Saturday, June 9, 2012

Generic Medicine - जेनरिक मेडिसीनचा पर्याय रुग्णांना कधी मिळणार....... औषधांचागोरखधंदा... जेनरिक मेडिसीन म्हणजे काय ? ???

जेनरिक मेडिसीन म्हणजे काय ? ???

औषधाचे मूळ (फार्माकॉलॉजी नेम) नाव म्हणजेच जेनरिक मेडिसीन होय. एकाच
आजारावर विविध कंपन्यांची वेगवेगळ्या किमतीची औषधी मेडिकल स्टोअरवर
उपलब्ध असतात.

डॉक्टरांनी जेनरिक मेडिसीन लिहून दिल्यास रुग्ण त्याच्या बजेटनुसार औषधी
खरेदी करू शकतो. अशा प्रकारचा जेनरिक मेडिसीनचा पर्याय राजस्थानमध्ये
तेथील सरकारने सुरू केला आहे.

घाटीत जेनरिक मेडिसीनचाच वापर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
फार्माकॉलॉजी विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. माधुरी कुलकर्णी याविषयी
म्हणाल्या की, एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आम्ही केवळ जेनरिक मेडिसीन
शिकवीत असतो. कोणत्या आजाराला कोणते आणि किती प्रमाणात औषध द्यावे हे
शिकविण्यात येते. कोणत्याही औषध कंपन्यांच्या औषधाची माहिती त्यांना
देण्यात येत नाही. घाटीतदेखील आम्ही रुग्णांना जेनरिक मेडिसीन देतो आणि
या मेडिसीनमुळे रुग्ण बरे होतात.

रुग्णांना उच्च दर्जाची औषधी देण्याचा उद्देश इंडियन मेडिकल असोसिएशनच्या
औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष डॉ. उदय फुटे याविषयी म्हणाले की, जेनरिक औषधी
लिहून दिल्यास रुग्ण गोंधळून जाईल. कोणत्या कंपनीचे औषध घ्यावे हे
त्यांना समजणार नाही. शिवाय नामांकित कंपन्यांची औषधे उच्च दर्जाची
असतात. त्याचा चांगला लाभ रुग्णास होतो. बाजारात अनेक कंपन्यांची औषधी
असतात; परंतु सर्वांचा दर्जा सारखा नसतो. त्यामुळे जेनरिकऐवजी ब्रॅण्डेड
कंपन्यांची औषधी डॉक्टर प्रिस्क्रिप्शन करतात. कंपन्या आणि डॉक्टर
यांच्यात अर्थपूर्ण संबंधाविषयी विचारले असता ते म्हणाले की, हे किती
प्रमाणात सत्य आहे आणि ही तर कंपन्यांच्या मार्केटिंग पॉलिसी असते.

बापू सोळुंके। दि. ३१ (औरंगाबाद) विशिष्ट कंपनीऐवजी जेनरिक मेडिसीनच जर
डॉक्टरांनी लिहून दिले तर रुग्णाला ते कमी किमतीत मिळू शकते. मात्र,
मिळणार्‍या लाभापोटी याऐवजी विशिष्ट कंपन्यांचीच औषधी रुग्णांना लिहून
देतात. त्यातून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची माहिती समोर आली
आहे; परंतु ही कट प्रॅक्टिस थेरपी बदलण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे
गरजेचे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना जेनरिक
मेडिसीनच्या वापराबाबत माहिती दिली जाते. जोपर्यंत ते एमबीबीएसचे शिक्षण
पूर्ण करीत नाहीत तोपर्यंत त्यांना औषध कंपन्यांच्या औषधांची नावेही
माहीत नसतात. ते प्रॅक्टिस सुरू करतातच विविध औषध कंपन्याचे प्रतिनिधी
डॉक्टरांना जाऊन भेटतात आणि आपल्याच कंपन्यांची औषधी किती प्रभावी आहेत,
हे पटवून देतात आणि एम.आर.च्या सांगण्यावरून डॉक्टर संबंधित कंपनीचेच
औषधे लिहून देतात.

तसे न करता अभ्यासक्रमात शिकविल्याप्रमाणे जर केवळ जेनरिक औषधी त्यांनी
लिहून दिल्यास रुग्णास कोणत्या कंपनीचे औषध खरेदी करायचे याचा पर्याय
उपलब्ध होऊ शकतो; परंतु विशिष्ट कंपनीच्याच गोळ्या, औषधी, अथवा इंजेक्शन
आणून मला दाखवा, असे डॉक्टरांकडून रुग्णांना सांगितले जाते.

सूत्राने सांगितले की, आपल्याच कंपनीच्या औषधांचे डॉक्टरांनी
प्रिस्क्रिप्शन करावे, याकरिता त्या कंपन्यांचा मार्केटिंग विभाग
डॉक्टरांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये पार्टी देतो. त्यांना चार चाकी
गाड्या, फॉरेन टूरचे पॅकेज देऊ केले जाते. या पॅकेजचा लाभ मिळवा यासाठी
काही कंपन्या संबंधित हॉस्पिटलजवळ असलेल्या मेडिकल स्टोअरवर ती औषधी
उपलब्ध करतात.

बर्‍याचदा तर औषध कंपन्या आपली औषधी थेट डॉक्टरांकडेच विक्रीसाठी ठेवतात.
त्यांना रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी मोजकीच औषधी जवळ ठेवण्याची मुभा आहे;
परंतु डॉक्टरांजवळ किती औषधी आहेत हे पाहणारी यंत्रणाचा अस्तित्वात नाही.
नफेखोरीचे लागण लागलेल्या वैद्यकीय क्षेत्रात ही वस्तुस्थिती आहे.
रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता त्यांना नामांकित कंपन्यांची
औषधी लिहून दिली जातात.

सत्यमेव जयातेच्या निमित्ताने......सर्व सदस्यांच्या माहितीकरता.. आजच डि एन ए ह्यात आलेल्या माहिती नुसार, ह्या वेब्सैट्स वर जेनेरिक औषधांबाबत विस्तृत माहिती मिळेल. मी ह्या साईट्स आजच पहिल्या. कृपया सर्व सदस्यांनी अवश्य पाहाव्या आणि अनुभव घ्यावा आणि लुबाडणाऱ्या डॉक्टर्स पासून आपली सुटका करावी. ( सल्ला जरूर घ्यावा) . ह्या निमित्ताने एवढी अवेअरनेस आली हे काही कमी नव्हे. ह्या वेबसाईट वर पूर्ण माहिती, किमती सकट दिली आहे.

www.medindia.net

www.medguideindia.com

www.patientindia.com

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive