Tuesday, June 12, 2012

लसणात लपलेले गुणधर्म जाणून घ्या! Lasun



लसणात लपलेले गुणधर्म जाणून घ्या!

lasun
PR
लसणामुळे फक्त जेवणच चविष्ट होते असे नाही, लसणामध्ये असे बरेच गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वपूर्ण आहेत. जाणून घेऊ की या छोट्या लसणामध्ये कोण कोणते गुण लपलेले आहेत.

एंटीबायोटिक - प्रथम लसणाला सोलून घ्या, लसणाच्या एका कुडीचे ३ ते ४ तुकडे करा. दोन्ही वेळेच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने लसणाचे दोन तुकडे तोंडात ठेऊन चगळा त्यानंतर पाणी प्या.

रोज लसणाचे सेवन केल्यास टीबी होत नाही. लसून हे किटाणुनाषक आहे, एंटीबायोटिक औषधांसाठी हा एक चांगला विकल्प आहे, लसणामुळे टीबीचे किटाणू नष्ट होतात.

डोके दुखीसाठी रामबाण उपाय - एका लसणाच्या ४ कुड्या तीस ग्राम मोहरीच्या तेलामध्ये टाका. तेल थोडे गरम करा आणि त्या तेलाने मालिश करा डोके दुखणे थांबेल.

दमा दूर करण्यासाठी उपयुक्त - दम्याच्या त्रासावर लसून हे एक उपयुक्त औषध आहे. ३० मिली दुधामध्ये लसणाच्या पाच कुड्या टाकून दुध गरम करा. रोज हे गरम दुध पिल्याने दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होईल. अद्र्काच्या चहामध्ये थोडा लसण टाकल्याने दमा नियंत्रित राहतो.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive