Monday, May 17, 2010

मराठा मंडळ - छत्रपती शाहू व बाळाजी विश्वनाथ

शाहूने राज्याभिषेक केल्यावर बरेच सरदार त्याला सामिल झाले. खेडच्या लढाई मुळे त्याचा राजा होन्याचा मार्ग निर्धोक झाला. शाहूच्या ह्या काळात त्याला साथ दिली बाळाजी विश्वनाथने. त्याबदल्यात शाहूने त्याला १७१३ साली पेशवा केले. राजाराम आणि ताराराणीच्या काळात वतनदारी वाढीस लागली होती. वतनदार आपल्यावतनात मनमानी करत वेळ प्रसंगी स्वराज्याची साथ सोडत. या सर्वांना एकत्र आणुन अंमल कसा करायचा झालेच तर राज्य कसे वाढवायचे, सुरक्षित करायचे हे आव्हान दोघांसमोर होते.

औरंगजेबासोबत जो अभुतपुर्व लढा मराठी लोकांनी दिला त्या काळात शिवाजी महाराजांनी निर्मान केलेल्या अष्टप्रधान व्यवस्थेचा पार बोजवारा उडाला होता. प्रतिनिधी, पेशवा एका पक्षात तर सरसेनापती, न्यायाधिश दुसर्या असा प्रसंग निर्मान झाला. तसेच या काळात काही नविन लोक स्वबळावर वर आले. त्यांनी स्वंतत्रपणे मोगलांशी लढाई केली. जरी ते स्वराज्याशी ईमान राखुन होते तरी ते बांधील न्हवते. वाटेल तेव्हा ते आपली वेगळी वाट स्विकारु शकले असते. वतनांचा लोभ अशा लोकात जास्त होता. स्वतंत्रपणे लढाया माराव्यात, वतने मिळवावीत पण आपल्या भागात राजे व्हावे. उद्या मोगलांना समाविष्ट झाले तरी आत्तापर्यंत कमावीलेल्या वतनाचे कागदपत्र ते परत नविन लोकांकडुन करुन घेत त्यामुळे स्वराज्यचा भाग हा सलग राहात न्हवता हे मोठेच आव्हान उभे राहीले. शाहू ताराबाई मध्ये लढा निर्मान झाल्यामुळे आंग्रे सारखे सरदार पुंडावा करु लागले, गुन्हेगारी वाढली.

हे सर्व पाहाता शाहूने राज्याभिषेकानंतर अष्टप्रधान संस्था आणायचा प्रयत्न केला, तथापी जी घडी गेल्या १८ वर्षात उखडली गेली ती त्याला निट बसविता आली नाही. जुन्या खोडां पुढे बाळाजी सारखे नविन लोक निष्प्रभ ठरु लागले. आपाआपसात लढाया करन्यापेक्षा जर मोठे क्षितीज निर्मान केले तर आपसातील लढाया कमी होतील हा विचार बाळाजी विश्वनाथने केला त्यावर शाहू ने मोहर लावली. त्याने प्रस्थापित राज्यववस्थेच्या विरुध्द जाऊन (वतनदारी) एक नविन संयुक्त राज्यव्यवस्था पुढे आणली. ज्या मध्ये अष्टप्रधानांना भारतातील वेगवेगळे हिस्से दिले गेले. त्यांनी या भागात कर्तूत्व गाजवावे, लढा द्यावा, जमिन कब्जात घ्यावी, स्वतंत्र कारभार करावा पण काही एक हिस्सा छत्रपतीला द्यावा, तसेच ईमान मराठी राज्याशी ठेवावे, नसता दुसरा सरदाराला त्याचा भाग दिला जाईल अशी ती व्यवस्था होती.

या व्यवस्थेबाबत न्या रानडे लिहीतात " मराठ्यांची सत्ता जगवुन वाढविन्यासाठी बाळाजी विश्वनाथाने जो उपाय काढला त्याचे अंतर्बाह्य स्वरुप भिन्न होते. शिवाजीच्या परंपरेला धरुन परक्यांचा सत्तेशी एकदिलाने लढेल असा मोठा बलिष्ठ पुढार्यांचा संघ निर्माण करने हे त्या उपायाचे बाह्य स्वरुप होते. या पुढार्यांच्या ताब्यातील प्रदेशात ज्याचा तो कुलमुखत्यार, त्याने हवा तसा कारभार करावा. त्याचे नियंत्रन त्यानेच करावे. मात्र सर्वांची कुलमुखत्यारी समान दर्जाची असावी, ही त्या उपायाची दुसरी बाजु होती."

नविन योजनेनुसार सरदार त्यांचे भाग.

फत्तेसिंग भोसले - अक्कलकोट
प्रतिनिधी - औंध
सेनापती दाभाडे - खानदेश - गुजरात
परसोजी भोसले - वर्हाड, नागपुर
कान्होजी आंग्रे - पुर्ण पश्चीम किनारा
छतपती - कर्नाटक (जिंजीकडील काही भाग)
पेशवे - स्वराज्याचा उर्वरीत थोडा भाग

कुलमुखत्यारांनी खर्च वजा जाता बाकीची रक्कम मध्यवर्ती तिजोरीत भराई, शाहूने सहाय्यास बोलाविले तर जावे हे ठरले. प्रत्येक भागात छत्रपतीचा ऐक "दरकदार" नेमन्यात आला. तो ह्या सरदारांवर मध्यवर्ती सत्तेकडुन लक्ष ठेवी.

अशा प्रकारची सत्ता बाळाजी विश्वनाथ पेशव्याने वाटुन दिली. बर्याच ईतिहासकारांचा मते ही सर्वात मोठी चुक होती, कारण त्यामुळे सर्व सरदार आपआपल्या सुभ्यात वाट्टेल ते करायचे नंतर पुढे चालुन ईतर सरदारंच्या सोबत युध्द करायचे. ( उदा बाजीराव पेशवे सेनापती दाभाडे, बाजीराव पेशवे नागपुरकर भोसले ह्या घटनाचा आढावा पुढच्या लेखात घेनार आहे). ही योजना सदोष होती. ही योजना निर्मान केल्यावर महाराष्ट्राच्या दुर्दैवाने पेशवा (बाळाजी विश्वनाथ) लवकर वारला नाहीतर त्याला ही योजना फक्त ते वर्षासाठीच करायची होती. सरदेसाई म्हणतात " पेशवा काहीसा एकाऐकी वारला नाहीतर त्याने ही व्यवस्था बदलली असती. आणखी दहा पाच वर्षे तो जगता तर समग्र राज्यकारभाराची संपूर्ण व्यवस्था कायम स्वरुपी त्याने ठरवुन दिली असती. ती त्याचा धारणेप्रमाने पुरी करण्याचे काम दुसर्या कोणी केले नाही"

ही योजना सदोष असली तरी एक गोष्ट मात्र झाली की या सरदारांचे लक्ष नविन प्रदेश काबुत आणन्यासाठी लागले, दुही तात्पुरती मिटली अल्पावधीतच मराठे हे भारतभर पसरले. त्यांचा दबदबा दिवंसेदिवस वाढु लागला..

बाळाजी विश्वनाथ १७२० साली वारला. त्याची योग्यता कार्य फार मोठे होते. त्याचामुळेच शाहूला आपले बस्तान बसविता आले ही नविन राज्यववस्था आली. त्यानेच चौथाईच्या सनदा मिळविन्यासाठी सय्य्द बंधु बरोबर दिल्लीवर स्वारी केली होती, तत्कालीन राजकारानात एवढी मुत्सदेगिरी दाखविनारा तोच एक होता. बाळाजी कडे आधीपासुनच देशमुखी असल्यामुळे त्याचा मुळ पिंड महसुल जमा करन्याचा अर्थव्यवस्था निट लावन्याचा होता. अशा थोर सेनानी / राजकारण्या मुळे भट घरान्यात पेशवाई आली.

राजारामकाळा पासुन जी वतनदारी चालु झाली तिचे रुपांतर मराठा मंडळात झाले मराठ्यांचा घोडदौडीस सुरुवात झाली.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive