Thursday, December 8, 2011

जगाचा अनुभव देणारी सहल - A picnic gives experience of world


आमची सहल एका कुटुंबापुरती र्मयादित नसते कारण ती आहे होणार्‍या भावी शिक्षकासाठी अर्थात डी.टी.एड. च्या मुलींची शैक्षणिक सहल. आमचे आंतरभारती औराद (शहा.) संचलित रमामाता आंबेडकर अध्यापिका विद्यालय आहे.
प्रतिवर्षी भारताचा एक भाग मुलींनी दाखवतो, भारताच्या यावर्षी तीन फेर्‍या पूर्ण होत आहेत. यावर्षी औसद-भालकी-हैदराबाद-आग्रा-दिल्ली-अमृतसर-कटरा (वैष्णोदेवी)-श्रीनगर-अमृतसर, औरंगाबाद-उदगीर-औसद (काश्मार दर्शन), शैक्षणिक सहलीचे ग्रामीण भागातील मुली, आर्थिकदृष्ट्या सर्वसाधारणच, प्रवेश घेतानाच आयोजन केले आहे. डी.टी.एड.ची दुसर्‍या वर्षी २0-३0 दिवसांच्या शैक्षणिक सहलीसाठी जाणे आवश्यक आहे. मग प्रथम वर्षाची परीक्षा झाल्यानंतर मुलींची बैठक घेऊन त्यांना विचारतो. पूर्ण कार्यक्रमाची आखणी करून त्यांना कमीत कमी बजेट सांगतो. ९0 दिवस अगोदर रेल्वेचे रिझर्वेशन करून घेतो. या पाच मुलींच्या मागे एक मार्गरक्षी असतो. तो मार्गरक्षी शिक्षक गटातील सर्व मुलींची, उठल्यापासून रात्री झोपेपर्यंंत काळजी घेतो. सहलीला जाण्यापूर्वी सर्व मुलींचा अपघात विमा काढला जातो. सर्व नियोजन अगोदरच केलेले असते. रात्रीचा प्रवास असेल तर रेल्वेत जेवण कसे देणार यांचेही नियोजन आम्ही करतो. यासाठी कोणीतरी त्या स्टेशनवर डब्बा देणार्‍याची सोय करतो. अगदी वेळेवर जेवण, चहा, नास्ता.. इ. ची व्यवस्था वाखाणण्याजोगी असते. तसेच पर्यटनस्थळ पाहण्यासाठी पत्र, संबंधितांना फोन करूनही व्यवस्था केली जाते.
सहलीत आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. त्याच्या आयुष्यातील हे संस्मरणीय दिवस असतात. कित्येक अत्यंत गरीब मुली असतात त्यांनाही यात सामावून घेतो. यातून आम्ही एकही रुपया वाचवत नाही. सोबत जाणारे शिक्षक आपले पैसे भरतात. सर्व हिशोब शेवटी मुलींना सादर करतो. सहलप्रमुख म्हणून दोन मुलीही काम पाहतात. हिशोब पाहतात. विशेष म्हणजे त्या-त्या प्रांतातील संस्कृती, वेशभूषा, भाषा, सामाजिक, शैक्षणिक संस्था, प्रेक्षणीय स्थळ, सामाजिक, शैक्षणिक संस्था मान्यवरांना भेटी, तारांगण, बोटिंग, रोप वे, मेट्रो ट्रेन असे तर आवर्जून दाखवतो. शिवाय त्या-त्या प्रांतातील विशिष्ट खाऊ त्यांना खाऊ घालतो. सहलीला जाण्यापूर्वी मार्गरक्षी शिक्षकांचे कार्यवाटप केले जाते. मोठय़ा शहरात खरेदीसाठी गटाने मुलींना पाठवतो. योग्य त्या सूचना दिलेल्या असतात. संपर्कासाठी पुरेसे मोबाईल असतात. खरेदी कशी करावी, बाजार कसा करावा? हे सांगून बाजारात सोडतो. सहली करून परत आल्यानंतर त्या मुलींमध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसतो. बैठक घेऊन, रेल्वेत कसे चढायचे, सामान किती घ्यायचे, काय घ्यायचे, सामानाची निगा कशी राखायची, एकमेकांची काळजी कशी घ्यायची, सामान कसे चढवायचे, उतरवायचे? याची सविस्तर माहिती अगोदर सांगितलेली असते. प्रत्येक ठिकाणाची सविस्तर सूचना दिलेली असते. याद्वारे आम्ही आमची शैक्षणिक सहल यशस्वी बनवत असते.

- शारदा जाधव

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive