Saturday, June 9, 2012

Googles entertaining report - गुगलचा रंजक अहवाल

गुगलचा रंजक अहवाल
गेल्या वर्षी आलेल्या अभूतपूर्व अशा पुरामुळे थायलंडचे अतोनात नुकसान झाले. कित्येक कोटी लोक बेघर झाले आणि अनेक कंपन्या पाण्याखाली बुडाल्या. अक्षरश: ३ फूट पाण्याखाली त्या दबल्या गेल्या होत्या. या दबलेल्या कंपन्यांपैकी मुख्यत्वे अनेक कंपन्या या हार्ड डिस्क ड्राइव्ह अर्थात प बनवणार्‍या होत्या. या कंपन्यांचे उत्पादनच थांबल्याने कॉम्प्युटरच्या बाजारात हार्ड डिस्कची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी कधी न उद्भवलेली परिस्थिती उद्भवली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही प्रमाणात का होईना, हा पुरवठा पुन्हा सुरळीत व्हायला लागला आहे. परिस्थिती मात्र पूर्णपणे बदलल्याने सध्या विनाकारण या हार्ड डिस्कच्या किमती आकाशाला भिडल्याने ग्राहकवर्ग मात्र पूर्णत: भांबावला आहे. उत्पादक मात्र या वाढलेल्या किमती पुन्हा मूळ पदावर आणायला अजिबात उत्सुक दिसत नाहीत. आजच्या वाढलेल्या किमती याच सर्वसाधारण किमती असल्यासारखे वातावरण बाजारात तयार होऊ लागले आहे. पूरपरिस्थितीआधी २ टीबीची सिगेट अथवा वेस्टर्न डिजिटलसारख्या मान्यवर कंपन्यांची हार्ड डिस्क साधारण ७०त्र् ते ९०त्र् ला मिळत असे. पुरानंतरचा झालेला पुरवठा मात्र ही किंमत एकदम २५०त्र् पर्यंत घेऊन गेला आणि सगळेच चक्रावले. त्यानंतर हळूहळू ही किंमत १५०त्र् ते १७०त्र् पर्यंत खाली आली आणि आता १२०त्र् पर्यंत पोहोचली आहे. या सगळ्यात ग्राहकाच्या खिशाला मात्र चांगलीच चाट बसली आहे. याउलट उत्पादक कंपन्यांनी मात्र रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळवत शेअर बाजारातदेखील मोठी झेप घेतली आहे.
सतत काही ना काही कारणाने चर्चेत असलेली फेसबुक कंपनी आता त्यांच्या नव्या उत्पादनांसाठी पुन्हा चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऍपल कंपनीचे माजी तंत्रज्ञ एकामागोमाग एक आपल्याकडे नोकरीला घेत फेसबुकने सगळ्यांनाच चकीत केले होते. फेसबुकच्या स्मार्टफोन या नव्या उत्पादनासाठी ही लगबग चालू आहे. त्यातच आता पुढच्या वर्षीपर्यंत फेसबुक ‘नोकिया’च विकत घेईल असे भाकीत वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर १८ महिन्यांतच फेसबुकचा स्वत:चा ‘फेसफोन’ हा स्मार्ट फोन बाजारात दाखल होईल. विंडोज ८ बेस असलेला हा फोन असेल. हा फोन नक्की दिसायला कसा असेल हे फेसबुकनेदेखील ठरवलेले नसले तरी तो निळ्या रंगाचा असेल आणि त्यावर फेसबुकचा लोगो ‘ई’ असेल अशी चर्चा बाजारात रंगलेली आहे. त्यातच सध्या आलेल्या एका नव्या रिपोर्टनुसार ‘ऑपेरा सॉफ्टवेअर’ ही ऑपेरा ब्राऊझर बनवणारी कंपनी विकत घेण्याच्या विचारात फेसबुक असल्याची बातमी आहे. या कंपनीच्या खरेदीनंतर फेसबुक स्वत:चे ‘फेसबुक ब्राऊझर’ तयार करण्याच्या विचारात आहे. या ब्राऊझरमध्ये फेसबुकच्या सोप्या वापरासाठी इन बिल्ट प्लग इन्स आणि नवे फीचर्स असणार आहेत. ज्यामुळे तुम्हाला सतत फेसबुकवर अपडेट राहणे अत्यंत सोपे होणार आहे. ऑपेरा ब्राऊझर हा अनेक कॉम्प्युटर वापरकर्त्यांचा आवडता आणि लोकप्रिय ब्राऊझर आहे. ऑपेराचा मोबाईल ब्राऊझर तर चक्क फ्री असून सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राऊझरदेखील आहे. एकदा ही कंपनी विकत घेतली की, नवीन ब्राऊझर बनवण्याचे फेसबुकचे कष्ट सहज वाचणार आहेत.
गुगलने नुकताच एक रंजक अहवाल प्रसिद्ध केला आहे.गुगलच्या अहवालानुसार गुगलला जवळ जवळ १ मिलियनपेक्षा जास्त लिंक्स दर महिन्याला त्यांच्या सर्च डेटाबेसमधून उडवायला लागतात. यामध्ये मुख्यत्वे चित्रपट, सॉफ्टवेअर्स आणि संगीताशी संबंधित लिंक्स असतात. अशा बेकायदा आणि कॉपीराइट कायद्याच्या भंग करणार्‍या लिंक्स उडवण्यासाठी सगळ्यात जास्त तक्रारी या मायक्रोसॉफ्टतर्फे करण्यात येतात. त्या सरासरी ५,४३,३७८ एवढ्या असतात. मायक्रोसॉफ्टनंतर नंबर लागतो BPI आणि NBC यांच्या. या दोघांच्या मिळून तक्रारी साधारण ३,००,००० पर्यंत जातात. filestube.com, torrents.eu आणि 4shared.com या संस्थळांच्या लिंक्सवर सर्वात जास्त कारवाई करण्यात येते. गुगलच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे केल्या जाणार्‍या ९७टक्के तक्रारींवर ताबडतोब कारवाई करण्यात येते. या तक्रारी गुगलकडे ऑनलाइन अर्जाद्वारे केल्या गेलेल्या असतात. गुगल टीमकडून त्या तपासून योग्य त्या कारवाईचे निर्देश दिले जातात. उरलेल्या ३टक्के तक्रारी मात्र अर्धवट भरलेला अर्ज, तक्रार केलेल्या लिंक्सचे वेबपेज उपलब्ध नसणे अथवा त्या लिंक्स कायद्याचे उल्लंघन करणार्‍या नसल्याचे निदर्शनास येणे यामुळे नाकारल्या जातात.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive