वास्तुशास्त्र म्हणजे तंत्र-मंत्र नाही, थोतांड नाही किंवा अंधश्रद्धाही नाही. वास्तुशास्त्रामध्ये पंचमहातत्त्वे व दिशा यांचा विचार केला जातो. सूर्याच्या वैश्विक किरणांचा जास्तीत जास्त फायदा व उपयोग करून घ्यावा या एवढ्याच हेतूने आपल्या ऋषीमुनींनी हे वास्तुशास्त्र अस्तित्त्वात आणले आणि त्यासाठी त्यांनी अविरत संशोधनही केले.
भृगुरत्रिवसिष्ठश्र्च विश्वकर्मा मयस्तथा।
नारदो नग्नश्र्चैव विशालक्ष: पुरंदर:।।
ब्रह्मा कुमारो नंदिश: शौनको गर्ग एव च।
वासुदेवो निरुद्धश्च तथा शुक्रबृहस्पतिश्च।।
अष्टादशेते विख्यात वास्तुशास्त्रोपदेशका:।।
र्थात, भृगु, अजि, वसिष्ट, विश्वकर्मा, मय, नारद, नग्नजित (गंधार निवासी एक राजकुमार तसेच भगवान श्रीकृष्णाचे एक श्वशूर) विशालाक्ष, पुरंदर, ब्रह्माा, कुमार, नंदीश (कृष्णाचा मुख्य गण व वास्तुशास्त्राच्या प्रमुख आचार्यांपैकी एक), शौनक, गर्ग, वासुदेव, अनिरुद्ध, शुक्र, बृहस्पती हे वास्तुशास्त्रातील प्रमुख अठरा आचार्य आहेत. वास्तुशास्त्राची निमिर्ती या महान ऋषींनी केली व पदोपदी आजच्या या विज्ञानयुगातदेखील याची प्रचिती मिळत आहे. वास्तुशास्त्र म्हणजे तंत्र-मंत्र नाही, थोतांड नाही किंवा अंधश्रद्धाही नाही. वास्तुशास्त्रामध्ये पंचमहातत्त्वे व दिशा यांचा विचार केला जातो. सूर्याच्या वैश्विक किरणांचा जास्तीत जास्त फायदा व उपयोग करून घ्यावा या एवढ्याच हेतूने आपल्या ऋषीमुनींनी हे वास्तुशास्त्र अस्तित्त्वात आणले आणि त्यासाठी त्यांनी अविरत संशोधनही केले.
साधारणत: १० वर्षांपूवीर् कोकणात एक वास्तुपरीक्षण केले होते. कांेकण हे माझे गाव आहे. त्यामुळे वर्षातून पाच ते सहा वेळा कोकणात जाण्याचे प्रसंग येतात. कोणकोण (कोण म्हणजे डांेगरमाथा) या शब्दांवरून कोकण या हा शब्द रुढ झाला असावा. इ. स. पूर्व चौथ्या शतकापासून कांेकण हे नाव नावारुपाला आले. विशाल समुदकिनारा व अप्रतिम निसर्गसौंदर्यांची खाण लाभलेल्या या जंगलमय भूभागावर सर्वात अगोदर साधनेच्या निमित्ताने ऋषीमुनींनी आगमन केले. त्यांच्या उच्च आध्यात्मिक बैठकीमुळे अदृश्य शक्तींना अंकित करून त्यांच्याशी समन्वय साधून आपल्या शिष्यगणांकडून राहण्यायोग्य व शेतीयोग्य भूमीरचना केली. त्याकाळी कामाची वाटणी ही प्रत्येकाची उपजत गुणवत्ता पाहून केली जात असे. प्रत्येक गोष्ट ही नैसगिर्कतेचा तोल न बिघडवता केली जात असे. ज्यांनी ही गावे वसवली त्याला लोक गौडा म्हणजे प्रमुख असे म्हणत. कालांतराने या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचे नामांतर 'गावडे' असे झाले. 'ज्याने गाव वसवला तो गावडे' ही म्हण प्रचलित झाली. संपूर्ण कोकणात पाषाणाच्या मूतीर्ला खूप महत्त्व आहे व कोणतेही महत्त्वाचे काम करायच्या अगोदर मंदिरातील विशिष्ट दगडाला किंवा मूतीर्ला जव किंवा चाफ्याची कळी लावून कौल घेण्याची प्रथा आहे. त्यानंतरच कामासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेतला जातो. या कौल लावणाऱ्या व्यक्तीला कोकणात फार विशेष महत्त्व आहे. त्यांस 'गुरव' या नावाने संबोधले जाते. तळ कोकणात प्रसिद्ध असे शंकराचे मंदिर आहे. त्या मंदिरातील पिंडी स्वयंभू असून त्या देवस्थानामध्ये बऱ्याच लोकांच्या समस्या गाऱ्हाणे मांडून कौल घेऊन सोडविल्या जातात. त्यातल्या प्रमुख गुरवाच्या वास्तूचे वास्तूपरीक्षण करण्यासाठी मी दहा वर्षांपूवीर् कोकणात गेलो होतो.
या व्यक्तीची आथिर्क परिस्थिती तशी बेताचीच होती. शेतीच्या उत्पन्नातून व भक्तांनी दिलेल्या दक्षिणेतून त्याच्या संसाराचे रहाटगाडे चालत असे. या गुंड्यांमध्ये त्यांनी घर बांधले होते. पूर्व दिशा उंच तर घराचे प्रवेशद्वार दक्षिणेकडे यम या स्थानात होते. दक्षिणेकडे बरेच मोठे अंगण होते. ईशान्येकडील ईश या भागात शौचकूप बसविले होते. उत्तरेकडेच चूल होती व भातशेतीचा आणलेला सर्व माल आग्नेय दिशेला साठवून ठेवलेला होता. उत्तर दिशेला दुसऱ्या एकाचे पाठीमागे घर होते. या वास्तूची उत्तर दिशा बंद झाली होती. दक्षिणेला उतार अशी वास्तूची रचना होती. या वास्तूतला सर्वात महादोष म्हणजे नैऋत्य दिशेस विहीर होती.
आता प्राचीन ग्रंथात दिलेल्या वास्तूच्या सूत्रानुसार या वास्तूतील मिळणाऱ्या परिणामांची फळे अभ्यासू.
् दक्षिण प्लवना पृथ्वी नराणाम् मृतिदा भवेत ।। (वास्तुविद्या ग्रंथ)
' दक्षिणेचा उतार मृत्यूकारक फळ देईल' असे वणिर्ले आहे.
् दक्षिण प्लवना पृथ्वी नराणां मृतिदा भवेत।
याम्यां यति यमद्वारं नैऋत्ये च महाभयम्।।
या सूत्रानुसार अशा घरात राहणाऱ्या गृहस्वामीस मृत्यूतूल्य पीडा त्याच्या संपूर्ण आयुष्यात भोगावी लागते. या वास्तूची उत्तर दिशा बंद असून दक्षिण दिशा प्रवाहांनी भारलेली आहे. अशावेळेत या घराचा मालक दारिद्य, दैन्य, कर्जाने ग्रासलेला आढळतो. जेवढा दोष मोठा तेवढा त्या प्रमाणात दु:खाची तीव्रता जास्त.
या घराच्या नैऋत्य दिशेस विहीर आहे. वरील वास्तू १९९५ मध्ये बांधली व विहीर १९९८ मध्ये बांधली. विहीर बांधताना घरमालकाने बँकेचे
१ लाख रु. कर्ज घेतले होते. पण कर्जाचे हप्ते बऱ्याच प्रमाणात बुडविल्याने बँकेने त्यांच्यावर कोर्टकेस दाखल केली होती. नैऋत्य प्रभागात
जर विहीर असेल किंवा अंडरग्राऊंड वॉटरटँक असेल तर 'नैऋत्यां व्याधिपिडा' असे फळ सांगितलेले आहे.
मी या वास्तूला इ. स. २००० मध्ये भेट दिलेली होती. वास्तूमध्ये प्रवेश करतानाच मालकाची झालेल्या दैना परिस्थितीचा मला अंदाज आला होता. ती व्यक्ती पाषाणाजवळ लोकांची समस्या सोडविते त्याच व्यक्तीचा उद्याचा दिवस कसा जाईल या चिंतेने ते ग्रासलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव त्यांच्या वेदना ते लपवू शकत नव्हते. मला भेटल्यावर त्यांचा पहिलाच प्रश्न होता, सर आम्ही या त्रासातून कधी बाहेर पडू? वरील उल्लेखलेल्या सर्व सूत्रांची प्रचिती त्या घरात मला क्षणोक्षणी येत होती. मी स्वत: पुढे त्या घरावर येणाऱ्या वाईट परिणामांच्या कल्पनेनेच घामाने डबडबलेलो होतो. मला काहीच सूचत नव्हते की, त्या देवळाच्या गुरवाला काय उत्तर देऊ? घरावर कर्ज, विहिरीवर कर्ज, जेवणाची मारामार अशी स्थितीमध्ये वस्तूमध्ये करावयाचे बदल या साठी होणारा खर्च याची जुळवाजुळव ते करूच शकत नव्हते व मी तसे त्यांना सांगणे हेसुद्धा माझ्या तत्त्वात बसणारे नव्हते.
भोळाभाबडा कोकणी माणूस. तरीही जगण्याची धडपड. ते गुरव मला सांगत होते, सर काहीतरी जादू करा व आम्हाला यातून बाहेर काढा. पण मी काय जादू करणार? पण त्या थोर ऋषीमुनींचे स्मरण केले व माझ्या गुरुंना प्रार्थना केली व त्यांना मी प्रॅक्टिकल उपाय सांगितला. बरं उपाय जो सांगावयाचा होता तो बिनाखचिर्कच असला पाहिजे तरच ते करू शकणार होते. घरमालकांना मी सांगितले की, विहिरीच्या येथे जेवढा पाषाण आणून ठेवता येईल तेवढा ठेवा. कारण विहित बुजविणे प्रॅक्टिकली शक्य नव्हते व ते नुकसानकारक ठरले असते. ईशान्य दिशेस शौचालय होते ते देखील तोडणे त्यांना शक्य नव्हते. म्हणून घराच्या ईशान्य दिशेच्या आतल्या बाजूस कोपऱ्याला एक अर्धचंदाकृती खड्डा करून तेथे रोज पाणी भरण्यास सांगितले. पूर्व दिशा उंच होती. त्यासाठीदेखील एक उत्तम उपाय सुचविला. एवढी वाईट आथिर्क परिस्थिती असतानादेखील ते गुरव मला वास्तुदक्षिणा म्हणून मला घरातील तांदळाची गोण देत होते. हाच कोकणी माणसाचा मोठेपणा!
साधारणत: १ वर्षांनी गुरवांच्या मुलाचा फोन आला. मी देखील ही घटना विसरून गेलो होतो. त्यांच्या मुलाने मला आठवण करून दिली. मलादेखील खूप उत्सुकता होती की, पुढे काय झाले असेल? मी त्याला विचारले की, एवढ्या उशिरा १ वर्षांनी आपण फोन का केला? तो समोरून सांगत होता की, त्याचे बाबा सहा महिन्यांपूवीर्च गेले. तोपर्यंत मी सांगितलेला कोणताही उपाय त्यांना केला नव्हता. मात्र ३ महिन्यांपूवीर् त्यांच्या मुलांनी या उपायांची पूर्तता केली. त्याचे चांगले फळ त्यास मिळाले. ते म्हणजे त्यास नोकरी लागली? मला तो सांगत होते की, हा उपाय तेव्हाच जर मी केला असता तर कदाचित बाबा वाचले असते. पण जीवन मरण हे तर ईश्वराच्या हातात आहे. तेथे आपले काहीच चालत नाही. पण नशीब त्यास तेवढी तरी उपाय करण्यासाठी बुद्धी सूचली. त्याने माझे मनापासून आभार मानले. पण मी मात्र त्या थोर अठरा ऋषीमुनींना मनापासून वंदन करीत होतो!
डॉ. तुषार यशवंत सावडावकर
No comments:
Post a Comment