Thursday, June 28, 2012

Laptop at low cost in India लॅपटॉप ४,९९९ रु. मध्ये....


लॅपटॉप ४,९९९ रु. मध्ये...




मुंबई - ब्रिटनमधील एसीआय कंपनीने भारतासाठी अत्याधुनिक लॅपटॉप तयार केला असून, हाय रिझोल्युशनचा हा लॅपटॉप भारतात फक्त ४,९९९ रु. मध्ये उपलब्ध होणार आहे. अलाईड कॉम्प्युटर्स इंटरनॅशनल (एशिया) लि. ही कंपनी मुंबई शेअर बाजारातील लिस्टेड कंपनी आहे.
- सर्व सुविधांनी युक्त अत्याधुनिक लॅपटॉप अगदी कमी किमतीत भारतीय बाजारपेठेत आणला असून, हा सुपर लो कॉस्ट लॅपटॉप लोकांच्या विशेषत: तरुणांच्या पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा एसीआयचे व्यवस्थापकीय संचालक हिरजी पटेल यांनी सांगितले.
- पहिल्या वर्षी भारतात २ लाख लॅपटॉप विकण्याचा कंपनीचा
मानस असल्याचे पटेल म्हणाले. कंपनी चीनमधून सुटे भाग
आयात करणार असून, अत्यंत कमी नफा घेऊन भारतात हे लॅपटॉप विकणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. किंमत कमी असली तरीही दर्जाबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
- भारत व ब्रिटनमधील लॅपटॉपचा दर्जा सारखाच असणार आहे(In India, laptop quality will be same at UK), असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. तामिळनाडू, उत्तर प्रदेशसारखी राज्ये विद्यार्थ्यांना कमी किमतीत लॅपटॉप देण्याची घोषणा करीत असताना या लॅपटॉपला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive