Sunday, August 5, 2012

आईच माझी बेस्ट फेंड्र मृणाल दुसानीस। (अभिनेत्री) Mrunal Dusanis



मृणाल दुसानीस। (अभिनेत्री)


मला मित्र-मैत्रिणी आहेत, पणखरं सांगायचं तर माझी आईच माझी बेस्ट फ्रेंड आहे. मी तिच्याबरोबर माझ्या सगळ्य़ा गोष्टी शेअर करते. मला एखादा मुलगा आवडला तरी मी माझ्या आईला सांगते. माझ्या कोणत्याच फं्रेडबरोबर मी माझं वैयक्तिक आयुष्य शेअर करत नाही.
कॉलेजमध्ये असताना आम्ही दणक्यात फ्रेंडशिप डे साजरा करायचो. सगळ्य़ात जास्त फ्रेडशिप बँड कोणाला मिळतात यासाठी आमच्यामध्ये स्पर्धा लागायची. सगळे जण आपल्याच हाताला जास्तीत जास्त फं्रेडशिप बँड असावेत, म्हणून वेगवेगळ्य़ा युक्त्या लढवायचे. आम्ही दुकानातून फेंड्रशिप बँड विकत आणून स्वत:च्या हाताला बांधायचो. आणि मग हा त्याने / तिने बांधला असं खोटं सांगायचो. त्या दिवशी जास्त फ्रेंडशिप बँड हाताला असणं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट असायची. आता हे सगळं बालीश वाटतं. पण तेव्हा खूप मजा यायची. मी आता खरंच फ्रेंडशिप डे साजरा करत नाही. प्रत्येक दिवस हा तुमचाच असतो. यामुळे फ्रेंडशिप डे वेगळा असावा असं मला आता वाटत नाही. नवीन मैत्री करणार्‍यांसाठी, कोणाला काही सांगायचं, बोलायचं असेल तर त्यांना ही एक संधी असते.
माझ्या शाळेतल्या माझ्या मैत्रिणींच्या ग्रुपला मी खूप मिस करते. आयुष्यामध्ये परत काही वर्षे मागे जाण्याची संधी मिळाली, तर मी नक्कीच माझ्या शाळेच्या दिवसांमध्ये परत जाईन...
माझी नेहमीच भांडणं होत असतात. पण अबोला जास्त काळ टिकत नाही. भांडण झाल्यावर पुढच्या काही वेळातच आम्ही, मी परत बोलायला लागते. यावर्षी फ्रेंडशिप डेला मी दिवसभर शूटिंगमध्येच आहे. पण तरीही मी माझ्या मित्र - मैत्रिणींना फोन करून त्यांच्याशी बोलणार आहे. ज्या मित्र मैत्रिणींशी माझं बोलणं होत नाही, भेट होत नाही अशा मित्र-मैत्रिणींना या फ्रेंडशिप डेला कॉल करून त्यांच्याशी बोलेन, आणि पुढेही त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करेन.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive