तांबड्या मातीची क्रांती!
कोल्हापूरच्या तांबड्या मातीने क्रांतिकारकांची प्रदीर्घ परंपरा देशाला दिली आहे. स्वातंत्र्यासाठी इसवी सन १८५७ला पहिला उठाव झाला, असे म्हटले जाते; पण, कोल्हापुरात त्यापूर्वी तब्बल १५ वर्षे अगोदर म्हणजेच इसवी सन १८४४ला स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव झाला होता. याला 'गडकर्यांचे बंड' म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या अपरिचित इतिहासावर टाकलेला प्रकाशझोत..
१८५७च्या उठावापूर्वी कोल्हापुरातील स्वातंत्र्यासाठी 'गडकर्यांचे बंड'
गनिमी कावा आणि बहुरूपी हेरगिरी..
कोल्हापूरच्या तांबड्या मातीने क्रांतिकारकांची प्रदीर्घ परंपरा देशाला दिली आहे. स्वातंत्र्यासाठी इसवी सन १८५७ला पहिला उठाव झाला, असे म्हटले जाते; पण, कोल्हापुरात त्यापूर्वी तब्बल १५ वर्षे अगोदर म्हणजेच इसवी सन १८४४ला स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव झाला होता. याला 'गडकर्यांचे बंड' म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या अपरिचित इतिहासावर टाकलेला प्रकाशझोत.. सागर यादव। दि. ११ (कोल्हापूर)
तराजू घेऊन आलेल्या आणि सत्ताधारी झालेल्या इंग्रजांचा युनियन जॅक खाली उतरवून तिरंगा फडकविण्यासाठी राज्यातील क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याचा लढा अखंड सुरू ठेवला. कोल्हापूरकर यात आघाडीवर होते. इसवी सन १८४४मध्ये गडकर्यांनी बंड करून स्वातंत्र्यलढय़ाचे रणशिंग फुंकले. मुंजाजी कदम-बांडे यांच्यासारख्या अनेक योद्धय़ांनी प्राण पणाला लावून इंग्रजांना पळताभुई थोडी केली. खुद्द इंग्रजांनी आपल्या पत्रव्यवहारात, 'हे केवळ एक बंड नसून त्यामागे स्वातंत्र्याची भावना आहे,' असे म्हटले आहे.
तोफा-बंदुकांसारख्या आधुनिक हत्यारांचा अभाव आणि इंग्रजांची कुटनीती यामुळे गडकरी फार काळ तग धरू शकले नाहीत. इंग्रजांनी साम, दाम, दंड, भेद या नीतीने गडकर्यांचे बंड म्हणजेच स्वातंत्र्याचा पहिला उठाव मोडून काढला.
पण.. गडकर्यांच्या बंडाची ठिणगी विझली नव्हती. १८५७च्या उठावाने त्याला पुन्हा फुंकर मिळाली. कोल्हापुरात छत्रपती चिमासाहेब महाराज यांच्या नेतृत्वाखाली ३१ जुलै १८५७ रोजी कोल्हापूर स्वतंत्र करण्यात आले; पण, हे स्वातंत्र्य फार काळ टिकविता आले नाही. राज्यभरातून इंग्रज फलटणी बोलावून क्रांतिकारकांचा हा लढा चिरडण्यात आला. पकडलेल्या क्रांतिकारकांना जुन्या राजवाड्यात तोफेच्या तोंडी देऊन, भिंतीवर आपटून ठार मारण्यात आले. इतकेच नव्हे, तर जुलमी इंग्रज अधिकारी बेधुंद होऊन त्यांच्या मृतदेहांवर नाचले.
देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत कोल्हापूरकरांचा सशस्त्र लढा पुढे सुरूच होता. सशस्त्र लढय़ाबरोबरच महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गावरूनही अनेक जण चालले; पण, इंग्रजांनी अहिंसेला हिंसेनेच उत्तर दिले. यामुळे कोल्हापूरकरांचा सशस्त्र क्रांतीचा लढा अधिकच तीव्र झाला. इंग्रजांविरुद्धच्या लढय़ात नवृत्ती आडूरकर (कोल्हापूर), शंकर पोतदार (हुपरी), अण्णा पाटील (इचलकरंजी), गुंडा सुतार (गंगापूर), मारुती आगलावे (कुर्ली), कल्लाप्पा मुतनाळे (निपाणी), सिद्दया स्वामी, शंकरराव इंगळे (दोघे कापशी, ता. कागल), तुकाराम भारमल (मुरगूड, ता. कागल), नारायण वारके (कलनाकवाडी, ता. भुदरगड), मल्लाप्पा चौगुले (चिखली, ता. कागल), परशुराम साळोखे (खडकलाट, ता. चिक्कोडी), बळवंत जवडे (जत्राट, ता. चिक्कोडी), हरिबा बेनाडे (चिखली, ता. कागल), नरसू परीट (अक्कोळ, ता. चिक्कोडी), बिंदू कुलकर्णी (मुत्नाळ, ता. गडहिंग्लज), गोपाळ फराकटे (वाळवे) अशा अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. बलाढय़ इंग्रज सत्तेविरोधात लढताना क्रांतिकारकांनी शिवछत्रपतींच्या गनिमी कावा युद्धशास्त्राबरोबरच, बहुरूपी हेरगिरीचा पुरेपूर वापर केला. सांकेतिक भाषेतून संवाद साधत आपल्या कारवाया पार पाडल्या. व्यक्ती, गाव आणि घटनांनाही त्यांनी सांकेतिक नाव देऊन इंग्रज अधिकारी व त्यांच्या खबर्यांना चकविले. कोकठय़ा, डिह्या, बलभीम, कॅप्टन, सावळ्या, गुणवंत, तानसेन, लाटमल्लू, मडी मल्लू, गोदूताई, भट अशी नावे व्यक्तींना दिली होती. कोल्हापूरला 'राजधानी', सांगलीला 'बाजारपेठ', मिरजेला 'जंक्शन' अशी नावे दिली होती, तर एप्रिल फूल (ब्रहमी खजिना लूट), बी. आर. पाटलाचे लग्न (बाश्री रेल्वे लूट) असा घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय अक्षता (बंदुका), अंगठी व खडे (पिस्तूल व काडतुसे) असा शस्त्रास्त्रांचा उल्लेख केला जात होता.

No comments:
Post a Comment