पायी वारी कशासाठी?
१ ) संसार व्यापातून थोडे दिवस तरी मुक्तपणे एका वेगळा आनंद घेण्यासाठी ही वारी करता येते . त्याग वृत्तीने ईश्वराची सेवा
२ ) जीवनात जगताना वासना व विकार यातून उद्भवणारे मालिन्य नष्ट होते .
३ ) आजच्या धकाधकीच्या जीवनात निर्सगाशी एकरूप होता यावे , या उद्देशाने दररोज काही मैल चालता यावे .
४ ) वारीत राज्यातून तसेच परराज्यातून वारकरी सहभागी होतात . त्यामुळे तेथील वैविध्य अनुभवता यावे .
५ ) मानसिक तप करून संसार सुख घेता यावे .
६ ) विविध स्तरातील लोकांशी संपर्क येवून निरिक्षण शक्ति वाढते .
७ ) चालीरिती समजतात .
८ ) अडीअडचणींवर मात करण्याचे कौशल्य आत्मसात करता येते .
९ ) निवार्थ वृत्तीने वारीत सामील झाल्याने परमार्थाची अनुभूती होते .
१० ) आपुलकीच्या भावनेने अनेकांशी प्रेम आणि जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात .
११ ) आपल्याच स्वभावाची माणसे भेटून अध्यात्माची देवाण - घेवाण होते .
१२ ) सृष्टीच्या चराचरात समावणा - या भगवंताची अनुभूती होते .
१३ ) भक्तीचे रुपांतर प्रत्यक्ष कृतीत होते .
पालखी सोहळ्याचे नियम
१ ) वारीत तंबाखू , बिडी , किंवा दारु पिऊ नये .
२ ) माऊलींचा सोहळा सोडून पुढील मुक्कामी जाऊ नये .
३ ) रस्त्याने एकमेकांशी भांडू नये .
४ ) दुस - यांच्या वस्तू चोरू नये .
५ ) दिंडीशिवाय चालणा - यांना गावांतील शाकाहारी किंवा मांसाहारी एकत्र असलेल्या खानावळीत जेवू नये .
६ ) बाहेरचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे , स्वतःला झेपेल इतकेच सामान बरोबर घ्यावे
७ ) इतरांना त्रास होईल असे वागू नये . मिळूमिसळून चालावे .
८ ) सोहळ्यात दिंडी सोडून मागेपुढे राहू नये .
९ ) आपलं नाव , पत्ता , टेलिफोन नंबर , दिंडीप्रमुखाकडे नोंदणीच्या वेळी द्यावा
१० ) स्वतःकडे जास्त पैसे ठेवू नयेत . तसेच दागदागिने बाळगू नये .
पालखी सोहळ्यातील सेवेकरी
१ ) चोपदारः
माऊलींच्या पालखी सोहळ्यात रंधवे कुटुंब या सेवेत आहेत . पालखी सोहळ्यातील शिस्तीचे नियंत्रण यांच्याकडे असते . दिंडीविषयी मानापनाचा तंटा , वाद पंचाद्वारे मिटवण्याचे काम यांच्याकडे असते . या दिंडीत फारच महत्त्व आहे . हा मान वंशपरागत आहे
२ ) रथाला बैलः
कुंडलीक मारुती कु - हाडेपाटील वरखडे , रानवडे , भोसले या घराण्याकडे माऊलींच्या रथाला बैल जोडण्याचा मान आहे .
३ ) भोपेः मुकुंद कुलकर्णी , कचू कु - हाडे , महादेव टोपे
४ ) भालदार
५ ) छत्र चवरे
६ ) जागर
७ ) रथाला दररोजची सजावट करणारे
८ ) माऊलींच्या पालापुढे वीणा पहारा करणारे
९ ) माऊलींच्या अश्वाची व्यवस्था पाहणारे
१० ) नैवेद्य पूजा
११ ) पंखेवाले
समाज आरतीः
वाटचालीतील नित्याच्या मुक्कामात सर्व दिंड्या मिळून एकत्रितपणे संध्याकाळी आरती करण्याची परंपरा आहे . कोणतीही दिंडी परपस्पर आरती करीत नाही . माऊलींचा ज्या ठिकाणी मुक्काम असतो तेथील तळावर माऊलींच्या तंबूसमोर पटांगणात सर्व दिंड्या गोलाकार करून उभ्या राहतात . पालखी डोलत डोलत तंबूसमोर आणून मोठ्या चौरंगावर ठेवतात . थोडा वेळ जयघोष होतो . रस्त्याने भजन करीत वारकरी दमले भागले असले तरी येथे आणखी उत्साह वाढतोच . सर्व दिंड्यांतील भगवी पताके फडफडत असतात . अवती भोवती सर्वत्र जनसमुदाय , गावकरी माऊलीच्या स्वागतास आलेले असतात . तळावर ठराविक दिंड्यांच्या राहुट्या उभारलेल्या असतात . वारकरी डोलत नाचत उभे असतात .
समाज आरतीच्या वेळी चोपदार महत्त्वाचे काम बजावतात . दिंड्या माऊलींच्या तंबूपुढे तळावर सभोवती व्यवस्थित गोलाकार लावणे , पालखी वेळेवर आणून आरती करणे , सर्वांना सहकार्याने बरोबर घेवून लोकांच्या तक्रारीचे निवारण करणे , हरवल्या - सापडलेल्या वस्तूंची सूचना देणे . अशी महत्त्वाची कामे चोपदाराला समाज आरताच्या वेळी करावी लागतात . आरतीच्या वेळी त्याने चोप आरोळी देऊन वर करताच समाज स्तब्ध होतो . सगळीकडे शांतता पसरते काही सूचना केल्या जाता या वर्दी म्हणतात . आरतीनंतर माऊलीला तंबूत नेले जाते .
माऊलींचे न्यायालयः
पंढरीच्या वाटेवर वारक - यांना दिंडीत आलेल्या अडचणी , इतरांकडून झालेला त्रास अशी तक्रारी व्यक्त करण्यासाठी , त्या संस्थानाच्या , चोपदाराच्या नजरेत आणण्यासाठी समाजआरतीच्या वेळी चोपदाराचा चोप ( दंड ) जोपर्यंत उंचावत नाही तोपर्यंत सगळ्या दिंडीत टाळ वाजत असतात . आरतीसाठी चोपदारांचे चोप बंद होतात . सर्वत्र शांतता पसरते . अशा वेळी ज्या दिंडीची तक्रार असते त्या दिंडीत टाळ वाजत राहतात . आणि सगळ्या दिंड्याचे , संस्थानचे , चोपदारांचे लक्ष वेधले जाते . अशावेळी चोपदार त्या दिंडीत जाऊन त्यांची तक्रार ऐकून योग्य ते आश्वासन देऊन त्या दिंडीतील टाळ थांबवितात . नंतर सामानाच्या आल्या - गेल्याची सापडलेल्या व हरवलेल्या माणसांची व सकाळी निघण्याची वर्दी दिल्यावर आरतीसाठी टाळ वाजतात . अशी टाळ वाजवून तक्रार करण्याची वारकरी मंडळीत परंपरात पद्धत रुढ आहे . एरवी चोपदार , मालक संस्थान यांना व्यक्तिशः तक्रारी सांगितल्या जातात . त्यावर उपाय काढण्यास उशीर होतो . म्हणून लगेचच लक्ष वेधण्यासाठी ही पद्धत आहे .

प्रशांत जाधव
No comments:
Post a Comment