पर्यटनाच्या
क्षेत्रातही आता करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत. जसजसा हा व्यवसाय
वाढतोय तेवढ्या जास्त रिक्रुटमेंट्स या क्षेत्रात निर्माण होताना दिसत
आहेत.
1. ट्रॅव्हल एजन्सीज : जे ग्राहक फ्रेंडली म्हणजे कम्युनिकेटिव्ह आहेत, त्यांना तर या क्षेत्रात मोठा वाव आहे. मार्गावरील हॉटेल, तिकिटे ई-बुक करुन देण्यापासून ते व्हिसा काढून देणे यापासून हे काम सुरू होते. आता या क्षेत्रातील तंत्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी तंत्रनिकेतनमधून ट्रॅव्हल अॅणड टिकिटिंगचा डिप्लोमा आपण करू शकता. सहसा हे कोर्सेस 3 ते 6 महिन्यांचे असतात. दिल्ली टुरिझम खात्यात तर यातील शॉर्टटर्म कोर्सेस आहेत. मात्र फ्रेशर्सही यात डिप्लोमाशिवाय एंट्री करू शकतात.
2. टूर ऑपरेटर : काही कंपन्या काही ठिकाणांसाठी रिव्हर राफ्टिंग, हँग ग्लायडिंग, रॉक क्लायंबिंग, कॅम्पिंग अशा पद्धतीच्या साहसी टूरचेही आयोजन करतात. अशा वेळी कंपन्यांनालोकांना शिकवणारे-विश्वासात घेणारे त्यांना सांभाळून टूर पुढे नेणारे टूर ऑपरेटर हवे असतात. त्यामुळे असे काम करण्याची संधी रोजगाराच्या रूपात तरुणांना उपलब्ध आहे. यात फॉरेन ग्रुपसाठी मुलींना पसंती दिली जाते. तर घरगुती टुरिस्ट ग्रुपसाठी अनुभवी व्यक्तीस जेंट्सला पसंती दिली जाते.
3. हॉलिडे कन्सल्टंट : ही एक नवीन संकल्पना आहे जेथून प्रवासी ग्राहक त्यांच्या प्रवासाविषयी त्यांना पाहिजे तो सल्ली घेऊ शकतात. हॉलिडे कन्सल्टंट तुमच्या सुट्या प्लॅन करू शकतो. तिकीट व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, विविध हॉलिडे प्लॅन तुमच्या गरजेनुसार तो अरेंज करू शकतो. विविध ठिकाणांविषयीचे संपूर्ण ज्ञान व इतर तसेच अॅडव्हेंचरस गोष्टींची आवड असलेली व्यक्ती उत्तम हॉलिडे कन्सल्टंट बनू शकते.
4. टुरिस्ट गाइड : पर्यटनस्थळाची माहिती देणे हे त्यांचे काम आहे. पर्यटन मंत्रालय तीन प्रकारच्या टुरिस्ट गाइड्सना लायसन्स देते. त्यात रिजनल, स्टेट लेव्हल आणि मॉन्युमेंट (स्मारकस्थळ) गाइड्स हा तीन महिन्यांचा कोर्स असून नंतर याची टेस्ट देऊन तुम्ही लायसन्स मिळवू शकता. असा प्रशिक्षित परवानाधारक गाइड दिवसाकाठी हजार-दीड हजार रुपये सहज कमवू शकतो. शिवाय या गाइडना फॉरेन टुरिस्ट कंपन्या, ग्राहक, रेस्टॉरंट यांच्याकडून कमिशन मिळवता येते. मात्र माहितीपूर्ण व विविध भाषांत बोलता आले पाहिजे आणि याची वयोमर्यादा 50 आहे.
5. एअरलाइन्स : येथे ही फ्लाइट ड्यूटीसाठी, ग्राउंड ड्यूटीसाठी व इतर कामासाठी प्रशिक्षित व्यक्तींची गरज असतेच. ट्रॅव्हल किंवा मॅनेजमेंटमधील पदवी यात तुम्हाला मदतगार ठरू शकते. मात्र व्यक्तिमत्त्व आकर्षक हवे. पगाराबरोबरच चांगले स्टेटसही तुम्हाला या क्षेत्राकडे आकर्षित करू शकते.

Job with social work opportunity. We are provide village level technology. So we are recruiting 'COORDINATOR' please call -; 7798191319 only serious person.
ReplyDelete