Sunday, August 12, 2012

Medicinal farming in Konkan

औषधी वनस्पती लागवड ते विक्री


कोकणातील शेतकर्‍यांच्या कायमस्वरूपी उन्नतीचा प्रकल्प; मुंबई विद्यापीठाचा महत्त्वाकांक्षी पथदश्री उपक्रम



औषधी वनस्पतींचा नैसर्गिक खजिना असलेल्या कोकणातील शेतकरी वर्षातून एकदा तांदळाचे पीक घेऊन कुटुंबाचा चरितार्थ चालवतो. मात्र आता भाताबरोबरच वर्षभर औषधी वनस्पतींची लागवड, संकलन, प्रक्रिया आणि खात्रीशीर विक्री अशा व्यवसायाची जोड शेतकर्‍यास प्राप्त झाल्याने कायमस्वरूपी आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळाला आहे.
गेली तीन वर्षे सुरू असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आयुर्विज्ञान विभागाच्या संशोधनातून हा प्रकल्प वास्तवात येत असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या आयुर्विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय देशमुख यांनी सांगितले.
५0 लाखांचे अनुदान
मुंबई विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू सामाजिक, विज्ञान व तंत्रविज्ञान केंद्राच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ अनुदान मंडळाने ५0 लाखांचे अनुदान दिले आहे. विद्यापीठातील आयुर्विज्ञान विभागातील संशोधक रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्हय़ांत दोन वष्रे मुक्कामी राहून या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार आहेत. औषधी संकलन आणि विक्री
औषधी वनस्पती संकलनाची पद्धती शेतकर्‍यांना शिकवली जाईल. संकलित वनस्पती जिल्हा स्तरावर उभारण्यात येणार्‍या 'संयुक्त सेवा केंद्रात' आणल्या जातील. याच संयुक्त सेवा केंद्रात प्रक्रिया व पॅकिंगची व्यवस्था राहील. धूतपापेश्‍वर, डाबर आणि अन्य औषध निर्मिती उद्योगांशी पूर्वसंपर्क साधून, संकलित औषधी वनस्पती विक्रीची थेट व्यवस्था केली आहे. औषधी वनस्पतीचा मोबदला थेट शेतकर्‍यास दिला जाईल.
या शेतकर्‍यांव्यतिरिक्त नैसर्गिक जंगल भागातून पारंपरिक पद्धतीने औषधी वनस्पती गोळा करणार्‍या आदिवासी कातकरी वा ग्रामस्थांकडून संयुक्त सेवा केंद्रात औषधी वनस्पती स्वीकारल्या जातील आणि त्यांनाही थेट मोबदला देण्याची व्यवस्था केली आहे. प्रकल्पाचे स्वरूप
प्रकल्पांतर्गत रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी दोन तालुक्यांत ३ गावांतील १0 शेतकरी तर रत्नागिरी जिल्ह्यात एका तालुक्यातील तीन गावांतील १0 शेतकरी अशा ३0 शेतकर्‍यांची निवड केली आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीस रायगड जिल्ह्यातून प्रारंभ होणार आहे. शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ■ रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांबरोबर डॉ.संजय देशमुख व डॉ.अनिल पाटील यांच्या पथकाने संवाद साधला असता शेतकर्‍यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
■ बेलोशीमधील ग्रामस्थांनी गावकीची सभा बोलावून तज्ज्ञांकडून योजना समजावून घेतली. औषधी वनस्पतींच्या विक्रीची हमी आणि भाताच्या जोडीला दुसरे वर्षभराचे उत्पन्न साधन या मुद्दय़ावर या शेतकर्‍यांनी प्रशिक्षण घेऊन औषधी वनस्पती लागवडीचा ठराव पथकास दिला आहे.
■ वाघोडा ज्ञानवाडी येथील शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद तर दिलाच पण याच गावातील शेतकरी सचिन बैकर यांनी आपल्या शेतावर औषधी वनस्पती लागवडीचा 'डेमो फार्म' करण्याचा निर्णय घेतला. नागोठणेतील वाजगाव आदिवासी वाडीतील ग्रामस्थांनी ३६५ दिवस या प्रकल्पात सहभागी होऊन, औषधी वनस्पतीचे संकलन संयुक्त सेवा केंद्रात देण्याचा निर्णय घेतला आहे. >त्न/> डेमो फार्म उभारण्यास उत्सुक शेतकरी सचिन बैकर यांच्याशी चर्चा करताना औषधी वनस्पती तज्ज्ञ डॉ. उत्कर्ष घाटे, अमरावतीचे कृतिशील शेतकरी नरेंद्र तायवडे आदी दिसत आहेत.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive