Tuesday, September 13, 2011

Story of marketing in Marathi

सुरस कथा मार्केटिंगच्या
उल्हास हरी जोशी
कथा पहिलीः-
मार्केटींगमधे कधी कधी अगदी अफलातुन आयडियाज वापरल्या जातात. कशाचा कशाशी संबंध नसतो. अशा संबंध नसलेल्या गोष्टिंचा किंवा घटनांचा खुबिने उपयोग करुन घेतला जातो.
‘What they don’t teach you at Howard Business School’ या जगप्रसिध्ध पुस्तकात सांगीतलेली ही कथा आहे. ही सत्य कथा आहे राफेल ट्युडेला या व्हेनेझुएलामधील ऑईल व शिपींग व्यवसायातील उद्योजकाची. अक्षरशः शुन्यातुन सुरवात करुन केवळ वीस वर्षांच्या आत या माणसाने त्याचे वर्षाला अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असलेले बिझिनेसचे साम्राज्य उभे केले आहे. मुळात पेट्रोलीयम इंजिनीयर असलेल्या राफेलची कॅरॅकस मधे काचा बनविण्याची एक छोटी फॅक्टरी होती. पण ऑईल बिझिनेसनधे येण्याची त्याची इच्छा फार प्रबळ होती व तो संधिची वाट बघत होता. त्याला कोठुनतरी कळले की अर्जेन्टीना नावाच्या देशाला 20 कोटी डॉलर्स कींमतिचा बुटेन गॅस हवा आहे. आपल्याला ही ऑर्डर मिळु शकेल का याची पहाणी करण्यासाठी तो अर्जेन्टिनाला पोचला. तेथे आल्यावर त्याच्या लक्षात आले की त्याला ही ऑर्डर मीळणे जवळ जवळ अशक्य आहे. कारण एकतर त्याला ऑईल व गॅस बिझिनेसचा कोणताच अनुभव नव्हता. त्याला जो काही अनुभव होता तो काचा बनविण्याचा होता, ज्याचा येथे काही उपयोग नव्हता. तसेच त्याला ब्रिटीश पेट्रोलीयम, शेल सारख्या जागतीक व दिग्गज कंपन्यांची स्पर्धा पण होती. पण त्यामुळे तो निराश झाला नाही आणि आपले संशोधन चालु ठेवले. त्याला कळले की अर्जेन्टिनाला बीफचा म्हणजे बोलाईच्या मांसाचा ओव्हर सप्लाय झाला असुन त्यांच्याकडे 20 कोटी डॉलर्सचे बोलाईचे मांस पडुन आहे आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची याची त्यांना चिंता लागुन राहिली आहे. “तुम्ही जर माझ्याकडुन 20 कोटी डॉलर्सचा बुटेन गॅस विकत घेणार असाल तर मी तुमचे बोलाईचे मांस वीकत घ्यायला तयार आहे.” राफेलने अर्जेन्टिना गव्हर्नमेन्टला सांगीतले. अर्जेन्टिनाचे सरकार यासाठी तयार झाले. राफेलने 20 कोटी डॉलर्स कीमतीचे बोलाईचे मांस विकत घ्यायचे या बोलीवर त्याला बुटेन गॅसची ऑर्डर देण्यात आली. त्यानंतर तो स्पेनमधे आला. त्यावेळी स्पेनमधला सर्वात मोठा जहाज बांधणी कारखाना, ऑर्डर्स नसल्यमुळे, बंद पडण्याच्या मार्गावर होता. या कारखान्यामुळे बराच मोठा राजकीय पेच प्रसंग ओढवला होता व हा कारखाना स्पेनच्या सरकारची डोकेदुखी बनला होता. “तुम्ही जर माझेकडुन 20 कोटी डॉलर्सचे बोलाईचे मांस वीकत घेणार असलात तर मी तुमच्या या जहाज बांधणी कारखान्यातुन 20 कोटी डॉलर्सचा सुपर टॅन्कर बनवुन घ्यायला तयार आहे.”राफेलने स्पेनच्या सरकारला सांगीतले. स्पेनचे सरकार यासाठी तयार झाले. ईतकेच नव्हे तर आपल्य राजदुतामार्फत अर्जेन्टिनाच्या सरकारशी संपर्क साधुन राफेलतर्फे 20 कोटी डॉलर्सचे बोलाईचे मांस परस्पर स्पेनला पाठवायला सांगीतले. यानंतर मग राफेल अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील सन ऑईल कंपनीत गेला आणि त्यांना सांगीतले, “तुम्ही जर माझा 20 कोटी डॉलर्सचा सुपर टॅन्कर, जो स्पेनमधे तयार होतो आहे, भाड्याने घेणार असाल तर मी तुम्च्याकडुन 20 कोटी डॉलर्सचा बुटेन गॅस वीकत घ्यायला तयार आहे.” सन ऑईल याला कबुल झाले. अशा रितिने राफेल ट्युडेलाची ऑईलच्या बिझिनेसमधे येण्याची इच्छा पुर्ण झाली. या ठीकाणी राफेलने अशा काही संधी शोधल्या की त्या कुणाच्या लक्षात पण येणार नाहीत, आणि त्याचा फायदा उठवला.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive