Thursday, August 23, 2012

येथे 'बॉडी पार्ट' मिळतील ! Dehdaan-body part donation

केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर देशभर मानवी अवयव प्रत्यारोपणाचा (ऑर्गन ट्रान्सप्लांट) मुद्दा ऐरणीवर आला. काय आहे प्रत्यारोपणातील वस्तुस्थिती? प्रत्यारोपणाच्या वैद्यकीय विकासाचा भविष्यकाळ कसा असेल? सरकारचे घोडे अडले कोठे? अशा विविध प्रश्‍नांचा वेध...

अजून 50 किंवा 100 वर्षांनी मानवी जीवन कसे असेल? सध्याच्या मॉड्युलर उपकरणांप्रमाणे माणूसही मॉड्युलर झाला असेल का? एखादे उपकरण बिघडले की त्यातील बिघडलेला भाग बदलून त्या जागी नवा भाग लावतो, त्याप्रमाणे शरीरालाही सुटे भाग लावले जातील का? सध्या अशक्‍य वाटणारी ही गोष्ट अगदीच असाध्य नाही. संपूर्ण शरीरच अशा सुट्या भागांनी तयार करणे तेव्हा साध्य झालेले असेल.

आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा गोष्टी प्रत्यक्षात येण्यास सुरवात झाली आहे. हृदय, यकृत, स्वादुपिंड, मूत्राशय असे कित्येक कृत्रिम अवयव आता वैज्ञानिकांनी विकसित केले आहेत. त्यात आता कृत्रिम रक्ताचीही भर पडली आहे. व्याधिग्रस्त अवयवाच्या जागी सक्षम अवयवाच्या प्रत्यारोपणाची उपचारपद्धती अवलंबण्यात येत आहे. मूत्रपिंड, डोळ्यांच्या बाहेरील स्वच्छपटल, यकृत, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या यांच्या जागी सक्षम अवयवांचं प्रत्यारोपण होत आहे. संपूर्ण हृदयरोपणही काही रुग्णांच्या बाबतीत करण्यात आलं आहे

इलेक्‍ट्रॉनिक नाक, बायॉनिक कान
नाकाला काही झाले तर नुसते हाड मोडले तर त्याचे ऑपरेशन करता येईल; पण गंधज्ञान गेले तर, आता इलेक्‍ट्रॉनिक नाक तयार होत आहे. कानाच्या बाबतीतही हीच गोष्ट आहे. बायॉनिक कान तयार झाला आहे. भारतातील वेल्लोर येथील डॉ. वलियाथन यांनी हृदयाच्या कृत्रिम झडपा तयार केल्या. एवढेच नव्हे, तर कृत्रिम लिंग, कृत्रिम त्वचा आणि कृत्रिम रक्तही आता तयार झाले आहे. हे सर्व अवयव प्रयोश शाळेत तयार करण्यात आले आहेत. त्यांच्या चाचण्या जगभरात सुरू आहेत. कृत्रिम रक्ताचा प्रयोगही प्राथमिक अवस्थेत आहे. भविष्य काळात तो पूर्ण यशस्वी होऊन खऱ्या रक्ताप्रमाणे ते रक्त प्राणवायूचा पुरवठाही शरीराला करू शकेल.

बहुउपयोगी स्टेम सेल्स
स्टेम सेल्स किंवा मूळ पेशी यांच्यावरील संशोधन सध्या मोठ्या प्रमाणवर सुरू आहे. बाळाच्या जन्माच्या वेळी नाळेतील मूळ पेशी साठवून ठेवल्या व पुढे मोठ्या आजाराच्यावेळी त्यांचा उपयोग केला तर अनेक दुर्धर आजार कायमचे बरे होतील, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या मूळ पेशींवरील संशोधन व उपचार पूर्णत्वास गेल्यास क्‍लिष्ट हृदयशस्त्रक्रियांनाच फाटा मिळेल. मूत्रपिंडाचे विकार टाळता येतील, मधुमेहही समूळ नष्ट होऊ शकेल. मेंदूचे आजारही बरे व्हायला लागतील, यकृत, हाडांची दुखणी यावरही मूळ पेशींचा उतारा मिळेल. मूळ पेशींच्या उपचारामुळे अपंगत्वही कमी होऊ शकेल.

प्रगत टेस्ट ट्यूब बेबी
विज्ञानतंत्रज्ञानाची प्रगती लक्षात घेता टेस्ट ट्यूब बेबीचे तंत्रज्ञानही कित्येक पटींनी विकसित होईल. स्त्री बीज व शुक्राणूंमध्ये हवा तो बदल करून आपल्याला हवे तसे म्हणजे ऑर्डर दिल्याप्रमाणे बाळ तयार करता येऊ शकेल. कदाचित गर्भाची पूर्ण वाढही प्रयोगशाळेत करण्याचे तंत्र विकसित होईल.

मेंदू जोडला जाईल संगणकाशी
अजून 50-100 वर्षांनी इंटरनेटद्वारे मेंदूशी संवाद साधणे कदाचित शक्‍य बनेल. विज्ञानकथामध्ये उल्लेखलेला सायबोर्ग प्रत्यक्षात येईल. या दिशेने प्रयोग सुरू आहेत. इंटरनेट क्रांतीत महत्त्वाची भूमिका बजावणारे व्हिटन सर्फ हे या दृष्टीने प्रयोग करत आहेत. अर्धांगवायू झालेल्या रुग्णांच्या मेंदूमध्ये चीप बसविण्याचा प्रयोग यावर्षी मे महिन्यात यशस्वी झाला आहे.

ऊर्जेसाठी बायोफ्युएल सेल
फ्रान्सच्या ग्रेनोबल शहरातील जोसेफ फोरियर विद्यापीठाचे डॉ. सर्ज कॉजनियर यांनी एका उपकरणाच्या माध्यमातून जैवंइधनाद्वारे वीजनिर्मिती करून दाखवली आहे. शरीरातील ऑक्‍सिजन आणि ग्लुकोजपासून वीजनिर्मिती करणारे बायोफ्युएल सेल असे त्याचे नाव आहे. या खास सेलचे एका उंदराच्या शरीरात रोपण करून वीजनिर्मिती करून दाखविण्यात आली. अशाच प्रकारचा प्रयोग अमेरिकेत झाला. अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीतील संशोधकांनी सिलिकॉन आणि उंदराच्या हृदयातील पेशींच्या साह्याने कृत्रिम जेलिफिश तयार करण्यात यश मिळविले आहे. हा जेलिफिश स्वतःला लागणारी ऊर्जा स्वतःच तयार करतो. प्रत्यारोपणासाठी बॅटरीचा वापर करण्यात येतो; परंतु ही बॅटरीसुद्धा वेळोवेळी बदलावी लागते. उदाहरणार्थ - सुमारे पाच वर्षांनंतर पेसमेकर बदलावे लागतात. कारण, त्यांची बॅटरी संपलेली असते. जैवइंधनामुळे ही समस्या सुटणार आहे.

ऑर्डर द्या; अवयव प्रिंट करा
आपल्या शरीरातील सर्व अवयव तयार करण्यासाठी प्रिंटरही विकसित होत आहे. या प्रिंटरमध्ये शाईच्या ऐवजी पेशी घालायच्या व काही दिवसांत मानवी शरीरासारखा त्रिमिती असलेला नवा अवयव तयार होऊ शकतो, हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात येते आहे. अर्थात, ही पहिली पायरी आहे.

देहदानाची तत्त्वे
  • रुग्णाचे प्राण वाचविणे सर्वांत पहिले कर्तव्य
  • देहदानाची तत्त्वे बहुतांश वेळा पाळली जातात
  • सर्व धर्मांचा देहदानाला पाठिंबा
  • देहदानासाठी कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही
  • देहदानासाठी वयाची मर्यादा नाही
  • देहदानानंतर अंत्यसंस्काराला परवानगी नाही
1 देहदान काय करू शकते
9 जिवांचे प्राण वाचवू शकते
2 जिवांना दृष्टी
50 जणांना उती दानाचा लाभ

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive