Sunday, August 5, 2012

मित्रासाठी कायपण.. संग्राम साळवी। (अभिनेता) Sangram Salvi



संग्राम साळवी। (अभिनेता)


खास मित्र म्हणून एकदोघांचं नाव घेता येणार नाही. मैत्रीत जवळचं, खास असे गट नसतातच. असते ती फक्त निखळ मैत्री.. प्रत्येक मित्र हा माझ्यासाठी मित्र याच कॅटेगरीत मोडतो.
दोन-तीन वर्षांपूर्वीचा एक फ्रेंडशिप डे माझ्या चांगलाच लक्षात आहे. मस्तच होता तो दिवस. शाळेपासूनच्या एका मित्रासोबत माझं जोरदार भांडण झालं. भांडण कसलं मारामारीच झाली आमची. त्याचं कारण सांगताना मला आजही हसू येतंय. एका मुलीवर त्याचं प्रेम होतं. त्या मुलीला माझ्या या मित्राला एक पत्र द्यायचं होतं. तेच द्यायला ती माझ्याकडे आली होती. पण या मित्राला वाटलं की आमचंच प्रकरण सुरूये. मग तो अगदी हमरीतुमरीवरच आला. मी त्याला किती सांगितलं, पण तो ऐकून घ्यायलाच तयार नव्हता. आमचं सॉल्लीड वाजलं. इतरांनीच मग आमचं भांडण सोडवलं. त्याला जेव्हा कळलं की ती मुलगी त्याचंच पत्र मला द्यायला आली होती, तेव्हा त्यानं संध्याकाळी माझ्यासाठी पार्टी ठेवली. मीही त्याच्यासाठी पार्टी ठेवली होती. मग कोणी कुठल्या पार्टीला आधी जायचं यावरून वाद झाला. आता आमचे इतर मित्र चांगलेच वैतागले. मग आम्ही तिसर्‍याच ठिकाणी पार्टी ठेवली आणि मस्त धम्माल केली. आमचं सकाळंच भांडण संध्याकाळी मिटून गेलं होतं.
आता यंदाचा फ्रेंडशिप डे बघू कसा साजरा करायचा ते. अजून काहीच प्लॅनिंग नाही. पण आमचं अचानक ठरतं. मित्रांनी काही ठरवलंच तर मग करू एन्जॉय. बाहेर भेटायचं, मस्ती करायची आणि तो दिवस फ्रेंड्ससोबत घालवायचा असा आमचा फंडा आहे. यंदाही तसंच होईल, असं दिसतंय...

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive