Thursday, December 8, 2011

सौंदर्यवर्धक र्जदाळू आणि त्याचं तेल

सौंदर्यवर्धक र्जदाळू आणि त्याचं तेल

बदाम, काजू, बेदाणे, अक्रोड अशा सुक्या मेव्यातल्या तेलबियांची आणि त्यांच्या तेलांची चर्चा आपण काही लेखांमधून केली. सुक्या मेव्यातला आणखी एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे र्जदाळू. तेव्हा या लेखातून आपण र्जदाळू आणि त्याच्यापासून काढलेलं तेल यांच्या आरोग्याला पोषक अशा गुणधर्मांबद्दल माहिती करून घेणार आहोत.
'प्रूनस आरमेनिआका' असं शास्त्रीय नाव असलेल्या र्जदाळूला इंग्रजीत अँप्रिकॉट असं म्हणतात. र्जदाळूचा उगम आर्मेनियामधला आहे, असं मानलं जातं. पण काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, ख्रिस्तपूर्व ३000 च्या सुमारास भारतात र्जदाळूची लागवड केली जात होती. वाळवलेले र्जदाळू खाण्याची पद्धत पर्शियामध्ये फार पूर्वीपासून होती.
र्जदाळूचं झाड ८ ते १२ मीटर उंचीपर्यंत वाढतं. पाच पाकळ्या असलेली पांढरट गुलाबी मोठी फुलं झाडाला येतात. पीचसारखी दिसणारी फळं लागतात. सूर्यप्रकाशाकडे फळाची जी बाजू असते ती लालसर दिसते आणि फळाचा उरलेल्या भागाचा रंग पिवळसर केशरी असतो. फळावर अगदी छोटी मऊ अशी लव असते आणि फळाच्या आत बी असते.
र्जदाळूमध्ये भरपूर प्रमाणात अ जीवनसत्त्व, क जीवनसत्त्व, तंतू, ट्रिप्टोफॅन आणि पोटॅशियम असतं. अ जीवनसत्त्वामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी त्यांचा चांगला उपयोग होतो. त्यामध्ये भरपूर प्रमाणात असलेलं ंबीटा कॅरोटीन अँन्टिऑक्सिडंट गुणधर्माचं असल्याने रक्तातील विघातक कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे हृदयविकारावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. र्जदाळूमधील तंतूमुळे पोट साफ होण्यास मदत होते.
वाळवलेल्या र्जदाळूंमध्येही अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. लोहही असतं. उन्हामध्ये ते वाळवले जातात. पण त्यामधली बीटा कॅरोटीन आणि इतर कार्टिनॉइडस् आणि क जीवनसत्त्व टिकून राहण्यासाठी सल्फर डायऑक्साईड वापरून प्रक्रिया केली जाते. र्जदाळूच्या बीचं कठीण कवच फोडलं की, बदामाच्या आकाराची आणि चवीची बी बाहेर पडते. र्जदाळूच्या बी मध्ये सायनोजेनिक ग्लायकोसाईडस् ही रसायने भरपूर प्रमाणात असतात. कर्करोगावर उपचार म्हणून वापरलं जाणारं एक औषध या बियांच्या अर्कापासून बनवलेलं असतं. पाचव्या शतकापासून ट्युर्मसवर या बियांचा उपयोग केला जातो. इंग्लंडमध्ये १७व्या शतकात या बियांच्या तेलाचा उपयोग ट्युर्मस, अल्सर्स आणि सूज यावर उपचार म्हणून केला जात होता. २00५ मध्ये कोरियात झालेल्या संशोधनानुसार प्रोस्टेटच्या कर्करोगावर अँमिग्डॅलिनचा फार चांगला उपयोग होणं शक्य आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. र्जदाळूच्या बियांपासून तेल काढलं जातं आणि हे तेल अत्यंत औषधी असतं. हलक्या रंगाचं, छान वासाचं हे तेल त्वचेमध्ये खोलवर मुरतं आणि त्वचेवर तेलकटपणा रहात नाही. या तेलात अ आणि ई-जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा मऊ राहाणं, कांतिमान राहाणं यासाठी त्याचा फार चांगला उपयोग होतो. र्जदाळूच्या बियांच्या पुडीचा उपयोग बर्‍याच वेळा फेस मास्कमध्ये मृत पेशी काढून टाकण्यासाठी व त्वचा मऊ राहाण्यासाठी केला जातो. या तेलात भरपूर प्रमाणात अपरिहार्य मेदाम्ले असल्याने कोरड्या त्वचेला आद्र्रता मिळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्वचेच्या रोगांमध्ये त्वचेला थंडावा मिळण्यासाठी या तेलाचा उपयोग होऊ शकतो. परंपरागत वापरल्या जाणार्‍या चिनी औषधांमध्ये या तेलाचा उपयोग ट्युर्मससाठी केला जातो. त्वचेसाठी उपयुक्त अशा या तेलाच्या गुणधर्मांंमुळे आणि सहसा त्याची अँलर्जी येत नसल्याने हे तेल मसाज थेरपीसाठी, अँरोमाथेरपीमध्ये, तसेच लहान मुलांच्या लोशन, क्रिम वगैरेमध्ये आणि एकूणच सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरलं जातं. या तेलात लवेंडर तेल, टी ट्री तेल आणि जरेनियम तेल विशिष्ट प्रमाणात एकत्र करून हे मिश्रण मुरुंमांवर लावल्यास फायदा होतो.
र्जदाळूचं तेल बदामाच्या तेलासारखं असतं. त्याचा वासही तसाच येतो. त्यामुळे ते 'अमॅरेटो'सारख्या लायकरमध्ये वापरलं जातं. तसेच अनेक इटालियन पदार्थांमध्ये, सॅलड ड्रेसिंगमध्ये वापरलं जातं. पण र्जदाळूचं तेल खाण्यासाठी वापरण्यापूर्वी तेलाच्या बाटलीवर तसं स्पष्टपणे लिहिलं आहे, याची खात्री करून मगच पदार्थात घालावं. र्जदाळूच्या तेलाचा उपयोग हात आणि मानेचा भाग मऊ ठेवण्यासाठीही होतो. हे तेल केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. केस मजबूत बनवतं. म्हणूनच ते खूपदा केसांसंबंधीच्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरलं जातं. शाम्पू, हेअर लोशन्स यामध्ये बर्‍याच वेळा ते वापरलं जातं. साबण बनविण्यासाठीही त्याचा चांगला उपयोग होतो. र्जदाळूंमध्ये क जीवनसत्त्व असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठीही त्यांचा चांगला उपयोग होतो.
र्जदाळू वाळवताना सल्फर डायॉक्साईडचा उपयोग केला जातोच; पण ते जास्त दिवस टिकून राहण्यासाठी सल्फाईटस्चा वापर करतात. त्यांचा रंगही त्यामुळे टिकून राहतो; पण या सल्फाईटस्मुळे ज्यांना श्‍वसनाचा त्रास आहे, अशांना अँलर्जी येऊ शकते. सल्फाईटस् वापरून वाळवलेले र्जदाळू गडद केशरी रंगाचे दिसतात. तर सल्फाईटस् वापरून वाळवलेले र्जदाळू गडद केशरी रंगाचं दिसतात. तर सल्फाईटस् न वापरता वाळवलेले र्जदाळू तपकिरी रंगाचे असतात. आपल्या सुक्या मेव्यात वापरलेले र्जदाळू सल्फाईटस्विरहित असतात. मिठाईच्या दुकानात मिळणारे सुके केशरी रंगाचे र्जदाळू सल्फाईटस्चा उपयोग केलेले असू शकतात. त्यामुळे असे र्जदाळू वापरताना काळजी घ्यायला हवी. अर्थात्, 'ऑरगॅनिक' असा शिक्का असलेले र्जदाळू कोणत्याही सल्फर संयुगाचा वापर न केलेले असेच असतात.
सकाळच्या नाश्त्याला आपण जर कॉर्न फ्लेक्ससारख्या गोष्टी दुधात घालून खात असलो, तर त्यात दोन-तीन र्जदाळू तुकडे करून घालावे. त्याआधी ते पाण्यात किंवा दुधात भिजत घालावेत. सॅलडमध्येही अशाच प्रकारे भिजवलेल्या र्जदाळूंचे तुकडे घालता येतात. ताजे र्जदाळू मिळाल्यास गडद केशरी रंगाचे बघून घ्यावेत. कारण अशा र्जदाळूंमध्ये अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात. हल्ली आपल्याकडे अँव्हॅकॅडो हे फळ मिळतं. त्यामुळे त्याच्या आणि त्याच्या तेलाच्या गुणधर्मांंविषयी विचार करू पुढच्या लेखात.
- डॉ. वर्षा जोशी

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive