Thursday, August 23, 2012

आम्लपित्तावर उपाय काय? what is aamla pitta?

बदलत्या जीवनशैलीमुळे आम्लपित्तासारखे आजार नित्याची बाब झाली आहे. हा आजार होणाऱ्यांत सोळा-सतरा वर्षांच्या तरुणांची संख्या वाढत चालली आहे. वेळीच उपाययोजना करून त्यापासून सुटका करून घेणेही गरजेचे आहे...

दिनमानातील अनियमितपणा आणि त्यामुळे पचनक्रियेतील बिघाड यांचा परिणाम म्हणजे आम्लपित्त. आधुनिक शास्त्राप्रमाणे, हायपर ऍसिडिटी, मळमळ ही लक्षणेही हाच आजार दर्शवितात.
पित्त वाढण्याची कारणे
आहार
अकालभोजन - वेळी-अवेळी जेवण, अतिचहापान, जेवणानंतर लगेच झोपणं.
विरुद्ध भोजन - फ्रूटसॅलड, मसालेदार पदार्थ, जेवणाशेवटी आइस्क्रीम.
विदाही भोजन - तिखट, आंबट, गोड, रूक्ष पदार्थांचा संयोग. भेळ किंवा पाणीपुरीचा जेवणामध्ये समावेश.
शिळे अन्न खाणे.
आंबवून तयार केलेले ब्रेड, इडली, डोसा, ढोकळा इत्यादी.
पिझ्झा, बर्गर किंवा स्ट्रीट फूड.

विहार - निद्रा विपर्यय - रात्री जागरणे आणि दुपारी झोप.
गरम पाण्याने फार वेळ स्नान.
उन्हात जास्त वेळ फिरणे.
भोजनानंतर लगेच वाहन चालवणे किंवा परिश्रमांनंतर लगेच जेवायला बसणे.
व्यसने - चहा, कॉफी, कृत्रिम शीतपेये, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान, गुटखा.

लक्षणे अन्नाचे पचन न होणे.
आंबट, कडू, करपट ढेकरा.
छातीत जळजळ किंवा वेदना.
अधिक लाळ उत्पन्न होणे.
भूक न लागणे किंवा जिभेला चव नसणे.
मळमळ किंवा उलटी होणे.
चक्कर, उचकी, पोट फुगणे किंवा गॅस.
डोके दुखणे.
शौचाला असमाधानकारक होणे.

चिकित्सा - आम्लपित्ताला प्रतिबंध करायचा असेल तर शरीरातील दुष्ट पित्त काढून टाकायला हवे. त्यासाठी वमन व नंतर मृदू विरेचन वैद्यांच्या सल्ल्यानुसार घ्यावे.
- त्यानंतर शमन उपचाराचे नियोजन करावे. हलके अन्न खावे.
- आवळा, शतावरी, गुडूचू, काडेचिराईत या द्रव्यांचा उपयोग.
- कामदुधा, सूतशेखर, प्रवाळपंचामृत आदी कल्प.
- भूनिंबादी, शतावर्यादी आदी काढे.

पथ्ये
ही व्याधी नष्ट करण्यामागे आहाराची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे आहार भूक वाढवणारा व पचणारा असायला हवा.
गहू, जुने तांदूळ, ज्वारी, नाचणी.
मूग, मसूर, मटकी, चवळी.
कोहळा, दुधी, लाल भोपळा, तोंडली, दोडका, पडवळ, केळफूल, भेंडी, कोबी, घोसावळे, छोटी वांगी, चवळीच्या शेंगा, फरसबी, श्रावणी घेवडा.
पालक, चवळई, माठ.
बीट, गाजर, कांदा आणि आले.
डाळिंब, सफरचंद, शहाळे, अंजीर, आवळा, केळी, सीताफळ, कलिंगड, द्राक्षे, खरबूज.
गाईचे दूध, ताजे ताक, लोणी, तूप.
आवळा, दुधीची साले किंवा दोडक्‍याच्या शिरांची चटणी.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive