Sunday, August 5, 2012

आमचा नेहमीच फ्रेंडशिप डे गौरी नलावडे। (अभिनेत्री) Gauri Nalavade



गौरी नलावडे। (अभिनेत्री)

माझे बेस्ट फ्रेंड्स असे फार कोणी नाहीत. पण शाळेत श्रुती देशपांडे नावाची मैत्रीण होती, तेव्हा आम्हाला फारशी अक्कल नव्हती. पण तरीही फ्रेंडशिप डे आम्ही दणक्यात सेलीब्रेट करायचो. बाहेर फिरायला जायचो, भरपूर खायचो. आता इंडस्ट्रीत आल्यावर अभिनेत्री माधवी कुलकर्णीमाझी खूप चांगली मैत्रीण झालीये. रोजच आमचा फ्रेंडशिप डे असतो. कधी आम्ही एकत्र शॉपिंगला जातो, कधी डिनरला, पिच्चर, नाटकांना जातो. तिचा नवरा बाहेर असला की त्याला न सांगताच आम्ही प्लॅन करतो. तिच्या घरी जाऊन जेवण बनवतो, असं खूप काही आम्ही नेहमीच करत असतो.
मला आमचा गेल्या वर्षीचा फ्रेंडशिप डे आठवतोय. आम्ही ना सगळं सेम सेम आणलं होतं. म्हणजे मी गिफ्ट म्हणून चॉकलेट्स व फुलं आणली होती. तिचं पण तेच गिफ्ट होतं. त्या दिवशी मी जे प्लॅनिंग केलं होतं तेच माधवीचं पण प्लानिंग होतं. आम्ही काय करणार आहोत ते तिच्या नवर्‍याला पण कळवलं नव्हतं. अशी सगळी गंमत होती.
फ्रेंडशिप डे तर आहेच, पण आम्ही ना व्हॅलेंटाइन डे पण दोघी एकत्र साजरा करतो. त्या दिवशी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड एकत्र फिरायला जातात. त्यामुळे आम्हा मैत्रिणींना व्हॅलेंटाइन डे साजरा करताना बघून सगळ्यांनाच खूप आश्‍चर्यवाटत होतं.
अजून एक गंमत सांगते. आमचं एकदा भांडण झालं होतं. इतकं की एकमेकींशी बोलतच नव्हतो आम्ही. आमची एक सवय आहे. मेकअप करताना आम्ही गाणी लावतो. पण गाण्यांचं तिचं आणि माझं कलेक्शन वेगळं आहे. मी एक गाणं लावलं होतं. मेकअप रूममध्ये आल्यावर ते गाणं माधवी गुणगुणत होती. तिनं विचारलं कुणी लावलंय गाणं... जेव्हा तिला कळलं की, मी हे गाणं लावलंय तेव्हा ती गप्पच बसली. अशी आमची भांडणं होतच असतात, पण ती मिटतात सुद्धा!

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive