Thursday, September 19, 2013

बाप्पाला भावपूर्ण निरोप

बाप्पा तू आला...आमच्यासोबत राहिलास...आमची दु:खे जाणली. तू सुखकर्ता अन् तूच दु:खहर्ता...आमच्या या वेदना दूर कर...आम्हाला आशीर्वाद दे...फार दुरावा करू नको...पुढच्या वर्षी लवकर ये! आम्हाला तुझ्याविना चैन नाही...बाप्पांच्या भक्तांच्या मनातील भावकल्लोळ दाटला होता...गणाधीशाला निरोप देताना कंठ दाटून आला होता. 'गणपती बाप्पा मोरयाऽऽ....', 'एक...दोन...तीन..चार....'चा जयघोष, गुलालाची उधळण अन् वाद्यांचा निनाद करीत बुधवारी गणरायाला निरोप देण्यात आला. नागपूरसह मुंबई, पुणे आणि अन्य मोठ्या शहरांमध्ये जल्लोष होता.

hf 
 ढोल ताशांचा गजर-डिजेच्या तालावर थिरकरणारी पावले, गुलालाने माखलेले चेहरे, पृष्पवृष्टीचे आकर्षक देखावे, भव्य गणेशमूर्तीसमोर येताच आशीर्वादासाठी जोडले जाणारे हात, रस्त्यावर उसळलेला जनसागर असे राज्यभर वातावरण होते. दहा दिवसांचा मुक्काम आटोपून स्वगृही निघालेल्या बाप्पांना निरोप देण्यासाठी मुंबई-पुण्यातील रस्त्यांवर जनसागर उसळला होता. मुंबईत समुद्रकिनारी एकच गर्दी उसळली होती. लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी भक्तसागर लोटला होता. विसर्जन सकाळपासून सुरू झाले. दीर्घ मिरवणुकीनंतर प्रसिद्ध गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्ती सायंकाळी चार-पाच वाजताच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर पोहोचल्या. निरोपाचा क्षण डोळ्यांत साठविला जात होता.

पुणेरी नाद

संस्कृतीचे माहेरघर असलेल्या पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीचा थाट न्याराच होता. इथल्या कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, केसरीवाडा आणि गुरुजी तालिम मंडळाच्या मानाच्या गणपतींचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यासाठी लाखो भाविक रस्त्यावर उतरले होते. विसर्जनाचा उत्साह ऐन भरात असतानाच पुण्यात पावसाने हजेरी लावली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसाने बाप्पांवर जलाभिषेक केला.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive