Friday, September 16, 2011

जपानमधील ऍटोमोबाईल इन्डस्ट्री!

सुरस कथा मार्केटिंगच्या

कथा :-
भविष्यकाळात काय घडणार आहे याची अचुक कल्पना असणे किती फायद्याचे ठरु शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जपानमधील ऍटोमोबाईल इन्डस्ट्री! एक काळ असा होता की ऍटोमोबील क्षेत्रावर अमेरिकेचे वर्चस्व होते. जनरल मोटर्स, फोर्ड, क्रायसलर या अमेरिकेतील मोठ्या ऍटोमोबिल कंपन्यांमधे मोटारिंचे ( Passenger Cars ) जगामधील सर्वात जास्त उत्पादन होत होते. तसेच मोटारिंची जगात सगळ्यात जास्त विक्री पण अमेरिकेतच होत असते. या गाड्यांना जगभरात डिमांड होती. आपल्याकडे एखादी ब्युक, कॅडिलॅक, फोर्ड किंवा लिंकन सारखी एखादी अमेरीकन गाडी असणे प्रातिष्ठेचे समजले जात होते. ( मला आठवते. 1970 साली पुण्यामधे शंतुनराव किर्लोस्करांची लिंकन गाडी होती. ती गाडी जरी रस्त्यावर नुसती उभी राहिली तरी ती बघण्यासाठी लोकांची गर्दी जमायची. त्या वेळी भारतामधे फक्त तीनच लिंकन गाड्या होत्या.)
ऍटोमोबाईल क्षेत्रातील आपल्या वर्चस्वाला शह बसेल असे खुद्द अमेरिकेला सुध्धा कधी वाटले नसेल.
पहिल्यापासुनच अमेरिकेतील मोटारी बनविणार्या उत्पादकांनी मोठ्या, आरामदायी, आतमधे भरपुर जागा असलेल्या, मोठी ट्रन्क ( डिकी ) असलेल्या, जास्त हॉर्सपॉवरची इंजिने असलेल्या, टी. व्ही. फ्रीज सारखी सुविधा असलेल्या माटारी बनविण्यावर लक्ष केन्द्रीत केले होते. पण या गाड्या गॅलच्या गॅलन पेट्रोल खातात याची त्यांनी कधी फिकीर केली नाही. त्याउलट जपानमधील मोटारी बनविणार्याख उत्पादकांनी पहिल्यापासुनच छोट्या पण कमी इंधन खाणार्याप ( Fuel Efficient) गाड्या बनविण्यावर लक्ष केन्द्रीत केले. अमेरिकेमधे या जपानी गाड्यांची ‘छोट्या, खेळण्यातल्या किंवा कचकड्याच्या गाड्या’ म्हणुन कुचेष्टा होत असे. पण या मुळे जपानी उत्पादक वीचलीत झाले नाहीत व त्यांनी आपले छोट्या पण कमी इंधन खाणार्यास गाड्या बनविण्याचे धोरण तसेच चालु ठेवले. ते कधी मोठ्या आणि लक्झरीयस गाड्या बनविण्याच्या फंदात पडलेच नाहीत.
1970 च्या दशकात ओपेकची ( OPEC ) स्थापना झाली. ऑईलच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचे काम ओपेक कडे आले. याचा परिणाम म्हणुन अचानक ऑईलच्या किंमती भडकल्या. पेट्रोलच्या कींमती तर आकाशाला भिडल्या. लोकांना पेट्रोल परवडेनासे झाले. अमेरिकेतील लोकांना त्यांच्या प्रचंड पेट्रोल खाणार्याड अमेरीकन गाड्या परवडेनाशा झाल्या. कमी पेट्रोल खाणार्याख गाड्यांची डिमांड एकदम वाढली. अशा गड्या जपानशिवाय दुसरीकडे कोठे बनत नव्हत्या. त्यामुळे जपानी गाड्यांची मागणी एकदम वाढली. ज्या मार्केटमधे मार्केटशेअरमधे 2 टक्यांचा फरक पडणे ही मोठी घटना समजली जाते त्या मार्केटमधे, एक वर्षाच्या आत, अमेरीकन गड्यांचा मार्केट शेअर 34 ट्क्यांवर घसरला तर जपानी गाड्यांचा मार्केट शेअर 54 टक्के एव्हडा वर गेला. एकट्या टोयोटा कंपनिने एका वर्षात 187000 गाड्यांची रेकॉर्ड विक्री केली. कारण जपानी उत्पादकांना माहीत होते की एक ना एक दीवस ओपेक सारखी घटना घडुन पेट्रोलच्या कींमती वर जाणार आहेत व त्या वेळी आपल्या गाड्यांना भरपुर डिमांड येणार आहे. आजसुध्धा अमेरिकेत जपानी गाड्यांचा मार्केट शेअर अमेरीकन गाड्यांपेक्षा जास्त आहे.
पोल्युशन म्हणजेच प्रदुषण ही एक मोठी समस्या झाली असुन अनेक देशांना या समस्येने ग्रासले आहे. त्यात भारत पण आहे. डिझेल आणि पेट्रोलवर चालणारी वाहने ही प्रदुषण निर्माण करण्याचे एक प्रामुख कारण आहे असे आढळुन आले आहे. त्यामुळे जगात सगळीकडेच वाहनांमुळे निर्माण होणारे प्रदुषण कमी करण्याचे व त्यावर नियंत्राण ठेवण्याचे प्रयत्न युध्ध पातळीवर सुरु आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणुन कमी प्रदुषण निर्माण करणारी वाहने बनावीत व अशीच वाहने रस्यावर यावीत या दृष्टिने प्रयत्न चालु आहेत. यासाठी वाहनांसाठी प्रदुषणवीषयक कडक नीयम करण्यात आले आहेत. भारत पण यात मागे नाही. तसेच पेट्रोल व डीझेलच्या कींमती पण सतत वाढत आहेत. आता वाहने निर्माण करणार्या निर्मात्याला कमी इंधन खाणारी तसेच कमी प्रादुषण निर्माण करणारी वाहने बनविणे अशी दुहेरी कसरत करावी लागत आहे.
जपानी उत्पादकांनी ही समस्या येणार आहे हे पुर्वीच ओळखले होते. त्या दृष्टिने त्यांचे पुर्विपासुनच प्रयत्न सुरु होते. त्यांनी हायब्रीड या नवीन प्रकारच्या गाड्या पहिल्यांदा बाजारात आणल्या आहेत. टोयोटने प्रायस तर होन्डाने इनसाईट व सिव्हीक ही हायब्रीड मॉडेल्स पहिल्यांदा बाजारात आणली आहेत. या गाड्या विजेवर म्हणजे बॅटरीवर चालतात. यातील बॅटरी डिस्चार्ज होऊ लगली की ती चार्ज करण्यासाठी त्या गाडीतच इंजीनवर चालणारा जनरेटर बसवलेला असतो. जेव्हा बॅटारी डिसचार्ज होते तेव्हा हा जनरेटर आपोआप चालु होतो व बॅटरी चार्ज झाल्यावर आपोआप बंद होतो. जेव्हा एखादी मोटार लाल सिग्नलपाशी इंजीन चालु असलेल्या कंडीशनमधे उभी असते तेव्हा सर्वात जास्त प्रदुषण निर्माण होत असते. हायब्रीड गाड्यांमधे गाडी लाल सिग्नलशी उभी राहिल्यावर गाडीचे इंजीन आपोआप बंद होईल व गाडी चौक ओलांडुन पुढे गेल्यावर आपोआप चालु होईल अशी सोया केलेली असते. ही गाडी बॅटरीवर चौक पार करते. या गाडिचे इंजीन थोडा वेळच चालत असल्यामुळे तसेच या इंजीनवर लोड अत्यंत कमी असल्यामुळे या गाड्या अत्यंत कमी इंधन खातात व अत्यंत कमी प्रदुषण निर्माण करतात. या गाड्या गॅलनला 50 मैलांचे ( लीटरला 25 ते 30 किलोमीटर) ऍव्हरेज देतात. अमेरीकेत या गाड्या तुफान लोकप्रीय झाल्या असुन या गाड्यांना सुलेव ( SULEV- Super Ultra Low Emission Vehicles )
असे नाव दिले आहे. आता अमेरीकेतील जनरल मोटर्स, फोर्ड सारख्या कंपन्यांनी हायाब्रीड गाड्या बनविण्याचे प्लॅन्स जाहीर केले आहेत. पण आज तरी जपानी उत्पादकच आघाडीवर आहेत. या गाड्या आत्ता कुठे भारतात मिळु लागल्या आहेत.
या पुढची पायरी म्हणजे संपुर्णपणे इलेक्ट्रीकवर चालणार्या गाड्या. यामधेही जपानने आघाडी घेतली असुन निस्सानने त्यांची व्होल्ट ही संपुर्णपणे विजेवर चालणारी गाडी अमेरिकेतील मार्केटमधे आणली असुन ती पण प्रचंड लोकप्रीय होते आहे.
मार्केटींगमधे भविष्यकाळात काय घडणार आहे त्याचे अचुक द्यान असणे पण फार आवश्यक असते.


उल्हास हरी जोशी

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive