Thursday, August 23, 2012

प्रत्येक कामात यशस्वी होण्यासाठी करा या यंत्राची पूजा...


कोणतेही महत्वाचे काम करण्यापूर्वी आपल्या मनात शंका येतेच की, आपले काम पूर्ण होईल का नाही. अनेकदा असे होते की, आपल्या कामात काहीतरी विघ्न येतात आणि ते काम पूर्ण होऊ शकत नाही. जर तुम्हाला प्रत्येक काम यशस्वीपणे पार पाडायचे असेल तर मंगळ यंत्राची पूजा करणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ ग्रह अशुभ असेल तर मंगळ यंत्राची पूजा करा. या यंत्राची पूजा केल्याने सर्व कामे निर्विघ्न पार पडतील. मानागल ग्रहाचा अशुभ प्रभाव नष्ट होईल.

लाभ व उपयोग

राजकारण, गृहस्थ जीवन, नोकरी इतर क्षेत्रात अडचणी निर्माण होत असतील तर या यंत्राचे पूजन अवश्य करा. सर्व अडचणी दूर होतील, सुख-समृद्धी प्राप्त होईल. या यंत्रासमोर बसून सिद्धिविनायक मंत्राचा नियमित जप केल्याने सुखाची प्राप्ती होते.

यंत्राची पूजा करताना खालील मंत्रांचा जप करावा.

- ओम् मंगलाय नम:

- ओम् भूमिपुत्राय नम:

- ओम् ऋणहन्त्रये नम:

- ओम् धनप्रदाय नम:

- ओम् स्थिरासनाय नम:

- महाकामाय नम:

- सर्वकाम विरोधकाय नम:

- लोहिताय नम:

- लोहितागाय नम:

- सांगली कृपाकराय नम:

- धरात्यजाय नम:

- कुजाय नम:

- भूमिदाय नम:

- भौमाय नम:

- धनप्रदाय नम:

- रक्ताय नम:

- सर्व रोग प्रहारिण्ये नम:

- सृष्टि कर्ते नम:

- वृष्टि कर्ते नम:

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

3,126,843

Categories

Blog Archive