लस निर्मितीत जगात अग्रेसर असणाऱ्या "सिरम'चा दैनंदिन कारभार आदर पूनावाला
सांभाळतात. "लाइक फादर लाइक सन'प्रमाणे आयुष्याचा पूर्ण आनंद घेत आदर
व्यावसायिक यशाच्या पायऱ्या चढत आहेत. "इंटेग्रिटी जपा' असं त्यांचं
युवावर्गाला म्हणणं आहे.
लॅम्बोर्गिनी, फेरारीसारख्या महागड्या स्पोर्टस कार, जेट विमान आणि बॉलिवूडला लाजवेल अशी लाइफस्टाइल असलेला श्रीमंत, तरुण वारसदार अशी ओळख असलेले आदर पूनावाला आता अधिक परिपक्व झाले आहेत. वडील सायरस पूनावाला यांनी उभ्या केलेल्या व पंधराशे-सोळाशे कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल-तब्बल 650 कोटी रुपयांचा निव्वळ नफा असणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचा दैनंदिन कारभार संचालक (ऑपरेशन्स) म्हणून आदर सांभाळतात. इंजेक्शनद्वारे देता येईल अशी पोलिओवर लस तयार करणारी हॉलंडमधील कंपनी ताब्यात घेण्याच्या वाटाघाटी सध्या आदर पूनावाला करीत आहेत.
सायरस पूनावाला यांनी 1966 मध्ये "सिरम इन्स्टिट्यूट'ची स्थापन केली. धनुर्वातावरील लस आणि सापाच्या विषावरील औषधापासून सुरवात झालेली ही कंपनी आज 130 देशांना लस पुरविते. जागतिक आरोग्य संघटनेनं 1990 मध्ये मान्यता दिल्यानंतर "सिरम'ची झपाट्याने प्रगती झाली. ""मी दहा वर्षांचा असल्यापासून कंपनीत येत आहे. इथल्या लॅबमध्ये मी खेळायचो. 2001 पासून मी पूर्ण वेळ काम सुरू केलं. आमच्या कंपनीत सीईओ नाहीत. पण एखाद्या सीईओला माहीत नसतील इतके कंपनीतील प्रत्येक विभागाचे बारकावे मला माहीत असतात. त्यामुळे झटकन निर्णय घेणे शक्य होते. हे घडू लागले तसा सहकाऱ्यांचा माझ्यावरील विश्वास वाढला. प्रत्येक विभागाशी थेट संवाद करण्यावर माझा भर आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वी वडील ज्या गोष्टी सांगत होते त्याचं महत्त्व आता पटतंय, ''आदर म्हणाले.
न्यूमोनियावरील लस हे ध्येय...
"सिरम' जगात सर्वांत जास्त डोस तयार करणारी कंपनी आहे. एमएमआर, डीपीटी या पारंपरिक लशींबरोबरच नव्या लशींच्या निर्मितीसाठी सायरस व आदर पूनावाला प्रयत्नशील आहेत. आदर पूनावाला यांच्यासाठी न्यूमोनियावरील लस हे "ड्रीम व्हॅक्सिन' आहे. ते म्हणाले, ""जगात बालमृत्यूच्या कारणांमध्ये सर्वाधिक प्रमाण न्यूमोनियाचे आहे. तीन वर्षांत न्यूमोनिया रोखणारी लस तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व्हिकल कॅन्सर रोखू शकेल अशा लशीवरही काम सुरू आहे. कर्करोगावर लसनिर्मिती तूर्त तरी शक्य वाटत नाही. आजारी पडू नये याची काळजी घेण्याची मानसिकता नसल्याने लस घेण्याकडे लोकांचा कल नसतो. दुसरीकडे देशात आरोग्य क्षेत्राविषयी, विशेषतः प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी खूप दुर्लक्ष आहे. आफ्रिकेतील देश, अगदी बांगलादेशसारखा देशही आपल्यापुढे आहे.''
रिस्कटेकर व्हा... "सिरम'चा प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी रिस्क घेणे भाग असल्याचे सांगून आदर पूनावाला म्हणाले, ""हॉलंडमधील कंपनी ताब्यात घेण्याचा निर्णय ही मोठी रिस्क आहे. त्या कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे आव्हान आमच्यापुढे आहे. आम्ही आतापर्यंत आमची उत्पादनप्रक्रिया पुण्याबाहेर नेलेली नाही. आता तिकडचेही नियम पाळावे लागतील. लशींची मागणी कमी होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत असताना उत्पादनक्षमता दुपटीने-तिपटीने वाढविण्याचा धोका वडिलांनी पत्करला. त्याचे चांगले परिणाम आता दिसत आहेत. मध्यंतरी कंपनी पब्लिक लिमिटेड करण्याचा आमचा विचार होता. मात्र त्यातून फायदा कमी व बंधने जास्त येतील म्हणून तो मार्ग आम्ही स्वीकारला नाही. मात्र रिस्क घेतल्याशिवाय प्रगती होत नाही, हे तितकेच खरे.''
ज्यात सर्वोत्तम तेच करा... विविध आजारांवरील लशींचे संशोधन व निर्मिती हे "सिरम'चे बलस्थान आहे. ज्यात आपण सर्वोत्तम तेच करायचे, असे आमचे धोरण आहे, असे आदर यांनी सांगितले. ""त्यामुळेच फार्मा क्षेत्रात उतरण्याचा आमचा विचार नाही. यामागे दोन कारणे आहेत. व्यावसायिकदृष्ट्या, "इकॉनॉमी ऑफ स्केल'मुळे लसनिर्मिती जास्त व्यवहार्य आहे. मानवी मूल्यांच्या दृष्टीने लाखो बालकांचे आयुष्य वाचविणाऱ्या लशी अधिक महत्त्वाच्या आहेत.''
सचोटीने प्रगती करा...
आदर यांच्या विचारांवर स्वाभाविकपणे सायरस पूनावालांचा प्रभाव आहे. त्याविषयी आदर म्हणाले, ""झटपट श्रीमंत होण्याच्या महत्त्वाकांक्षेतून अनेकदा तत्त्वांना तिलांजली दिली जाते. कितीही पैसा असला तरी "इंटेग्रिटी' विकत घेता येत नाही, असे माझे वडील सांगतात. विश्वास, श्रद्धा, निष्ठा या गोष्टींनी तडा जाऊ देता कामा नये, भले प्रगतीसाठी वेळ लागला तरी चालेल. ब्रॅंड व्हॅल्यू, ब्रॅंड व्हॅल्यू असे म्हटले जाते ते नाही तरी वेगळे काय आहे. प्रत्येक गोष्टीत यश मिळेलच असे नाही. लसनिर्मितीसारख्या अवघड क्षेत्रात तर ही वेळ अनेकदा येऊ शकते. अपयशी झालो म्हणून प्रयत्न सोडून चालत नाही. पुनःपुन्हा प्रयत्न करावा लागतो. प्रगती करण्यासाठी हा संयम आवश्यक आहे.''
श्रीमंत असणे काही गुन्हा नाही. वैभवाबरोबर अधिकार आणि जबाबदाऱ्याही येतात. समाजाकडून मिळालेले समाजाला परत देणे ही श्रीमंतांची नैतिक जबाबदारी आहे. बिल गेट्स हे याचे आदर्श उदाहरण आहे, असे आदर म्हणाले.
काही लाख मुलांचे प्राण आमच्या लशींमुळे वाचले आहेत ही भावना "सिरम'चा प्रेरणास्रोत आहे. या इतका आनंद अन्य कशात नाही. प्रत्येकाने आपल्या आयुष्याची प्रेरणा शोधायला हवी, असेही आदर म्हणाले.
आदर पूनावालांचा "गुरुमंत्र' अपयश पदरी आले तरी प्रयत्न अर्ध्यावर सोडू नका.
तुमच्यावरील विश्वासाला, श्रद्धेला तडा जाऊ देऊ नका.
इंटेग्रिटी जपण्याचा प्रयत्न करा.

No comments:
Post a Comment