Tuesday, October 2, 2012

दादर स्वामी समर्थ मठाची स्थापना Dadar Swami Samarth Math

दादर स्वामी समर्थ मठाची स्थापना परमपूज्य श्री बाळकृष्ण महाराज यांनी केली. यांची कथा फार रंजक आहे. जिज्ञासू लोकांनी जरूर वाचावी.

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ अलिकडे दादर मठ नावाने ओळखला जातो श्री सद्ग़ुरु बाळ्कॄष्ण महाराज सुरतकर यांनी २९ मे १९१० साली स्थापन केला

श्री बाळ्कॄष्ण महाराज यांचा जन्म सुरत येथे २८ ऑक्टोबर १८६६ साली झाला लहानपणी घरच्या पत्र्यावर ते कित्येक तास उन्हाने पाठ भाजे पर्यंत श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा जप करीत बसत. पुढे ते आपले चुलते शिवशंकर यांचे कडे मुंबईला शिक्षणासाठी आले. त्यांचे चुलते त्यवेळी जांभुळ्वाडीत काळबादेवी रोडवर रहात असत.

मुंबईस आल्यावर त्यांच्यावर आर्यसमाजाच्या शिकवणीचा पगडा बसला. त्यांचे चुलते शिवशंकर कट्टर शिवभक्त त्यांना या गोष्टीचे दुःख झाले त्यांचे शेजारी श्री रामचंन्द्र व्यंकटेश बरडकर उर्फ़ सारस्वत ब्रांम्हण भेंडे, हे महाराजांचे गुरु "तात महाराज" श्री स्वामी समर्थांचे निःसीम भक्त रहात असत. त्यांना महाराजांच्यात सुधारणा करण्यास त्यांनी विनंती केली. त्यांनी श्री सदगुरु बाळ्कॄष्ण महाराजांना भुलेष्वरच्या अष्टभुजादेवीच्या देवळात देवीचे हास्यमुखाचे दर्शन देऊन त्यांच्या वूत्तीमध्ये आमुलाग्र फ़रक केला गेला व त्याचक्षणी माहाराजांनी श्री तातमाहाराजांना गुरु करुन ते श्री स्वामी समर्थांचे निःसीम भक्त बनले. महाराजांना इंग्रजी व संस्क्रूतचे उत्तम ज्ञान होते. ते शिकवण्या करत व गोकुळदास संस्क्रूत पाठशाळेत संस्क्रूतचे मस्तर होते. त्यावेळी ते मस्तर या नावाने ओळखले जात जांभुळ्वाडीत महाराजांचे शेजारीच धोत्रे नावाचे कुटुंब रहात असे. त्या कुटुंबातील पिशाच्चबाधा महाराजांनी दुर केली व तेंव्हापासुन हे साधेमास्त्तरनसुन एक दिव्य महात्मे आहेत याची ओळख लोकांना झाली.

जांभुळ्वाडीतुन महाराज पुढे मालाडात त्यांचे मित्र द्वारकादास, एक शेअर ब्रोकर होते, त्यांचेकडे रहावयास गेले. तत्पुर्वी सुरत कॉग्रेसचे वेळी त्यांनी स्वयंसेवकाचे काम केले आहे व ते स्वदेशीचे पालन करीत असत. महाराजांच्या दैवी सामर्थ्याचा प्रसार झाल्यामुळे पुष्कळ लोक त्यांचेकडे येऊ लागले. महाराजांना भजन फार आवडत असे व त्यांचेकडे येणा-यांना कटाक्षाने भजन करण्यास गुरुवारी व शनिवारी बोलावीत असत शनिवारी सबंध रात्र भजन होत असल्यामुळे द्वारकादासांच्या मंडळीस त्रास वाटू लागला.

ही गोष्ट कै. विश्वनाथ मोरेश्वर कोठारे (माजी विश्वस्त) व त्यांच्यां मातोश्री पुतळाबाई (मालाडला मामलेदार वाडीतील आपल्या बंगल्यात रहात असत)यांना कळली व त्यांनी महाराजांना आपल्या बैलगाडीतून स्वतःच्या घरी आणले. तेथेही पूर्विप्रमणेच गर्दी सुरु झाली. महाराजांकडे त्यावेळी कुलाब्यापासुन वसई, घाटकोपर, चेंबुर येथवरची मंडळी दर्शनास व भजनास येत असत इतक्या लांबुन शनिवारी रात्री मालाडला भजनास येणे भक्तांना गैरसोयीचे असल्यामुळे महाराजांनी कोठेतरी मध्यवर्ती ठिकणी रहाणे सर्वांना सोईस्कर होईल असा विचार भक्तजनांत उत्पन्न झाला कै. भाऊसाहेब देशमुख त्यावेळी मुंबई कलेक्टरचे हेडक्लार्क असल्यामुळे दादरची पुढे होणारी वाढ त्यांना माहीत होती व त्यांनी दादर ही जागा महाराजांना वास्तव्यास सोईस्कर होईल असे सुचवीले.
महाराजांना ही गोष्ट पसंत पडल्यावर त्यांनी कै. भाऊसाहेब देशमुख, कै. विश्वनाथ कोठारे, कै. भिकोबा खेडेकर व दादर येथेच रहाणा-या श्रीमती यमुताई म्हात्रे यांस दादरला बंगला पहाण्याची आज्ञा दिली. या मंडळींना हंसाळी तलावाच्या पुढे एक रिकामा बंगला सापडला. सध्या ह्या तलावाच्या ठिकाणी प्लाझा सीनेमा व टिळक पुल आहे. बंगल्यात चौकशी करता बंगल्याला कुलुप. बंगल्याच्या माळ्याला विचारता त्याने तो बंगला भुताटकीचा व तीन खुनी बंगला म्हणुन ओळ्खला जाणारा आहे, असे सांगितले. त्यात कुणीही भाडोत्री टिकत नाही. कोणीही रहावयास आल्यास त्याचेवर आपत्ती येते. कोणी मनुष्य दगावतो.

मागच्याच आठ्वड्यात असलेल्या ख्रिश्चन भाडेकरुची मुलगी दगावली असुन आपण तेथे महीन्यास नारळ व कोंबडे देऊन राहातो, तरी तो बंगला भाड्याने घेण्याच्या फ़ंदात कुणी पडु नये, असे माळ्याने सुचवले. वरील मंडळींनी ही गोष्ट महाराजांस कळविली. महाराज म्हणाले,"काही हरकत नाही आपण तेथे समर्थांची स्थापना करुन सर्व भुतांना मुक्त्ती देऊ. आपण परत जावे व कुलुप उघडून आत अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध येईल, तो असा आल्यास भाडे देऊन ताबडतोब बंगला ताब्यात घ्यावा." वरील मंडळींना कुलुप उघडल्यावर अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध आला व त्यांनी महाराजांचे सांगण्यावरुन बंगला भाड्याने घेतला. हा बंगला हाजी बच्चू वर्रेया या मुसलमान गृहस्थाचा होता. आवार जवळ जवळ एक एकराचे होते. आवारात व आजूबाजूस माडांच्या वाड्याच होत्या. प्रत्येक वाडीत एखादा बंगला असे.

त्यावेळी बंगल्यात येण्याचा मार्ग लेडी जमशेटजी रोडवरुन होता. या बंगल्याच्याशेजारी सध्या ब्रांम्हण सहाय्यक संघाची इमारत आहे. तिच्या पुढे मालकाच्या मुलाचा बंगला होता व तेथे तो रहात असे. वर भाड्याने घेतलेला बंगलाच आपल्या आजच्या मठाचे स्थान आहे. सन १९१० मध्ये मठ स्थापन झाला त्यावेळी भुताटकीचा म्हणुन प्रसिध्द असल्यामुळे पुष्कळ वेळा तो रिकामाच असे व त्यामुळे डागडुजी न झाल्यामुळे डबघाईसच आला होता. त्यवेळी मठात येण्याचा मार्ग लेडी जमशेटजी, हल्लीच्या न. ची. केळ्कर रोडवरुन होता. मठात शिरण्याचा दरवाजा सदध्या डी. एल. वैद्य रोडवरुन जो आहे. त्याच बाजूने होता व समर्थांचा फोटोही दरवाज्यासमोरच स्थापन केलेला होता.

मागे उघडा ओटा होता. त्यात सायंकाळी महाराज पोथी सांगत असत. श्रोत्यांमध्ये दादरचे कै. अमृतराव पाटणकर हे वृध्द पेंन्शनर लाल रुमाल बांधुन बसलेले दिसत. बंगलाडबघाईला आलेला असल्यामुळे सन १९११ च्या नोव्हेंबर सुमारास मालकाने दुरुस्तीस काढला. त्यामुळे दुस-या जागेत मठ हलवणे भाग पडले. नवीन जागा माटुंग्याला गोपी तलावाजवळ दाभोळकरांची वाडी होती त्यात मिळाली. ती दोन मजली होती खालच्या मजल्यावर जागा होती. तेथे महाराजांचे सेवेत कै. भिकोबा खेडेकर हे लंगडे गृहस्थ - महाराज त्यांना कानफाट्या म्हणत असत. कारण त्यांची वृत्ती समर्थांच्या कानफाट्या म्हणून ओळ्खल्या जाणा-या सेवेक-यांसारखी होती व एका कानानी ऎकु येत असे - हे श्री. मोरेश्वर, श्रीमती यमुताई, श्रीमती हिरुताई भगवंतराव परळ्कर ही मंडळी होती. वरील भिकोबा पुढे काशीस जाऊन विश्वेश्वरानंदजीयानावाने संन्यासी झाले. या जागेतही रिवाजाप्रमाणे आरती व भजन चालत असे. पहिल्या बंगल्याचे म्हणजे सध्याच्या मठाचे दुरुस्तीचे काम ऑगस्ट १९१३ मध्ये पुरे झाले व ३० ऑगस्ट रोजी मठ परत पहिल्या जागी आला. मधोमध मोठा हॉल. हॉल मधोमध कमान.

दोन्ही बजुस दोन मोठ्या ख़ोल्या व पुढ्च्य बाजुस म्हणजे रस्त्यावरुन आत शिरण्याच्या बाजुला मोठा ओटा. दोन्ही बजुस बसावयास दगडी ओटे व पुढे चढण्यास पाय-या येण्याच्या मार्गावर दुतर्फा फुलांच्या कुंड्या, तसेच गॅस बत्त्या पण लागल्या. मठात परत आल्यावर महाराजांनी सध्याचे सिंहासन सुरतहुन कारागिर आणून तयार करविले व सिंहासनाच्या बैठकीत स्वामी समर्थांचे अवशेष घालुन त्यावर संगमरवरी लादी बसवुन समर्थांच्या फोटोची स्थापना केली. महाराज पक्के सिंहासन करतात हे पाहुन यमूताईंनी विचारले "महाराज, हा भाड्याचा मुसलमानाचा बंगला, हे स्थान कायम कसे होणार ?" तेंव्हा महाराजांनी, "जो बसणार तोच कायम करणार" असे म्हणून 'कायम कायम कायम' असा त्रिवार उच्चार केला.

हे स्थान कायम ठेवण्याचा समर्थांच्या अघटीत लीलांचे वर्णन पुढे येईलच. बंगल्यात मठ आल्यावर दर्शनास व भजनास येणा-या भक्त्तांची गर्दी फारच होऊ लागली. गॅसबत्त्यांमुळे प्रकाशाचा झगझगाट होऊन रात्री रंम्य व शोभिवंत दिसू लागले. रिवाजानुसार लांबून येणा-या भक्तांसाठी गुरुवार-शनिवार आरती रात्री १० ला सुरु होऊन ११-३० ला संपे. त्यानंतर महाराज, हल्ली महाराजांचे छायाचित्र आहे तेथे आरामखुर्चीत बसत. अर्धा एक तास भक्तजनांचे महाराजांना हार घालणे चाले. हार इतके येत की, तीन-तीन वेळा काढून ठेवावे लागत. त्यानंतर महाराज गुजराथी असुनसु्द्धा मराठीत एकनाथी भागवतावर रात्री दोन वाजेपर्यत प्रवचन करीत. त्यावेळी त्यांचा कंठ दाटून येई. त्यांची शिकवण भक्तिमार्गाची असे.

'
एकात अनेक पहावे व अनेकांत एक पहावा,’परि प्रीतीजे अंतरी आत्मभावे । तया प्रीतीला भक्त्ति असे म्हणावे’, ’दाताने जीभ चावली म्हणुन कोणी बत्तीशी तोडली’,असा उपदेश महाराज करीत. श्री स्वामी समर्थांना शरण जाऊन व त्यांची उपासना करुन ज्याने त्याने आपला हेतू साधावा, आपणाकडे काही नाही, असे सांगत असत. महाराजांचे प्रवचन चालू असता श्रोते मंत्रमूग्ध होत असत. मठाचा मुख्य वार शनिवार त्यादिवशी कोणीही येथील कींवा सुरतेचा मठ सोडून जावयाचे नाही. असा महाराजांचा दंडक आहे. तसे गाभा-यात कोणीही टोपी, पगडी किंवा रुमाल घालून जावयाचे नाही. ती काढूनच गाभा-यात जाऊन प्रदक्षिणा कराव्यात, असा त्यांचा आदेश आहे. समर्थंना तांबडी फुले, कण्हेर, जास्वंद, तगर घलू नयेत, असा त्यांचा दंडक असे व घातल्यास ताबडतोब कटाक्षाने सांगून काढून टाकत. तांबडा गुलाब चालत असे.

त्यावेळी रस्त्यावर गॅसचे दिवे असत. लेडी जमशेटजी रोडवर दोन्ही बाजूस माडांच्या वाड्या होत्या व एखादा बंगला. रहदारी फारच कमी त्यामूळे रात्री १० वाजता मठात येताना रस्ता भयानक वाटे, तरी शेकडो लोक महाराजांचे प्रवचनास येत. त्यावेळी भजनास शनिवारी वसईहून डॉ शांताराम व हिरालाल, बोरीवलीहून भगवंत परळकर,मालाडहून केरोबा व गोविंद दाते, सांताक्रुझहून मोरेश्वर देसाई, वांद्रयाहून दाभोळ्कर वकील, घाटकोपरहून बडोद्याच्या राजांचे एक मानकरी मानाशिर्के, मुंबईहून समर्थ वकील कुटुंबासह येत.

हे पुढे इंडीयन कौन्सिलचे सदस्य झाले. त्यांनी दोन अतिशय प्रेमळ पदे श्री विश्वदयाघन श्री दत्त स्वतरचिली आहेत व ती आपल्या धाकट्या मुलीकडुन महाराजांना म्हणुन दाखवत. मुंबईहून पिळगावकर वकील शामराम नेरॉय पोस्ट-मास्टर, मोरेश्वर कोठारे, गुजराथी सुवर्णकार सोनी (हे भजनास देहभान विसरत असत. महाराजांना त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून शुद्धीवर आणावे लागत असे.) काशिनाथ गोरे, ताम्हनकर, भगवंतराव आचार्य, महालक्ष्मीहून धोत्रे कुटुंब, ग्रॅटरोडहून क्रुष्णराव मुल्लरपट्टम, सुर्यप्रकश सशीतल कारवारकर मंडळी, रेळे, वि. मो. कोठारे, भाऊसाहेब देशमुख व त्यांचे शाळेत जाणारे चिरंजीव (माजी विश्वस्त देशमुख), परळहून रावते व त्यांच्या मातोश्री, दादरहून पुरंदरे बंधू. गोविंदराव जोशी, हरिश्चंद्र किर्तने,अमृतराम पाटणकरांचे चिरंजीव केशवराव व द्वारकानाथ, आनंदराव वेदक, नायगावहून बाबासाहेब जयकर, माहीमकर मंडळी, अण्णा कोटकर, तुकारम बोले, हटयोगी वगैरे येत. कोठारे, देसाई वगैरे मंडळी आरती आटोपल्यावर किंवा पूर्वी भजन करित असत.

माहीमकर मंडळी दुसरीकडून भजन आटपून येत. रात्री दोन वाजेपर्यंत व उजाडेपर्यंत भजन करत. महाराजांनी भजनास कधी पुरे म्हटले नाही. मंडळी दमल्यास त्यांनी जावे.

महाराजांना पूजा-पाठास आठ तास लागत. त्यामूळे दर्शनास गर्दी लोटल्यास किंवा भजन लांबल्यास काही वेळा महाराजांना तीन-तीन दिवस उपास घडत; कारण सेवा आटोपल्याशिवाय ते पाण्याचा थेंबसुद्धा घेत नसत. पूजा आटोपल्यावर महाराज दूध घेत किंवा फराळाचे खात. त्यांनी अन्न सोडले होते. फराळात शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ, व-याचे तांदूळ, शेंगदाणे, बदाम, फळे घेत असत. महाराजांस आंबा फार आवडे. ते स्वत: चहा पीत नसत, पण भक्तांस मठाचा प्रसाद म्हणून देशी साखरेचा चहा देत असत. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे या मठात स्प्रुश्य-अस्प्रुश्य, हिंन्दू-अहिंन्दू असा भेद नव्हता व आजही नाही. ज्याला त्याला आपापल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करावयास सांगत पार्शांना कस्ती, ख्रिश्चनांना प्रेअर, मुसलमानांना नमाज.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive