Tuesday, June 12, 2012

Eggless Chicken एगलेस चिकन अर्थात अंड्याविना पिल्लू..!



एगलेस चिकन अर्थात अंड्याविना पिल्लू..!


लंडन - कोंबडी आधी की अंडे?, या प्रश्‍नाने वर्षानुवर्षे अवघ्या जगाला भंडावून सोडले. किंबहुना, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी पाश्‍चात्य देशातील काही शास्त्रज्ञांनी अनेक वर्षे संशोधनही केले, आणि कोंबडीच आधी, असा निष्कर्ष काढला. आता मात्र, हे सर्व प्रश्‍न, तर्क- वितर्कांना श्रीलंकेतील एका घटनेने मोडित काढले आहे. कारण, एका कोंबडीच्या पोटी थेट पिल्लानेच जन्म घेतला आहे. थोडक्‍यात सांगायचे, तर अंड्याविना पिल्लू (एगलेस चिकन) अशी ही घटना आहे. 
 
कोंबडीने अंडे घातल्यानंतर सुमारे 21 दिवसांनंतर त्यातून पिल्लू बाहेर येते. मात्र, या घटनेत कोंडीने थेट पिल्लालाच जन्म दिला. पिल्लाची कोंबडीच्या गर्भातच पूर्ण वाढ झाली आहे. मात्र, त्यात जन्मदात्री कोंबडीचा मृत्यू झाला आहे 

पिल्लाला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होऊ नये, म्हणून सरकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येण्यास बंदी केली आहे. पशुवैद्यकीय विभागाचे मुख्य अधिकारी पी. आर. यापा यांनी याची बारकाईने पाहणी केली असता, सदर अंड्याची कोंबडीच्या गर्भातच वाढ होऊन ते तेथेच फुटल्याचे आढळून आले. शरीराच्या आत जखमा झाल्याने कोंबडीचा मृत्यू झाल्याचे कोंबडीच्या शवविच्छेदनातून स्पष्ट झाले. 
 
पहिले अंडे आले, की कोंबडी? 
लंडन - पृथ्वीवर पहिले अंडे आले, की कोंबडी?, हा प्रश्‍न हजारो वर्षांपासून सर्वांना सतावत आहे. आता मात्र, या प्रश्‍नाचे उत्तर शोधून काढण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. अर्थात काही शास्त्रज्ञांनी तसा दावा केला आहे. 

शेफील्ड आणि वारविक विश्‍वविद्यालयाच्या वैज्ञानिकांनी हा दावा करताना सर्वप्रथम कोंबडीचा जन्म झाल्याचे सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ओवोक्‍लाइडिन नावाचे प्रोटीन अंडे उघडण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. हे प्रोटीन कोंबडीच्या अंडाशयातून निर्माण होत असते. त्यामुळे आता अंडे पहिले आले, की कोंबडी हा प्रश्‍नच राहात नाही. कोंबडीचाच जन्म आधी झाला आहे. 

अंडे उघडून त्यांची तपासणी करण्यासाठी वैज्ञानिकांनी अत्याधुनिक संगणक हेक्‍टरचा वापर केला आहे. 
शोधाशी निगडित असलेले प्रमुख वैज्ञानिक डॉ. कोलिन फ्रीमैन म्हणाले, की गेल्या हजारो वर्षांपासून हा प्रश्‍न विचारला जात होता. मात्र, आता आमच्याकडे पहिले कोंबडी आली, याचा पुरावा आहे. 

वैज्ञानिकांच्या या अहवालात मात्र पहिले कोंबडी कशी आली, याचा माहिती दिली गेलेली नाही.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive