Monday, August 20, 2012

LG optimus X HD Smart phone एलजी ऑप्टिमस फोन एक्स एचडी हवाहवासा स्मार्टफोन

एलजी LG या इलेक्ट्रॉनिक उत्पादन Electronics Production क्षेत्रातील कंपनीने गेल्या चार ते पाच वर्षांत चांगलीच भरारी जागतिक बाजारपेठेत मारली आहे. प्रत्येक उत्पादन क्षेत्रामध्ये विक्रीचे वेगवेगळे स्तर असतात. सामान्यत: उत्पादन वापरणाऱ्यांच्या क्रयशक्तीनुसार ते ठरत असतात. म्हणजेच मोबाइल वापरणाऱ्यांच्या बाबतीत बोलायचे तर भारतासारख्या देशात केवळ गरीब आणि श्रीमंत असे दोन वर्ग करून चालत नाहीत. इथे आयफोन वापरणारा जसा एक वेगळा वर्ग आहे. तसा सॅमसंग गॅलेक्सी नोट वापरणाऱ्यांचाही एक वेगळा वर्ग आहे आणि हा आयफोन वापरणाऱ्यांच्याच एवढी क्रयशक्ती राखतो.
एक मोठा वर्ग हा मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग आहे. यातही उच्च मध्यमवर्ग आपल्याला सॅमसंगकडे वळलेला दिसतो, तर त्याही खाली असलेला मध्यमवर्ग हा एलजीसारख्या कंपन्यांच्या उत्पादनाकडे वळला आहे किंवा अगदी निम्न स्तरामध्ये असलेल्या वापरकर्त्यांला वाटते की, त्याने वरच्या स्तरामध्ये सरकावे. मात्र त्याला सॅमसंग तेवढा परवडणारा नसतो. असा एक वर्ग गेल्या दोन वर्षांत मोठय़ा प्रमाणावर एलजीच्या उत्पादनांकडे वळलेला दिसतो.

ग्राहकांचा लसावि
एका बाजूला बाजारपेठेत हे असे बदल होत असले तरी मोबाइलसारख्या उत्पादनाच्या बाबतीत बोलायचे तर इथला ग्राहक हा अतिशय लहरी आहे आणि सातत्याने बदल हा त्याचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. त्यामुळे अलीकडे मोबाइल कंपन्या काय करतात तर ग्राहकांच्या आवडीनिवडीचा लसावि काढतात आणि त्याप्रमाणे आपल्या उत्पादनामध्ये बदल करतात. काही बाबी या मोबाइलच्या बाबतीत अशा आहेत की, ज्या सर्वच आर्थिक स्तरांतील ग्राहकांना लागतातच लागतात. म्हणजे त्या शिवाय त्यांना शक्य नसते.

मोठा स्क्रीन Big Screen
अलीकडच्या काळाच्या बाबतीत बोलायचे तर मोठय़ा आकाराचा स्क्रीन हे आता चांगल्या मोबाइलचे महत्त्वाचे लक्षण आहे. म्हणूनच आता एलजी, सॅमसंग किंवा इतर कोणताही मोबाइल यांमधल्या काही महत्त्वाच्या बाबी या सर्वच फोन्सच्या बाबतीत समान आढळतील. एलजीने अलीकडेच बाजारात आणलेला एलजी ऑप्टिमस फोरएक्स एचडी हा फोन काही त्याला अपवाद नाही. एलजीने बाजारात आणलेला हा पहिलाच क्वाड-कोअर टेग्रा थ्री असा हॅण्डसेट आहे. २०१२च्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्येच खरेतर एलजीने त्याची अधिकृत घोषणा केली होती. ४.७ इंचाचा डिस्प्ले (१२८०x७२० पिक्सेल्स) हा ट्र एचडी आयपीएस डिस्प्ले मानला जातो.

वेगवान प्रोसेसर Fastest Processor
 या मॉडेलसाठी १.५ गीगाहर्टझ् क्वाड कोअर टेग्रा थ्री प्रोसेसर कंपनीने वापरलेला असून हा अतिशय उच्च क्षमतेचा आहे. अँड्रॉइडच्या अद्ययावत अशा ४.० (आईस्क्रीम सँडविच) या ऑपरेटिंग सिस्टीमवर हा फोन काम करतो.

ऑटो फोकस कॅमेरा
याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे तब्बल ८ मेगापिक्सेलचा ऑटो फोकस कॅमेरा. मोबाइलच्या कॅमेऱ्याला आता मोबाइलइतकेच महत्त्व आले आहे. किंबहुना मोबाइलची खरेदी करताना ‘किती मेगा पिक्सेलचा कॅमेरा आहे?’ हा ग्राहकांचा एक सर्वाधिक महत्त्वाचा असा प्रश्न असतो. हा मोबाइल स्मार्टफोन वर्गात मोडणारा आहे.

alt सडपातळ व वेगवान
स्मार्टफोनचे दुसरे नाते हे अपडेटशी आहे आणि स्मार्टफोनचा वापर करून ग्राहकांना सोशल नेटवर्किंग साइटस्वर फोटो किंवा स्टेट्स अपडेट करण्याकडे अधिक कल असतो. या सर्व गरजा हा मोबाइल पूर्ण करू शकतो. अनेकानेक सुविधा वाढल्या की, मोबाइलचा आकारही वाढतो. पण स्मार्टफोनचे नाते हे सडपातळतेशी जोडलेले आहे. त्यामुळे स्मार्टफोन हा मात्र ग्राहकांना सडपातळ असाच लागतो. या एलजीच्या मोबाइलची जाडी ही केवळ ८.९ मि.मी. एवढीच आहे.

१६ जीबी इंटर्नल मेमरी 16 GB Internal Memory
भरपूर काम करायचे तर त्याची साठवणूक क्षमताही चांगली असायला हवी, असे ग्राहकांना नेहमीच वाटत असते. हे गृहीत धरून अनेक मोबाइल कंपन्या आपल्या हॅण्डसेटमध्ये एक्सटेंडेड मेमरीसाठी एक स्लॉट ठेवतात आणि त्याच्या माध्यमातून मोबाइलची साठवणूक क्षमता वाढविता येते. एलजी मात्र मुळातच देताना तब्बल १६ जीबीची इंटर्नल मेमरी या हॅण्डसेटला दिली आहे. त्याशिवाय कामे वेगात करता यावीत, मल्टिटास्किंग असावे यासाठी एक जीबी एलपी डीडीएमटू रॅमची सोयही दिली आहे.

क्विक मेमो अ‍ॅप
काही वेळेस अचानक काही लिहून घेण्याचा प्रसंग येतो आणि मग आपण गडबडून जातो. ते टाळण्यासाठी एलजीने याच मॉडेलमध्ये क्विक मेमो अ‍ॅपची सोय करून दिली आहे. त्यामुळे स्क्रीनवरच केवळ टच करून एखादी नोंद पटकन करता येते आणि तेवढीच घाई असेल तर ती नोंद तेवढय़ाच वेगात सोशल नेटवर्किग साइटवर अपडेटही करता येते. यातही ती नोंद ई-मेल मार्फत किंवा टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून अपडेट करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. याशिवाय मीडिया प्लेक्सच्या माध्यमातून फोटो मोठा करण्याची, व्हिडीओ पाहण्याची सोय देण्यात आली आहे. यात लाइव्ह झूमिंग आणि टाइम कॅच शॉटचीही सोय आहे.

थ्रीजी कनेक्टिव्हिटी
अर्थात हा लेटेस्ट असा स्मार्टफोन असल्याने तो थ्रीजी फोन आहे. त्याचबरोबर वाय-फायसह डीएलएनए, ब्लूटूथ, जीपीएस, एचडीएमआय एमएचएल व एनएफसीच्या माध्यमातून अशा सोयी यात आहेत. सोबत लिथियम आयन बॅटरी आहेच.
भारतीय बाजारपेठेतील किंमत- रु ३४,९९० /-

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive