ठाकरे बंधू मराठी माणसाला विसरले
पेडर रोडचे नामकरण समाजसुधारक डॉ. गोपाळराव देशमुख मार्ग असे करण्यात आले असतानाही उड्डाणपुलाच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोप करताना ठाकरेबंधूंना या मराठी मानचिन्हाचा विसर पडला, याचे तमाम मराठी माणसांना आश्चर्य वाटले आहे.
मराठी अस्मितेबाबत कडवी भूमिका जपणाऱ्या शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपेक्षा आपले मराठीप्रेम कडवे असल्याचा दावा करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना स्वतंत्र भारतानंतरचे मुंबईचे पहिले महापौर डॉ. गोपाळराव देशमुख यांचा विसर पडला.
गोपाळराव देशमुख हे समाजसुधारक होते. पेडर रोडवर त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य होते. सर जमशेदजी कांगा हे त्यांचे घनिष्ट मित्र होते. देशमुख यांचे हे कार्य व त्यांचे पेडर रोडशी असलेले नाते लक्षात घेऊन १९६६मध्ये (शिवसेनेची स्थापना झाली त्या वषीर्च) मुंबई महापालिकेने पेडर रोडचे नामकरण देशमुख यांच्या नावे केले. मात्र या मराठी मानचिन्हाचा ठाकरेबंधूंना पूर्ण विसर पडला आणि १८७९ साली म्हणजे ब्रिटिश आमदनीत महापालिका आयुक्त राहिलेल्या डब्ल्यू. जी. पेडर यांच्या नावानेच त्या दोघांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले.
पेडर रोडच्या नामकरणास चार दशकांहून अधिक काळ उलटून गेला तरी अजून मराठी माणसाच्या नेत्यांनीही देशमुखांच्या नावाचा स्वीकार केला नाही हे अपयश त्यांना कबुल करावे लागेल,
No comments:
Post a Comment