Thursday, August 23, 2012

स्पर्धा परीक्षा: असिस्टंट कमांडंट निवड परीक्षा- 2012


केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे केंद्रीय पोलिस दलाच्या विविध विभागांतर्गत असिस्टंट कमांडंट म्हणून नेमणूक करण्यासाठी घेण्यात येणा-या निवड परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

जागांची संख्या व तपशील : या निवड परीक्षेअंतर्गत भरल्या जाणा-या जागांची संख्या 401 असून, त्यामध्ये सीमा सुरक्षा बल 94, केंद्रीय राखीव पोलीस दल 223, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल 44, इंडो-तिबेट सीमा पोलीस 26 व सशस्त्र सीमा बल 14 याप्रमाणे जागांचा समावेश आहे.

आवश्यक पात्रता : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असायला हवेत.

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 25 वर्षांहून अधिक नसावे, वयोमर्यादेची अट अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांसाठी 5 वर्षांनी तर इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 3 वर्षांनी शिथिलक्षम आहे.

निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावर 11 नोव्हेंबर 2012 रोजी निर्धारित परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणा-या परीक्षा केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील नागपूर व मुंबई या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणा-या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.

अर्जासह पाठवायचे शुल्क : उमेदवारांनी अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून 200 रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा त्याच्या सहयोगी बँकेत रोखीने भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशील : ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 28 जुलै ते 3 आॅगस्ट 2012 च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या  www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर अर्जाची शेवटची तारीख 26 आॅगस्ट 2012.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive