Importance of Nine colors of Navaratri
यावर्षी बुधवार दि. २८ सप्टेंबर रोजी नवरात्रारंभ म्हणजे घटस्थापना आहे आणि आठव्या दिवशी बुधवार दि. ५ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन म्हणजेच नवरात्र संपणार आहे. कारण यावषीर् तृतीया तिथीचा क्षय (म्हणजे तृतीया कोणत्याही दिवशी सूयोर्दयाला नसणे.) झाल्याने नवरात्र आठच दिवस असणार आहे. गुरुवार दि. ६ ऑक्टोबर रोजी विजया दशमी आहे.
नवरात्रातील नवरंगांची कल्पना प्रथम महाराष्ट्र टाइम्सने पुढे आणली आणि प्रत्येक नऊ दिवस नवरंगांनी फुलू लागले. नवरात्रामध्ये घातल्या जाणाऱ्या कपड्यांच्या रंगांमध्ये कोणतीही धामिर्क कला नसली तरी तो सांस्कृतिक उत्सव आहे. निसर्ग हा अनेक रंगांनी सजलेला असून नवरात्र पूजा ही निसर्ग शक्तीची, आदिशक्तीची व मातृशक्तीची म्हणजेच सृजन शक्तीची पूजा असते. नवरात्रात महिलांनी एकाच रंगाची वस्त्रे परिधान केल्यामुळे नवरात्र खुलते. महिलांमध्ये एकजुटीची भावना जोपासली जाते. मनात उत्साह, आनंद व सुरक्षिततेची भावना निर्माण होते. स्वाभिमान व आत्मविश्वास जागृत होतो. स्त्री शक्तीचे दर्शन घडते. हाच उद्देश प्राधान्याने नवरात्रातील नवरंगांमध्ये आहे.
निळा रंग शांततेचा, समाधानाचा, धैर्याचा, ऐक्याचा प्रतिक आहे. पिवळा रंग स्वयंस्फूतीर्चा, उद्योगशीलतेचा, कल्पकतेचा, व्यापकतेचा, उल्हासाचा व आनंदाचा द्योतक आहे. हिरवा रंग धारणाशक्तीचा, स्वाभिमानाचा, सृजनशक्तीचा व सौभाग्याचा निदर्शक आहे. राखाडी (ग्रे) रंग हा तटस्थतेचा, संयमाचा, चेतनाशक्तीचे प्रतिनिधित्व करणारा आहे. पांढरा रंग हा पावित्र्याचा, बुद्धिमत्तेचा, सुसंस्कारांचा द्योतक आहे. लाल रंग हा इच्छाशक्तीच्या सार्मथ्याचा, वस्तुनिष्ठतेचा, कार्यरत असण्याचा, चपळपणाचा, उद्योगशीलतेचा, गतिमानतेचे प्रतीक आहे. जांभळा रंग सौंदर्य, पावित्र्य, समृद्धी, विशालता दर्शवणारा आहे आणि गुलाबी रंग हा प्रेमाचा, पावित्र्याचा, आनंदाचा, समृद्धी व सौंदर्याचे द्योतक आहे.
असे हे रंग प्रत्येकाला आनंद देतात. नवरात्रात नवरंगांचा हा सुगंध असाच मनाला शक्तीप्राप्त करून देणारा असतो.

No comments:
Post a Comment