Sunday, August 5, 2012

फेंड्रशिप बँड विकलेले! ऐश्‍वर्या सखुजा। (अभिनेत्री) Aishwarya Sakhuja



ऐश्‍वर्या सखुजा। (अभिनेत्री)


लहानपणी फ्रेंडशिप डेला मित्र - मैत्रिणींना फ्रेंडशिप बँड बांधायचा, हेच फ्रेंडशिप डेचं माझं सेलीब्रेशन असायचं. मी लहान असतानाच फ्रेंडशिप डे सेलीब्रेट करायचे. आता स्पेशल सेलीब्रेशन असं काही करत नाही.
लहानपणी मी कधीच एकही फ्रेंडशिप बँड विकत घेतलेला नाही. मी स्वत: फ्रेंडशिप बँड तयार करायचे. मी तयार केलेले फेंड्रशिप बँड सगळ्य़ांनाच खूप आवडायचे. एका वर्षी सगळेच माझ्या फ्रेंडशिप बँडचं खूपच कौतुक करत होते. हे माझ्या लक्षात आल्यावर मग मी सरळ जाहीर करून टाकलं, या वर्षी मी ज्याला फ्रेंडशिप बँड बांधेन त्यांनी मला फ्रेंडशिप बँडचे पैसे द्यायचे. चांगले, जवळचे फ्रेंड्स म्हणजे रोहित नाग, पूजा शर्मा आणि मीरा शिरोडकर. मी दिल्लीला राहायला होते. तेव्हा एका ग्रुपबरोबर मी नेहमी हँग आउट करायचे. माझं कोणाशी खटकलं तर नंतर माझं त्या व्यक्तीशी जमण तसं कठीणच असतं. या वर्षी मी स्माइल या एनजीओमध्ये जाऊन लहान मुलांबरोबर माझा फं्रेडशिप डे साजरा करायचं ठरवलंय.

No comments:

Post a Comment

sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive