Friday, June 8, 2012

Demand for Brahman semen - ब्राह्मणांच्या वीर्यला जास्त मागणी

विकी डोनर या नुकत्याच झळकलेल्या चित्रपटाने ' स्पर्म डोनेशन (sperm donation)' चा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला असून यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्पर्म डोनेशन तंत्राच्या आधारे आई-वडील बनू इच्छिणारी बरीचशी दाम्पत्ये ब्राह्मणांच्या वीर्याची मागणी करत आहेत(Demand for Brahman semen). यावरून जातीव्यवस्थेचा पगडा आजही भारतीयांच्या मनावर कायम असल्याचे दिसून येते.

तीन वर्षापूर्वी पाटणा येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सौरव कुमार यांनी यासंदर्भात एका मुलाखतीत ही माहिती समोर आणली होती. बिहारमध्ये मुल हवे असणारी जोडपी वीर्य घेण्याआधी ते देणा-या व्यक्तीची जात विचारतात, अशी माहिती त्यांनी या मुलाखतीत दिली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर बरेच वादविवाद झाले होते. पण आता अशाप्रकारची मागणी संपूर्ण देशातूनच होत आहे.

मुंबईत सर्वात जास्त ब्राम्हणांच्या वीर्याची मागणी असल्याचे प्रसुती मार्गदर्शन करणा-या संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले. ' विकी डोनर ' या चित्रपटाच्या रिसर्च टीम मध्ये पाटील यांचा समावेश होता. मुस्लमान लोकही वीर्य देणारा सुन्नी पंथीय आहे की शिया पंथीय याची हमखास चौकशी करतात. मात्र इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नियमांनूसार आम्ही वीर्य देणा-यांचा धर्म सांगू शकतो जातीची माहिती देणे नियम बाह्य आहे, असे पाटील यांनी सांगीतले.

वीर्य देणा-या व्यक्तीची भाषा, शैक्षणिक पात्रता आणि व्यवसायाविषयी सुद्धा काही जोडपी प्रश्न विचारतात ही एक समाधानाकारक बाब आहे, असे पाटील सांगतात. तसेच वीर्य देणा-याची उंची, त्वचेचा रंग, केसाचा रंग आणि डोळ्यांचा रंग या विषयी ही भारतीय दाम्पत्ये उत्सुकतेने चौकशी करतात, असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive