Friday, September 13, 2013

बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी

तर ही गोष्ट आहे….,संत एकनाथांची.
एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन (हिरवा मुसलमान) त्यांच्यावर थुंकला.
त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले. यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली. 
.............अस १०८ वेळा घडल नाथांनी न त्याला शिव्या शाप दिले न काही बोलले.

शिक्षकांनी ही गोष्ट वर्गात सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का….?...असा प्रश्न केला.

ज्याने त्याने आपापल्या बुद्धी प्रमाणे पुढील उत्तर दिली:
१- नाथ किती महान होते ते कळत.
२- नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते.
३ - माणसाने कस वागाव ते ही गोष्ट शिकवत.
४ - एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
५ - रागावून त्रास तुम्हालाच.
६ - शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही.... ते काम परमेश्वराच.
७ - दुसर्‍याला माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे.

अशी एकसो एक उत्तर विद्यार्थ्यांनी दिली.

पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता.
शिक्षकांनी त्याला विचारले तू काही उत्तर देत नाही त्यावर तो विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला:

गुरुजी माझ्या मित्रांनी जी उत्तर दिली, ती त्यांना शिकवण्यात आलेल्या शिकवणुकीनुसारच दिली. पण, नाथांची ही गोष्ट ऐकल्यावर माझ्या लक्षात आल ते अस की हिंदू समाज तेव्हाही निद्रिस्त होता आणि आजही आहे.

शिक्षक म्हणाले..... काय बोलतोस तू…?, नाथांना चूक ठरवतोस…..?

तो विद्यार्थी म्हणाला...

नाही गुरुजी मी नाथांना चूक ठरवणारा कोण….?

नाथ जे काही वागले ते त्यांच्या संन्यस्थ वृत्तीला साजेसच होत. या कृतीमुळे ते संतपदाच्या सर्वोच्च स्थानी बसले.

पण तो यवन जेव्हा १०८ वेळा थुंकत होता त्यावेळी हिंदू समाज निष्क्रीयतेने पाहत होता. त्याला या गोष्टीचा विरोध करावा असे मुळीच वाटले नाही?

नाथ संत असले तरी पूर्ण हिंदू समाज काही संत नव्हता. जर वेळीच त्या यवनाला चोप दिला असता तर तो नाथांवर १०८ वेळा थुंकलाच नसता.

नाथांनी जस त्याचं काम केल तस "बघ्या" हिंदूंनी त्याचं काम करण योग्य होत. नाथांच्या कृतीचा चुकीचा अर्थ अथवा विचार लोकात पसरवण नाही.

हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता ...विनायक दामोदर सावरकर.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive