Sunday, August 5, 2012

फ्रेंड्ससाठी काहीही.. प्रिया मराठे। (अभिनेत्री)



प्रिया मराठे। (अभिनेत्री)


नवरा शंतनू हाच माझा बेस्ट फ्रेंड.. माझ्यासाठी आजवरचा प्रत्येक फ्रेंडशिप डे स्पेशल ठरलाय. अगदी शाळेपासून कॉलेजपर्यंत दरवर्षी आम्ही मैत्रिणी हा दिवस फारच उत्साहात साजरा करायचो. धम्माल, मस्ती, फ्रेंडशिप बँड बांधणं असा सगळा बालीशपणा असायचा त्यात. अर्थात मैत्री ही फार वेगळी असते. फक्त बँड बांधल्यानं आपण मित्र झालो असं होत नाही. इतर अनेक गोष्टी यासाठी लागतात. हे सगळं नंतर कळायला लागलं. पण दरवर्षीचा फ्रेंडशिप डे अगदी छानच असायचा.
आई, वडील, नातेवाईक यांच्यानंतर आपल्या आयुष्यात असतात ते मित्रच.. फ्रेंड्स माझ्यासाठी तरी खूपच महत्त्वाचे आहेत. असं नाहीये की, मला अगदी भरमसाठ मित्रमैत्रिणी आहेत. पण जेवढे आहेत ते अगदी जवळचे आहेत. अगदी घट्ट नातं आहे आमचं. मला कधीही काहीही लागलं तरी त्यांना मी बिनधास्तपणे सांगते. वेळकाळाचं काहीच बंधन नसतं. जसं ते माझ्यासाठी काहीही करू शकतात तसंच मीही माझ्या फ्रेंड्ससाठी काहीही करू शकते. आता माझं लग्न झालंय, पण त्याआधी मी पेइंग गेस्ट म्हणून राहयची. तेव्हाच्या रूममेट्ससोबत खूप धम्माल केलीय. त्यांना मी खूपच मिस करतेय. या वर्षीचं प्लॅनिंग अजून काहीच नाही. फ्रेंड्सना भेटता जरी आलं नाही तरी फोन नक्कीच करीन. आम्ही अचानकच प्लॅन करतो. त्यामुळे कदाचित काही ठरेलही. पण सध्या सगळेच कामात बिझी असल्यानं पुढच्या वीकेंडला फ्रेंडशिप डे साजरा करायचा विचार सुरू आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive