Thursday, August 23, 2012

Organ transplant

एका प्राध्यापकाचा अपघात होतो. त्याचा मित्रच असलेला डॉक्‍टर त्यांचे ऑपरेशन करतो. ऑपरेशनमध्ये त्याला दुसऱ्या एका व्यक्तीचा मेंदू प्राध्यापकाला दिला जातो. दुर्दैवाने ज्या व्यक्तीचा मेंदू दिला जातो, ती व्यक्ती गॅंगस्टर असते आणि सुरू होतो थरार... 1940 मध्ये रिलीज झालेला हॉलिवूडमधला "ब्लॅक फ्रायडे' हा सिनेमा.

काळाच्या पुढे जाणारे सिनेमे देणारी फॅक्‍टरी म्हणून हॉलिवूडचा उल्लेख केला जातो. त्यात विज्ञान-तंत्रज्ञानाला तर हॉलिवूडने कायमच डोक्‍यावर घेतले आहे. "ब्लॅक फ्रायडे'सारखा सिनेमा हॉलिवूड 1940 मध्येही किती प्रगल्भ होते, याचेच उदाहरण देतो. "ऑर्गन ट्रान्सप्लंट' या विषयावरील हॉलिवूडचा प्रत्येक सिनेमा आपलं वेगळेपण जपणारा होता. ब्रेन ऑफ ब्लड (1972), "हार्ट' (1999), "न्यू ब्लड' (1999), रेस अगेंस्ट टाइम (2000) असे एक से एक सिनेमे हॉलिवूडने दिले आहेत. याच विषयावरचा "फेस ऑफ' हा एक वेगळ्याच धाटणीचा सिनेमा म्हणून उल्लेख करता येईल. "फेस ऑफ'मध्ये केवळ ब्लड ग्रुप वगळता दोन माणसांची पूर्ण अदलाबदल होते. कुख्यात गुन्हेगार आणि एक प्रामाणिक पोलिस अधिकारी एकमेकांच्या दुनियेत जातात. "फेस ऑफ' विज्ञान कथांच्या रांगेतील उल्लेखनीय सिनेमा गणला जातो.

भारतीय सिनेमांचा विचार केला तर अनिल कपूरचा "साहेब' (1985) सोडला तर "ऑर्गन ट्रान्सप्लंट'सारखा विषय फारसा कुणी हताळलेला नाही. "साहेब'चाही मध्यवर्ती विषय "ऑर्गन ट्रान्सप्लंट' नव्हताच मुळी. सिनेमाच्या क्‍लायमॅक्‍समध्ये हिरो अनिल कपूरची "किडनी ट्रान्सप्लंट' केल्याचे दाखविण्यात आले होते. दक्षिणेत मात्र "ऑर्गन ट्रान्सप्लंट' "सर्वम्‌' हा एक अप्रतिम तमीळ सिनेमा 2009 मध्ये आला होता. त्रिशा या आघाडीच्या नायिकेची यात मुख्य भूमिका होती. पतंगाचा दोरा गळ्याला लागून नायिकेचा मृत्यू होतो आणि तिचे हृदय एका 10 वर्षांच्या मुलाला बसविले जाते. सिनेमाचा व्हिलन त्या मुलाची हत्या करण्याचा प्रयत्न करत असतो आणि नायक प्रेयसीचे केवळ हृदय जिवंत आहे, या आशेवर त्या मुलाला वाचविण्यासाठी धडपडत असतो.

भारतात अशा विषयावर सिनेमे तयार झाले नसले तरी आशयप्रधान सिनेमे देणाऱ्या हॉलिवूडने "ऑर्गन ट्रान्सप्लंट' हा विषय नेहमीच उचलून धरला आहे. आजवर या विषयावरील दोन डझन सिनेमे हॉलिवूडमध्ये तयार झाले आहेत. जणू "ऑर्गन ट्रान्सप्लंट(organ transplant)'ने हॉलिवूडला मोहिनीच घातल्याचं दिसतंय.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive