्यांच्या उत्क्रांतित कोणतीही बाधा निर्माण होऊ नये. परिस्थिती कशी ही असेल तरी आंतरिक उन्नती महामानवता या अंगिभुत गुणामुळेच त्यांना देच अथवा अवतार मानले जाते.

प्रकट होणे याचा सरळ अर्थ अस्तित्वात येणे किंवा जन्म घेणे आहे आदिमाय अयोनिज आहे पण ती योनिज बनूनही प्रकट होऊ शकते कारण ती परब्रह्माचेच एक अस्तित्व आहे

उपनिषदातही हेच म्हटलय.`एकोहम् बहुस्याम:' त्या परब्रम्हाला एकटेपण सतावु लागले आणि त्याला बहु होण्याची इच्छा झाली तेव्हा आदिमायेच्या आश्रयाने त्याने हे विश्व जन्माला घातले.

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive