Sunday, August 5, 2012

जवळचे फ्रेंड्स भेटतात तोच फ्रेंडशिप डे अभिजीत केळकर। (अभिनेता) Abhijit Kelkar



अभिजीत केळकर। (अभिनेता)



खरं सांगायचं तर मी अजूनपर्यंत एकदाही फ्रेण्डशीप डे सेलिब्रेट केलेला नाही. माझा अशा डेजवर विश्‍वास नाही. ज्या दिवशी मला माझे जवळचे मित्र - मैत्रिणी भेटतात तो दिवस माझ्यासाठी फ्रेण्डशीप डे.
लीना, रूपाली, तृप्ती, लोकेश आणि मी. हा आमचा पाच जणांचा ग्रुप पहिलीपासूनचा आहे. आम्ही पाचजण जेव्हा कधी एकत्र भेटतो, तेव्हा तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असतो. मग त्या दिवसालाच फ्रेण्डशीप डे म्हणून मी सेलिब्रेट करतो. आज कालच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाच वेळ मिळत नाही. कॉलेजमध्ये असताना मला आमच्याच ग्रुपमधली एक मुलगी अचानक आवडायला लागली होती. मी त्या मुलीला प्रपोज केलं. ती मुलगी अगदी पूर्णत: तयारीत होती. तिचा स्पष्ट नकार तिने कारणांसह दिला. मग मला कळलं मी तिला प्रपोज करणार हे आधीच तिला लीनाकडून कळलं होतं. तेव्हा माझं आणि लीनाचं खूप मोठं भांडण झालं होतं. आम्ही बरेच दिवस बोललो नव्हतो. पण लीना आणि मी बेस्ट फ्रेण्ड होतो. सो आमच्यातलं भांडणं कालांतराने मिटलं.
शाळेमध्ये मी नेहमी लीना आणि रूपालीच्या मध्ये बसायचो. आठवी, नववीमध्ये गेल्यावर मुलं मोठी होतात. मग शाळेत डबा नेणं बंद करतात. मुलींमध्ये असतो म्हणून, डबा खातो म्हणून मला मित्र चिडवायचे. पण आमची दोस्ती पक्की राहीली.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive