अबाबा!
१२,००० कोटींची माया!
मथुरा, दि. २६ (वृत्तसंस्था) - १२,००० कोटींची संपत्ती... त्यात अब्जावधी रुपयांचा बॅकबॅलन्स आणि लिमोझीन, मार्सिडीज बेंझसारख्या १५० कोटींच्या महागड्या गाड्या... ही माया कोण्या उद्योगपतीची नाही तर बाबा जय गुरुदेव यांची आहे. नुकतेच निधन झालेल्या या बाबांकडील 'कुबेरा'च्या खजिन्याने सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत.
'बाबा आणि संपत्ती' हे समीकरणच बनले असून जय गुरुदेव हे आणखी एक बाबा संपत्तीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहेत. १८ मे रोजी त्यांचे निधन झाले पण त्यानंतर त्यांच्या संपत्तीची जी मोजदाद झाली ती तोंडात बोटे घालायला लावणारीच होती. जवळपास १२ हजार करोडच्यावर हा आकडा गेला असून संपत्तीचा उत्तराधिकारी कोण यावरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बाबांच्या ट्रस्टची अर्धा डझनच्यावर बँकांमध्ये खाती आहेत. त्यातील स्टेट बँकेच्या एका शाखेतच एक अब्ज रुपये जमा आहेत. त्याशिवाय काही अब्ज रुपये फिक्समध्येसुद्धा ठेवलेले आहेत.
- आश्रमाला दरमहिन्याला किमान दहा ते बारा लाख रुपये दानातून मिळतात. त्यात पौर्णिमा, गुरुपौर्णिमा आणि होळीला मोठ्या प्रमाणात देणगी येते त्याचा समावेश नाही.
१५० कोटींच्या गाड्या
जगातील सर्वात महागड्या गाड्या बाबांच्या आश्रमात आहेत. त्यातील एक लिमोझीन गाडीच ५ कोटी किमतीची आहे. त्याशिवाय प्लेमाऊथ, ओल्डस्कोडा, मर्सिडीज बेंझ आणि बीएमडब्ल्यूसह अन्य अशा सुमारे १५० कोटी रुपये किमतीच्या गाड्या येथे आहेत.

No comments:
Post a Comment