Tuesday, September 20, 2011

ली आयकोका कथा - "Lee" Iacocca

सुरस कथा मार्केटिंगच्या

कथा :-
काही वर्षांपुर्वी ली आयकोका या अमेरिकेतील एका इटालीयन एक्झीक्युटिव्हचे आत्मचरित्र प्रसिध्ध झाले आणि ते तुफान लेकप्रीय ठरले. गेली कित्येक वर्षे हे पुस्तक बेस्ट सेलर कॅटेगिरीत मोडले जाते.
मेकॅनीकल इंजिनीयरींगची पदवी मिळाल्यावर ली फोर्ड मोटोर कंपनीत ट्रेनी इंजिनीयर म्हणुन जाईन झाला. त्याने मार्केटींग हे कार्यक्षेत्र नीवडले. स्वतःच्या कर्तुत्वावर त्याने कंपनितील सवोच्च पदी पोचण्यापर्यंत, म्हणजे कंपनिचा प्रेसिडेन्ट होण्यापर्यंत मजल मारली. ली जेव्हा कंपनिचा प्रेसिडेन्ट झाला तेव्हा त्याला स्वर्ग दोन बोटे उरला होता. पण लवकरच त्याच्यावर अगदी वेगळ्या प्रकारचा अनुभव घेण्याची पाळी येणार होती. एखाद्या माणसाला माऊंट एव्हरेस्ट सारख्या उंच शीखरावरुन खाली ढकलुन दिल्यावर, वरुन खाली गडगडत येताना त्याचे काय हाल होतात, किती वेदना होतात, अंग कसे ठेचुन नीघते व रक्तबंबाळ होते, हाडांचा कसा चुरा होतो या सगळ्याचा अनुभव घ्यायचा होता. अगदी अचानकपणे त्याची फोर्ड कंपनिच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी झाली. ती सुध्धा अत्यंत अपमानकारक पध्धतिने! त्या वेळी त्याचे वय 54 वर्षांचे होते. फोर्डमधे त्याची 35 वर्षे नोकरी झाली होती. त्याला मोटारी विकण्याशिवाय दुसरा कुठलाही अनुभव नव्हता. या हकालपट्टीमुळे त्याचे आयुष्यच उध्वस्त व्हायची पाळी आली. वयाच्या 54 व्या वर्षी तो अक्षरशः रस्त्यावर आला. त्याच्या आत्मसन्माला मोठा धक्का बसला. त्याचा आत्मविश्वास हरवला. मनाला अनंत जखमा झाल्या. त्याला नैराश्येने ग्रासले. आपल्या आयुष्याचे यंत्र पार तोडुन मोडुन पडले आहे. त्याचे पार्टस सगळीकडे वीखरुन पडले आहेत असे त्याला वाटले. पण यावेळी त्याचे कुटुंबीय त्याच्या मदतिला धाऊन आले. त्याला त्याच्या आईने, पत्निने आणि दोन मुलींनी आधार दिला. कोण्या एके काळी त्याच्या कंपनीत त्याच्याच हाताखाली स्टेनो म्हणुन काम करणारी त्याची पत्नी एखाद्या वाघिणिसारखी खंबीरपणे त्याच्या मागे उभी राहिली. त्याच्यातील आत्मविश्वास जागृत केला. त्याच्या आयुष्याच्या मोडलेल्या यंत्राचे जे काही स्पेअर पार्टस शिल्लक राहिले होते ते एकत्र करुन पुढे जाण्याची प्रेरणा त्याला दिली. तेव्हा माणसाच्या आयुष्यात त्याच्या कुटुंबाला किती महत्व असते हे त्याने जाणले. अडचणिच्या काळात फक्त कुटुंबीयच खर्याु अर्थाने उपयोगी पडु शकतात याचा धडा त्याला मिळाला. तेव्हापसुन तो सशक्त कुटुंबाचा खंदा पुरस्कर्ता बनला आहे. पण एव्हड्याने त्याच्या मागचे शुक्लकाष्ट काही संपणार नव्हते.
त्याला क्रायसलर दुसर्याय एका अमेरीकन ऍटोमोबाईल कंपनिची सी.ई.ओ. पदाची ऑफर आली.
सुरवातिला ही कंपनी थोड्याफार संकटात असल्याची कल्पना त्याला देण्यात आली होती. पण त्याने ही कंपनी जॉईन केल्यावर त्याच्या लक्षात आले की त्याने फार मोठी घोडचुक केली आहे. कंपनी थोड्याच नाही तर प्रचंड मोठ्या संकटात सापडली असुन जवळ जवळ बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ली ला त्यावेळी आपण फ्राईंग पॅनमधुन फायरमधेच उडी घेतल्यासारखे वाटले. पण न घाबरता, खचुन न जाता, 'आलिया भोगासी असावे सादर' हे तत्व वापरुन आलेल्या संकटाशी दोन हात करायचे त्याने ठरवले.
क्रायस्लर कंपनीत प्रचंड अनागोंदी कारभार चालु होता. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. डिपार्टमेन्टसमधे शत्त्रुत्वाच्या भिंती उभ्या होत्या. प्रॉडक्षन, डिझाईन, मार्केटींग या डिपार्टमेन्टसनी हातात हात घालुन काम करायचे असते. पण त्यांच्यातुन विस्तव जात नव्हता. प्रॉडक्शन वाले त्यांना हवे ते बनवत होते. डिझाईनवाले त्यांना हवे तसे डिझाईन बनवत होते. मार्केटिंगवाले ग्राहकांच्या कोणत्याच अपेक्षा पुर्याा करु शकत नव्हते. कंपनिची आर्थीक परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. यावर झटपट उपाय योजना करणे आवश्यक होते. त्याचवेळी ली ला चार चांगले सहकारी भेटले. त्यांच्या मततिने मग त्याने मॅनेजमेन्टमधले अनेक नवीन प्रायोग केले. नवीन ट्रेन्ड निर्माण केले. प्राथम त्याने स्वतःचा पगार कमी करुन्‍ महिना 1 डॉलर केला. तसेच कंपनिच्या सर्व सिनियर एक्झीक्युटिव्हना स्वखुशीने पगार कमी करण्यावे आवाहन केले. अमेरिकेत पुर्वी असे कधी घडले नव्हते. त्याचा योग्य तो परिणाम तर झालाच. पण अमेरिकेत हा एक नवीन ट्रेन्ड निर्माण झाला. डिपार्टमेन्टमधे विक्रेता व ग्राहक हा नवीन प्रकार सुरु केला. याचा अर्थ प्रत्येक डिपार्टमेन्ट हा विक्रेता असतो तर ईतर डिपार्टमेन्ट्स ही त्याची ग्राहक असतात. त्यामुळे प्रत्येक डिपार्टमेन्टने ग्राहकाला देतो तशी सेवा ईतर डिपार्टमेन्टला द्यायला हवी. त्याता हा प्रायोग कमालिचा यशस्वी झाला. कंपनिच्या जाहिरातींच्या क्षेत्रात त्याने अमुलाग्र बदल केले. लोकांचा विश्वास वाढावा म्हणुन स्वतः जाहिरातींमधे भाग घ्यायला सुरवात केली. हा पण नवीन प्रकारच होता. त्याच्या प्रायत्नांना यश मिळु लागले पण आर्थीक संकट मात्र कायम होते.
मग त्याने अत्यंत बोल्ड निर्णय घेतला. त्याने सरळ अमेरीकन सरकारकडेच कर्ज मागायचे ठरवले. हा अमेरिकेच्या इतिहासातील अभुतपुर्व प्रकार होता. कारण आजपर्यंत अमेरिकेमधे कोणत्याही खाजगी कंपनिने सरकारकडे लोन मागीतले नव्हते व सरकारने पण कोणत्याही खाजगी कंपनिला कर्ज पुरवठा केला नव्हता. बर कर्जाची रक्कम सुध्धा काही थोडीथोडकी नव्हती!
यासाथी लीला भगीरत प्रयत्न करावे लागले. शेकडो वेळा कॅपिटॉल हिलला भेट द्यावी लागली. टनावारी कागदपत्रे सबमीट करावी लागली. पीलर ते पोस्ट अशी पळापळ करावी लागली. प्रत्येक सरकारी अधिकार्या ला, सिनेटरला, सेक्रेटीरीला या लोनचे महत्व पटवताना त्याच्या नाकी नऊ आले. या पळापळिचा व ताणाचा त्याच्या प्रकृतीवर परिणाम होऊन त्याला व्हर्टिगोचा विकार जडला. तीन वर्षांच्या अथक प्रायत्नानंतर त्याला यश आले. अमेरिकेच्या तोपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे कर्ज मंजुर झाले. यावर लोकांची प्रचंड टिका पण झाली. टॅक्स पेयर्सचे पैसे खाजगी कंपनिला लोन देण्यासाठी वापरले त्याबद्दल अनेकांनी नाराजी दाखवली. हे पैसे परत मिळतील की नाही याबद्दल अनेकांनी शंका उपस्थीत केल्या. पण लीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. सरकारकडुन घेतलेल्या कर्जाची पै न पै मुदतिच्या कितीतरी आधीच फेडुन त्याने एक नवा विक्रम प्रस्थापीत केला. कारण तो पर्यंत एकतर सरकारी कर्ज फेडायचे तरी नसते, सावकाश फेडले तरी चालते किंवा मुदतिआधी फेडायचे नसते असा समज होता. ली ने मुदतिआधी सरकारी कर्ज फेडण्याचा नवा ट्रेण्ड निर्माण केला. या सगळ्या प्रायत्नांचे फळ म्हणुन क्रायसलर ही जनरल मोटर्स व फोर्ड नंतरची जगातील तिसर्यात क्रमांकाची सगळ्यात मोठी ऍटोमोबाईल कंपनी बनली. याचे सारे श्रेय ली आयकोकाला जाते.
याठिकाणी लीला पावलोपावली त्याच्या मार्केटींगच्या अनुभवाचा खुप फायदा झाला. तो आपल्या यशाचे श्रेय मार्केटींगला देतो. थोडक्यात मार्केटींगच्या अनुभवावर एखादा माणुस संकटात सापडलेली कंपनी संकटातुन बाहेर काढुन टॉपची कंपनी बनवु शकतो हे ली आयकोकाने स्वतःच्या उदाहरणाने दाखवुन दिले आहे.

उल्हास हरी जोशी

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive