Sunday, December 18, 2011

आयुष्यातले शोर्टकट : योग्य कि अयोग्य ?

आयुष्यातले शोर्टकट : योग्य कि अयोग्य ?

काल वर्गात कॉम्प्युटरवर प्रॅक्टिस करत असताना एक विद्यार्थी वैतागून म्हणाला , `मॅम हा पी.सी. खूप slow चालतोय. मी format करू कां ?’ मी म्हंटले, `format कां करायचा बरं ? तू troubleshooting कर नां. विचार कर की काय problem असेल ? पी.सी. कां slow झाला आहे? virus आहे कां? garbage data आहे कां ? temperory files आहेत कां? एखादा program जास्त memory वापरतोय कां? स्कॅन करून बघ…..काय problem आहे ते शोधून काढ मग solution सापडेल .’ तो म्हणाला ,`ओ मॅम, खूप वेळ लागेल…. परत problem नाही सापडला तर शेवटी format करावाच लागेल … त्यापेक्षा आत्ताच format करतो.’ ‘अरे, format करणं हे solution नाही. ती पळवाट झाली . परत problem आला तर परत format करणार कां ?’ इति मी. नाखुशीनेच त्याने troubleshooting करून पाहिले. असे लक्षात आले की एक प्रोसेस , कॉम्प्युटरची मेमरी फ्री करत नव्हती, त्यामुळे कॉम्प्युटरवर बाकीचे प्रोग्राम लोड व्हायला उशीर लागत होता व तो slow झाला होता. problem लक्षात आल्यावर solution सापडले….

आपल्या रोजच्या जीवनात पण असे होत असते . खूप अडचणी, संकटे येत असतात. आपण तिथेच अडून राहून चालत नाही. त्यावर उपाय असतो तो फक्त शोधावा लागतो. आपण बऱ्याचदा पेपरमध्ये ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबद्दल’ वाचतो… प्रत्येक वेळी माझ्या मनात हाच विचार येतो … अडचणी, संकटे येतच असतात. पण त्यावर आत्महत्या हा उपाय नाही. ती पळवाट झाली . शांत डोक्याने विचार केला तर लक्षात येईल की जी काही अडचण आहे त्यावर मात करता येते. फक्त वेळ लागतो , निरनिराळे मार्ग अभ्यासावे लागतात . संयम ठेवणे खूप महत्वाचे आहे. कधी कधी असं वाटतं की ‘संयम ठेवणे’ ही tendency कमी होत चाललीय . त्याला कारणीभूत आजची परिस्थिती आहे. जर प्रत्येक गोष्ट, एका क्लिक वर, एका sms वर , हाकेच्या अंतरावर मिळत असेल तर वाट पाहणं, संयम ठेवणं हे वेळ वाया घालवण्यासारखं वाटतं. साधं उदाहरण घेऊ. पूर्वी घरी इडली करून खायची असेल तर किमान १ दिवस वाट पहावी लागायची. (डाळ,तांदूळ भिजवा, वाटा, ८-९ तास रुबवत ठेवा, मग इडली तयार करा. या process साठी १ दिवस लागायचाच.) आता ‍कोपर्‍यावरच्या वाण्याकडे इडलीचे तयार पीठ कधीही मिळते , जास्तीत जास्त अर्ध्या तासात घरी इडली तयार होते. असंच प्रत्येक गोष्टीत होते… त्यामुळे वाट पाहाणे हे मागासलेपणाचे वाटते. कमी मार्क मिळाले , हव्या त्या शाखेला अॅडमिशन नाही मिळाली, मुलीनं प्रेम करायला नकार दिला… (ही लिस्ट बरीच वाढेल) थोडक्यात हवे ते नाही मिळाले की कर आत्महत्या, संपवा आयुष्य!!! (पी.सी. हँग झाला , slow झाला , कर format ) हे इतकं सोपं असतं कां? आयुष्य इतकं स्वस्त आहे कां?

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive