Wednesday, June 13, 2012

Impotency in man पुरूषांमधील वंध्यत्व

Impotency in man


अंतःस्त्राव ग्रंथीमधील सदोषता:
पुरूषांचे एक व्रुषण वृषणकोषात खाली उतरता असेल तर त्यात पुरेसे शुक्राणु निर्माण होण्यात अडथळा उत्पन्न होतो. सदोष वीर्यनिर्मिती हो‍उ शकते. हा दोष जन्मत:ही असु शकतो. काहीवेळा अतिरीक्त व्यायाम किंवा शरीराची समतोल वाढ झाली नसेल किंवा दुखण्यामुळे, आजारमुळे हा दोष निर्माण हो‍उ शकतो.

शरीरातील शीर्षस्थ ग्रंथीचे नीट पोषण झालेले नसेल तर त्यामुळे पुर्न‍उत्पादनाच्या अंत:स्त्रावाच्या निर्मितीत अडथळा निर्माण हो‍उ शकतो, आणि यातुन पुर्न‍उत्पादनाच्या अंत:स्त्रावाच्या निर्मितीत अडथळा निर्माण हो‍उ शकतो. आणि यातुन पुरूषांमधे वंध्यत्व (impotency in man) निर्माण होते. तथापी असे अपवादात्मक घडते. एफएसएच आणि एल एच यांच्यातील क्षमतेचा यात समावेश होतो. यामधे शीर्षस्थ ग्रंथी सर्वप्रकारचे अंत:स्थस्त्राव निर्माण करण्यात अपयशी ठरतात.

इतर घटक
स्वयंचलित रोगप्रतिकारक पेशी काही वेळेला शरीरातील विशिष्ट पेशीवर त्या शरीरबाह्य आहेत असे समजुन हल्ला त्या शुक्रजंतूवर करतात. त्यातुन पुरूषांमधील वंध्यत्व निर्माण होते. पुष्कळवेळा या रोगप्रतिकारक पेशी पुरूषनसबंदीनंतर विकसित होतात. अर्धवंध्यत्व असलेल्या दहा टक्‍के पुरूषांच्याबाबतीत असे दिसुन आले आहे की त्यांच्या शुंक्रजंतुवर रोगप्रतिकारक पेशींनी हल्ला केला आहे, पण त्यांचे योग्य कारण समजत नाही.

नसबंदीशी संबंधित इतर घटक:
रक्तात(blood) ज्या प्राणवायुचां(oxygen) अभाव असलेल्या तांबड्या पेशी निर्माण होतात. त्यानेसुध्दा शुक्रजंतुना धोका पोहचतो. नसबंदीमुळे पुरूषांमधील सक्षमतेवर परिणाम होतो. उदा. वीर्यनलिकेच्या कार्यात नसबंदीनंतर बिघाड होतो. p34h या प्रोटीनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पुरूषाची पुनरूत्पादनक्षमता मंदावते.

वीर्याची माघार:
ज्या व्यक्तीला मधुमेह किंवा मणक्यांचे आजार असतील तर अशा व्यक्तीच्या बाबतीत वीर्य सोडताना शुक्रजंतु वेगाने पुढे न जाता मागे सरकत जातात. उच्चरक्तदाबावरील औषधे किंवा झोपेच्या गोळ्याचा हा एक तात्पुरता दुष्परिणामही असु शकतो.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive