Saturday, June 30, 2012

वारी थोडक्यात- Waari information in brief


- ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर २२८ किलोमीटर
- सोहळ्याची परंपरा १७६ वर्षांची
- यंदा सोहळ्यात वारक - यांची संख्या दिड लाख
- सोहळ्यात १४ मुक्काम
- प्रत्येक मुक्काम सरासरी १२ किलोमीटरचा
- पालखीचा पुणे , सातारा , सोलापूर जिल्ह्यातून प्रवास
- सोहळ्यात चार गोल तर तीन उभे रिंगण
- सोहळ्याच्या नियंत्रणासाठी सहा चोपदार
- पालखीच्या रथापुढे २७ दिंड्या तर रथा मागील दिंड्यांना मर्यादा नाही . सध्या २२८ अधिकृत दिंड्या
- सोहळ्यात वारक - यांच्या अन्न , वस्त्र , निवा - या सोयीसाठी सुमारे ३ हजार अधिकृत वाहने .
- पंढरपुरात येणा - या प्रमुख आठ पालख्या . यात ज्ञानेश्वर माऊली , तुकाराम महाराज , निवृत्तीनाथ महाराज , मुक्ताई , जनार्दन स्वामी , एकनाथ महाराज , सोपानकाका आणि बाबा चैतन्य महाराज यांचा समावेश
- सोहळ्यातील प्रत्येक दिंडीत एक विणेकरी , पखवाज वादक , ४० - ५० टाळकरी , - ६ झेंडेकरी , एक चोपदार , दिंडीप्रमुख , तुळशी वृंदावन आणि पाण्याचा हंडा घेऊन जाणारी प्रत्येकी एक महिला आणि भजनात रंगणारे इतर वारकरी अशी एका दिंडीची रचना असते
 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive