साहित्य - दोन बटाटे, एक लाल सिमला मिरची, एक हिरवी सिमला मिरची, चार-पाच हिरव्या मिरच्यांची पेस्ट, आठ-दहा लसूण पाकळ्या, एक कांदा, दोन टे.स्पू. कॉर्न फ्लोअर, मीठ, पांढरी मिरी पूड, सोया सॉस, तेल.
कृती - बटाटे सोलून लांबट पातळ तुकडे करावेत. कांदा सिमला मिरच्या- लसूण पाकळ्या पातळ चिरून घ्यावा. बटाट्याच्या पातळ कापांना कॉर्न फ्लोअरमध्ये मिसळून तेलात कुरकुरीत होईपर्यंंंत तळून घ्यावेत. तेलातून काढून बाजूला ठेवावे. थोडे तेलात लसूण-कांदा- सिमला मिरच्यांचे काप घालून मिक्स करून नीट हलवावे. त्यात मिरची पेस्ट- मीठ-मिरीपूड- सोया सॉस घालून मिक्स करून तळलेल्या बटाट्याची कुरकुरीत सळी घालावी. मिक्स करून गरमागरमच सर्व्ह करावी.
२) मिक्स्ड व्हेजिटेबल्स अँण्ड बेबीकॉर्न इन शेजवान सॉस-
साहित्य- फ्लॉवर १00 ग्रॅम, ब्रोकोली १00 ग्रॅम, ५0 ग्रॅम गाजर, ५0 ग्रॅम मशरूम, दोन सिमला मिरची, एक कांदा, १00 ग्रॅम बेबी कॉर्न, १0/१२ लसूण पाकळ्या, आले, लाल मिरची पेस्ट दोन टे. स्पू., चार टे. स्पू. टोमॅटो केचअप, मीठ, सफेद मिरी पूड, एक टी. स्पू. २ टे.स्पू. कॉर्न फ्लोअर, एक टे. स्पू. तिळाचे तेल, सोया सॉस.
कृती - सर्व भाज्यांचे मध्यम चौकोनी काप करून थोडे पाणी घालून वाफवून बाजूला ठेवावे. कांदा-आले-लसूण बारीक चिरून घ्यावे. एका कढईत किंवा पॅनमध्ये तेल गरम करून कांदा आले, लसूण परतवून मिरची पेस्ट घालून परतावे. टोमॅटो केचअप व सर्व भाज्या घालून नीट हलवावे. गरजेनुसार पाणी टाकून भाज्या नीट शिजवाव्यात. मिरी पूड, मीठ घालावे. कॉर्न फ्लोअर पाण्यात विरघळून घालावे. शेवटी सोया सॉस व तिळाचे तेल घालून खाण्यास द्यावे.
३) व्हेजिटेबल रेन्बो सूप -
साहित्य - २0 ग्रॅम उकडलेले मशरूम, २५ ग्रॅम गाजर उकडलेले, २0 ग्रॅम फ्लॉवर उकडलेले, २0 ग्रॅम काळे मशरूम उकडलेले, लाल सिमला मिरची, अर्धी पालक चिरलेली, मीठ, थोडे आले, चार-पाच लसूण पाकळ्या, चिरलेली कोथिंबीर, एक टे.स्पू. राइस वाईन (यलो वाईन) दोन टे.स्पू., कॉर्न फ्लोअर पाव.
कृती- भाज्या बारीक चिराव्यात. सिमला मिरची पातळ लांबट चिरावी. पॅनमध्ये थोडे तेल घालून त्यात आले-लसूण घालून परतावे. भाज्या घालून नीट परतवून घ्यावा. शिजलेल्या भाज्यांचे पाणी घालावे. उकडावे. मीठ-राईस वाईन-कोथिंबीर घालावी. कॉर्न फ्लोअर पाण्यात विरघळून घालावे. दाटसर झाल्यावर सिमला मिरच्यांचे पातळ काप टाकून गरमागरम सर्व्ह करावे.
४) स्प्राऊटेड बीन्स फ्राईड राईस -
साहित्य - दोन वाट्या बासमती तांदूळ, एक हिरवी सिमला मिरचीचे पातळ लांबट काप, फरस बीनचे काप १/२ वाटी, गाजराचे बारीक तुकडे, अर्धी वाटी कोबीचे पातळ काप, एक वाटी, एक वाटी मोड आलेली वाफवलेली मूग, कांद्याच्या पातीचे तुकडे, तेल, मीठ, सोया सॉस, चिली सॉस, चवीला साखर, एक टे.स्पू.व्हिनेगर.
कृती - तांदूळ धुवून थोडे मीठ व तेल टाकून शिजवून घ्यावे. परातीत पसरून गार करून घ्या. मोठय़ा पसरट कढईत तेल तापवून भाज्या घालून दोन मिनिटं मोठय़ा आचेवर परतावी. कांद्याची पात घालू नये. वाफवलेली मूग घालावी. भाज्यांवर चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर, साखर, मीठ घालून मिक्स करावे. भात घालावा. शेवटी कांद्याची पात घालून ढवळावे. भातात पनीर किंवा हिरवे वाटाणो घातले तरी चालतील. गरमागरमग सर्व्ह करावे.
५) स्वीट गार्लिक व्हेजिटेबल्स-
साहित्य- हिरवी-लाल पिवळी तिन्ही सिमला मिरची १-१, फरस बी ७-८, ४-५ मशरूम, १ वाटी बारीक चिरलेली कोबी, लसूण, २ टे.स्पू. टोमॅटो सॉस, २ टे.स्पून कॉर्न फ्लोअर, २ टे.स्पू. चिली सॉस, २ टे.स्पू. सोया सॉस, २ टे.स्पू.साखर, तेल, व्हिनेगर, १ टे. स्पू. तिळाचे तेल, मीठ, दोन लाल मिरच्या.
कृती - सर्व भाज्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. लसूण बारीक चिरून घ्यावा. कॉर्न फ्लोअर पाण्यात मिसळून त्यात टोमॅटो सॉस, चिली सॉस, सोया सॉस, साखर-मीठ-व्हिनेगर घालून नीट मिसळून ठेवावे. पॅनमध्ये तेल घालून लसूण नीट मिसळून ठेवावे. पॅनमध्ये तेल घालून लसूण परतवून मिरच्यांचे तुकडे परतून सर्व भाज्या घालून परतवून पाणी टाकावे. शिजल्यावर कॉर्न फ्लोअरचे मिश्रण घालावे. रसा दाटसर सॉससारखा झाल्यावर गॅस बंद करावा. वरून तिळाचे तेल मिक्स करावे.
६) व्हेज मंचुरियन-
साहित्य - १ वाटी बारीक चिरलेली कोबी, १ वाटी किसलेले गाजर, अर्धी वाटी चिरलेली फरस बी, एक कांदा बारीक चिरलेला, एक वाटी किंवा गरजेनुसार मैदा, मीठ एक टी स्पू., चिली सॉस एक टे. स्पू. सोया सॉस.
ग्रेव्हीसाठी - २ टे.स्पू. टोमॅटो सॉस, एक टी स्पू. चिली सॉस, एक टे.स्पू. सोया सॉस, एक टे.स्पू. कॉर्न फ्लोअर, आठ-दहा लसूण पाकळ्या, चार-पाच लाल सुक्या मिरच्यांची भरड पूड, मीठ, तेल.
कृती - बारीक चिरलेल्या भाज्यात मैदा- मीठ- चिली सॉस- सोया सॉस एकत्र करावे. मैद्याचे प्रमाण गरजेप्रमाणे कमी-जास्त करावे. सर्व मळून मिक्स करून गरम तेलात भजीप्रमाणे तळून काढावेत. ग्रेव्हीसाठी पाण्यात टोमॅटो सॉस- चिली सॉस-सोया सॉस-मीठ मिक्स करावे. तेल गरम करून त्यात चिरलेला लसूण, सुक्या मिरच्यांची भरड पूड टाकून सॉसचे मिश्रण ओतावे. उकळी आल्यावर कॉर्न फ्लोअर पाण्यात विरघळून घालावे. उकळी आल्यावर उतरवून मंचुरियन बॉल्स घालून सर्व्ह करावे.
७) क्रिमी कॉर्न
साहित्य - स्वीट कॉर्न २५0 ग्रॅम, कॉर्न फ्लोअर २ वाटी, मीठ, पांढरी मिरी पूड एक टे.स्पून, तेल.
कृती - स्वीट कॉर्नची मिक्सरमधून भरड काढावी. कॉर्न भरड, मीठ, दीड वाटी कॉर्न फ्लोअर, मिरी पूड मिक्स करून एक कप पाणी टाकून मिश्रण दाटसर होईपर्यंंंत शिजवावे. तेलाचा हात लावलेल्या ताटात पसरवून वड्याप्रमाणे थापावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. अर्धा कप कॉर्न फ्लोअर पावडर पाण्यात घोळवून या मिश्रणामध्ये वड्या बुडवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळाव्यात. गरमागरम सर्व्ह कराव्यात.
- राजश्री शिंदोरे
No comments:
Post a Comment