Saturday, June 2, 2012

Old gadgets which we lost in modern age



 
व्हीडिओ क्यासेट प्लेअर ................................सदया सीडी प्लेअर आणि डीवीडी प्लेअर निं याची जागा घेतली आहे, पूर्वी ज्यांच्या टीवी वर हा ठेवलेला असायचा त्याला श्रीमंत मानायचे.  

      
टीवी एंटीना.....................................कोणाच्या घरात टीवी आहे की नाही हे त्याच्या घरावर  असलेली   टीवी एंटीने वरून कळत असे. आज ह्या काल बाह्य झाल्या आहेत, तरी पण ज्यांनी ज्यांनी घराच्या कौलांवर चढून पोलिश पेपर ने ह्या पोलिश केल्या आसतील त्यांच्या आठवणी नक्कीच ताज्या झाल्या असतीलच. 

  
     
व्हीडिओ क्यासेट..............................आज हिची जागा सीडी आणि डीवीडी निं घेतली आहे, तरी पण ज्यांनी ज्यांनी ''व्हीडिओ क्यासेट'' २० ते २५ मिनिट बसून  पेनाने  किव्वा पेन्सिल ने  रिव्हायिंड केली असेल ते तिला कधीच विसरू शकत नाहीत. 

    
  विठी-दांडू.....................................फेस-बुक आणि ट्विटर च्या जमान्यात हा खेळ जवळ जवळ नामशेष झाला आहे, आता फक्त माहिती उपलब्ध आहे.पण तुम्ही नक्कीच खेळला असणार किव्वा निदान इतरांना खेळतांना बगीतले तरी असणारच माझी खात्री आहे ,  मग सांगणार ना  आताच्या पोरा-पोरीना  तुम्ही कसा खेळायचा विठी दांडू ते. ?? 

   
ओडिओ  क्यासेट..............................हिच्या मध्ये आपल्या आवडत्या गाण्यांचा संग्रह टेप करून ''तिच्या'' किव्वा ''त्याच्या'' वाढ-दिवशी गिफ्ट देण्यात काय मजा होती, हे कदाचित आताच्या मुला-मुलीना कळणार नाही, यांची जागा जरी पेन  ने घेतली असली तरी ज्यांनी ज्यांनी ओडिओ  क्यासेट वापरल्या आसतील त्यांनी नक्कीच त्या हाताचं बोट घालून , पायरीवर बसून  रिव्हायिंड किव्वा फोर्वार्ड केल्या असतीलच. 



POPULAR Ruler 50 CMS ( Art. No. 1927/50 ) 
लाकडी पट्टी.........................................हिचा मार ज्यांनी खाल्ला आहे, त्यांनी आता जरी हाताचा तळवा पहिला तरी हिची आठवण होयीलच. आज हि मात्र सगळ्या वर्गातून नामशेष झाली आहे. तिची जागी आता प्लास्टिक आणि मेटल च्या रुलर  ने घेतली आहे.  

 
लगोरी.........................................जे कोणी हा खेळ खेळला नसतील ते दुर्दैवीच ........उन्हात कानाच्या बाजूने येणाऱ्या घामाच्या धारा दुर्लक्षित करून ''लगोरी'' लावायची जी गम्मत होती त्याची मज्जा आज ऐसी मध्ये बसून  आय पी एल बगण्यात कुठे ??  
   
क्यामल ज्योमेट्री बौक्स..................................लहानपणी शाळा सुरु झाली की वह्या-पुस्तक खरीदी मध्ये हिची खरेदी हमखास होत असे, आणि तसे नाही झाले तर खाली बसून पाय लांब करून जमिनीवर आपटत आपण रडलो होतो, हे किती तरी जणांना हीच चित्र बगितल्यावर स्मरत असेल. नाही का ???

पेजर.................................................अचानक आलेली हि एक डब्बी, ज्या प्रमाणे आली त्याच प्रमाणे गायब देखील झाली. फारच कमी लोकांनी हिला वापरायच सौभाग्य लाभल. आज हिच्या जागी मोबायील  टेक्सिंग वापरले जाते. 


गोट्या.............................................शाळेच्या खाकी प्यांट च्या खिशात ज्यांनी ज्यांनी गोटया ठेवून, धावताना येणारा  आवाज ऐकला असेल, ते एकमेवच.. आता गोटया नाहीत, ती खाकी  प्यांट नाही आणि तो आवाज हि या शहराच्या आवाजात कुठेतरी हरवला आहे.




No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive