Sunday, December 18, 2011

तो पाणीपुरी खात होता. तितक्यात तेथे एक सुंदर तरुणी आली.

रस्त्याच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या पाणी पुरी आणि भेलच्या गाडीवर तो पाणीपुरी खात होता. तितक्यात तेथे एक सुंदर तरुणी आली.आपला खाण्यात रमला होता.भरलेल्या तोंडाने और एक प्लेट... म्हणायचा तो आपला आणि जन्मो-जन्मीचा उपाशी असल्यासारखा खात होता.त्या तरुणीनेही दही शेवपुरी ओर्डर केली तो पाणीपुरी भैया आपल्या पहिल्या ग्राहकाला पाणीपुरी खाऊ घालण्यात व्यस्त होता. दो मिनिट में देता हू madamji म्हणून त्याने तिला थांबवले. हा आपला चरतच होता. तेवढ्यात एक १०-१२ वर्षाची भिकारी मुलगी तिच्या जवळ आली आणि कधी पोटाला तर कधी तोंडाला हात लाऊन भीख मागू लागली तिचे ते रूप बघून तिला खूप किळस आली.पण आपण आजच्या जमान्याची निदर तरुणी आहोत अशा भिकाऱ्याला आपण भीख घालत नाही किव्हा भीत ही नाही, हे दाखून देत तिने भिकारीण मुलीला खेकसत हुसकावण्याचा प्रयत्न केला.ती मुलगी काकुळतीला येऊन तिच्या ओढणीला धरू लागली. आणि तिने एक जोराचा धक्का दिला.आता पानिपुरीवाल्या भैयाला ही स्फुरण चढले.जवळची काठी घेतली आणि

ए...भागती हें या दु एक ??

म्हणत तो सरसावला तेवढ्यात त्याने पाणीपुरीवाल्याच्या दंडाला जोरात धरले.एवढ्या जोरात कि जो किंचाळायचाच बाकी उरला...उसे एक प्लेट दहीपुरी दे...दे त्याने पानिपुरीवाल्याला सुनावले. त्या तरुणीने त्याच्याकडे पाहून तोंड वाकडे केले. त्याने लक्ष दिले नाही आणि पाणीपुरीवाल्याला दरडावले, दे उसको एक प्लेट... साब यह लोग बहुत परेशान करते ही, आप कहते हो इसलिये दे राहा हू... एक प्लेट बनून त्या मुलीच्या हातात दिली. ती तरुणी वैतागली. ही किळसवाणी मुलगी आपल्या सोबत उभी राहून तीच प्लेट खाणार ? पण तिने खाल्ली नाही... थोडी साइडला झाली आणि आवाज दिला....तिच्याहून लहान तीन मुले पळत आली..एक तर अगदी लहान म्हणजे.तीन वर्षाचा असावा. मळकटलेला बिना बटणाचा शर्ट आणि त्यातून बाहेर डोकावणारी त्याची ढेरी.. दोन मुली त्याच्याहून एक -दोन वर्षाच्या अंतरानी मोठ्या असाव्यात.त्याचाही अवतार जवळपास तसाच .त्याला अचानक नाना पाटेकरचा फिल्मी डॉयलॉग आठवला,"देखो मेरे देश का भविष्य भुखा भी और नंगा भी.." त्या मोठ्या मुलीने स्वतः एकही पुरी उचलली नाही ती प्लेट घेऊन उभी होती आणि आपल्या भावंडाना कसे खायचे ते समजावत होती. सगळ्यात लहान मुलाला खायला जमत नव्हते ती त्याला तोडून तोडून भरवत होती. ते तिघे त्या एका प्लेटवर असे तुटून पडले की, स्पष्टपणे जाणवत होते या बिचाऱ्याच्या पोटात भुकेचा डोंब उठला आहे.तिखट असल्यामुळे त्या लहान मुलाला उचकी लागली ती इकडे तिकडे पाहू लागली. त्याने बाहेरच्या बाजूला लटकवलेली पाण्याची बाटली कडून तिच्या हातात दिली. अगदी मोजक्या सेकंदात त्या तिघांनी मिळून ती प्लेट संपवली.त्याने और एक प्लेट दे बच्चो को... पर साब ? दे बोला ना.. पैसे दे रहा हु ना में तुझे ... और सून ज्यादा तिखा मत बना...

तुम्ही विचार करत असाल ती तरुणी कुठे गेली ? तर ती तिथेच उभी होती आणि खात होती. त्या भिकाऱ्यांना थोडे सौजन्य दाखवले होते आणि तिच्यापासून थोड्या अंतरावर बसून खात होते. आता तिला ती प्लेट संपत नव्हती,किळसेने नव्हे तर स्वतः ची लाज वाटल्याने.एक लहानशी मुलगी जवळ एक पैसा नसताना भावंडांसाठी एवडे करते आणि आपण उपाशी मुलांसाठी दहा रुपये खर्च करू शकत नाही. तिला असे झाले होते कधीएकदा हे संपवते आणि इथून पळ काढते.तो गाडीवर बसला आणि खिश्यातून शंभराची नोट कडून त्याने त्या पाणीपुरीवाल्याला भैयाला दिली. पाणीपुरीवाला म्हणालाम, साब दस रुपये छुट्टे हें ? साठ रुपये हो गए... तो दहाची नोट शोधू लागला. तेवढ्यात ती म्हणाली भैया आप उन्हे पचास रुपये वापस दे दो, दस रुपये में दुंगी.. त्याला आश्चर्य वाटले.. I am sorry ... बच्चो का फिफ्टी फिफ्टी शेयर करते हें ना????

-विजय सोनवणे

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive